माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, महाराष्ट्र 2023-24 / Education Concession to the Children of Ex-Servicemen, Maharashtra 2023-24

भारताच्या सर्व सिमारेषा सुरक्षीत आहेत त्या सैनिकांमुळे. दुष्मनांपासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी जवान रात्रंदिवस पहारा देत असतो वेळेप्रसंगी भारत मातेसाठी प्राणांची आहुती सुध्दा देतो. सीमेवर देशाची सेवी पुर्ण करुन आलेल्या माजी सैनिकांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maha Dbt Scholarship) ही शिष्यवृत्ती राबवली आहे. माजी सैनिकांच्या मुलांनी शैक्षणिक सवलत, महाराष्ट्र 2023-24 या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिकांच्या मुलांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ज्या विध्यार्थ्यांची निवड होईल त्यांना प्रयोगशाळा शुल्कासह प्रवेश, सेमिस्टर परिक्षा आणि ग्रंथालयासाठी लागणाऱ्या शुल्कामधुन 100 टक्के सवलत मिळेल.

पात्रता (Scholarship Maharashtra)

• अर्ज करणारा विध्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
• माजी सैनिकाचे मुले / पत्नी किंवा देशासाठी शहिद झालेल्या सैनिकाची विधवा पत्नी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
• अर्ज करणारा विध्यार्थी महाराष्ट्रातील सरकारी किंवा सरकारी अनुदानित महाविद्यालयात शिकत असावा.

अपात्रता

• महाराष्ट्रा बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र
• सध्या देशाची सेवा बजावणाऱ्या सैनिकांची मुले या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणारा विध्यार्थी महाराष्ट्रातील सरकारी किंवा सरकारी अनुदानित महाविद्यालयात शिकत नसेल तर तो किंवा ती या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत नाही.

कागदपत्र कोणती लागणार आहेत

• जिल्हाधिकारी आणि DSSA मंडळाच्या अध्यक्षांनी जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र
• ज्या वर्गात विध्यार्थी शिकत असेल त्याची प्रवेशाची पावती
• अधिवास प्रमाणपत्र

फायदा काय होणार

जे विध्यार्थी या (Maha Dbt Scholarship) शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील त्या विध्यार्थ्यांना प्रयोगशाळा शुल्कासह प्रवेश, सेमिस्टर परिक्षा आणि ग्रंथालयासाठी लागणाऱ्या शुल्कातून 100 टक्के सवलत मिळेल.

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख
31 मार्च 2024

अर्ज करण्यासाठी लिंक (Mahadbt Official Website)
Education Concession to the Children of Ex-Servicemen, Maharashtra 2023-24

Leave a comment