1,00,000 लाख रु. पर्यंत आर्थिक सहाय्य Infosys STEM Stars Scholarship 2023

१,००,००० लाख रु. पर्यंत आर्थिक सहाय्य Infosys STEM Stars Scholarship 2023 (Science, Technology, Engineering, Mathematic) या विषयांमध्ये पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम करण्याची ईच्छा बाळगणाऱ्या विध्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती भविष्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणार आहे. Infosys Foundation च्या वतीने हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम STEM या क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या कालावधीसाठी १,००,००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये विविध गोष्टी कव्हर करण्यात येणार आहेत, जसे की ट्युशन फी, राहण्याचा खर्च आणि अभ्यास सामग्रीवर होणाऱ्या खर्चाचा सुध्दा यामध्ये समावेश असणार आहे.

Infosys Foundation

Infosys Foundation ही एक ना-नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे. या संस्थेचा मुख्य हेतू वंचीत घटकांना आधार देणे हा आहे. गरिब होतकरु विध्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी Infosys Foundation तत्पर आहे. सामाजीक जबाबदारी पार पाडण्यासाठी Infosys Foundation कटिबद्द आहे.

Infosys STEM Stars Scholarship 2023

पात्रता

• संपुर्ण भारतातील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणारी ही महिला विध्यार्थीनी असावी.
• Science, Technology, Engineering, Mathematic (STEM) या क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या विध्यार्थीनी तसेच त्यांनी नामांकित संस्थांमध्ये (NIRF मान्यताप्राप्त) नोंदणी केली पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीने 12 वी पुर्ण उत्तीर्ण केलेली असावी.
• अर्ज करणार्या विध्यार्थीनीने खालील निर्दिष्ट शैक्षणिक निकष पुर्ण केले असले पाहिजे.
o अभियांत्रिकी आणि संबंधित अभ्यासक्रमांमध्ये किमान सीजीपीए ७ असला पाहिजे.
o अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत सतत नावनोंदणीसाठी एमबीबीएसमद्ये वर्षभरासाठी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण पात्रता.
• अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8,00,00 रु. किंवा त्यापेक्षा कमी असावे.

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• फक्त मुलींसाठी ही शिष्यवृत्ती लागू असणार आहे.
• Science, Technology, Engineering, Mathematic (STEM) या क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीने 12 वी पुर्ण उत्तीर्ण केली नसेल तर.
• अर्ज करणार्या विध्यार्थीनीने खालील निर्दिष्ट शैक्षणिक निकष पुर्ण केले नसतील तर.
o अभियांत्रिकी आणि संबंधित अभ्यासक्रमांमध्ये किमान सीजीपीए ७ असला पाहिजे.
o अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत सतत नावनोंदणीसाठी एमबीबीएसमद्ये वर्षभरासाठी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण पात्रता.
• अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8,00,00 रु. पेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

• अर्ज करणार्या विद्यार्थीनीचा नवीन पासपोर्ट आकराचा फोटो.
• JEE/CET/NEET स्कोअरकार्डसह 12वीची मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे
• सरकारने जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड)
• चालु वर्षाचा प्रवेश पुरावा ( प्रवेश पत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र / शुल्क पावती / संस्थेचे ओळखपत्र )
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थिनीचे बँक खात्याचे तपशील ( बँक पासबुक / रद्द केलेला चेक)
• सरकारने जारी केलेला कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला (कार्यालये / बीपीएल किंवा तत्सम कार्ड / आयुष्यमान भारत कार्ड )
• अतिरिक्त सहाय्यक दस्तऐवज म्हणून मागीस ६ महिन्यांची वीज बिले प्रदान करणे.

फायदा काय होणार

यशस्विरीत्या निवड झालेल्या उनेदवारांचा अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत महाविध्यालयीन शिक्षण शुल्क, संबंधित शिक्षण साहित्य, निवास आणि राहण्याचा खर्च शिष्यवृत्तीच्या माध्यामातून करण्यात येईल.आणि यासाठी दरवर्षी रु.1,00,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळेल.

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख
31 डिसेंबर 2023

अर्ज करण्यासाठी लिंक
Infosys STEM Stars Scholarship 2023
Infosys Foundation

Leave a comment