Umed Abhiyan – व्यवसायासाठी महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज, कोणती आहे सरकारची बेस्ट योजना; वाचा सविस्तर

राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना तयार करत आहे. 2011 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ (Umed Abhiyan) या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यात या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील 71 लाख गरीब कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जात आहे.

उमेद अंतर्गत महिलांना किती कर्ज मिळते

अभियानंतर्गत सरकार ग्रामीण भागातील तसेच तळागाळातील गरजवंत महिलांना 20 लाखांपर्यतचे कर्ज दिले जात आहे. उमेद अभियानांतर्गत सरकार महिलांना जे कर्ज उपलब्ध करून देते त्यावर नाममात्र व्याज दर आकारले जाते. उमेद अभियानांतर्गत जे कर्ज महिलांना दिले जाईल त्या कर्जाच्या रक्कमेत महिला स्वतःचा एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतात.

सरकारतर्फे मिळालेल्या कर्जाची रक्कम महिला आपल्या वैयक्तिक खर्चासाठी देखील वापरू शकतात. मात्र हा लाभ फक्त महिला बचत गटामधील सदस्य असलेल्या महिलाच घेवू शकतात.

Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

ऑनलाईन माहिती व अर्ज कसा भरणार

  • उमेद ह्या अभियानाची अधिकृत वेबसाईड www.Umed.in ही आहे.
  • वेबसाईटवर गेल्यावर मुखपृष्ठावर ‘बचत गट कर्ज प्रस्ताव’ यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला बॅंक लोन प्रोपजल असे इंग्रजीत लिहलेले दिसेल.
  • याठिकाणी तुम्ही SHG प्राथमिक तपशील भरा, जसे की, नाव, गटाचे प्रमुखाचे नाव भरा,
  • बचतगटाची सत्यापित करा, एमसीपी निवडा, बॅंक तपशील निवडा, बॅंक कर्जाबद्दल माहिती भरा.

कोणती कागदपत्रं लागतात

  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • बँकेचे खाते पासबुक बँकेची इतर माहीती
  • ज्या व्यवसायासाठी कर्ज घेत आहे त्या व्यवसाय विषयक आवश्यक कागदपत्रे

Leave a comment