Trending Marathi – धाडस म्हणजे काय? एकदा हा 83 वर्षांच्या आजींचा Video बघाच

भारतातील सर्वात उंच बंजी जंपिंगचा थरार 83 वर्षांच्या आजींनी अनुभवला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Trending Marathi ) तुफान व्हायरल होत आहे.           View this post on Instagram                       A post shared by Bungee Jumping & Adventure in Rishikesh (@globesomeindia) ; … Read more

Pratapgad Fort – दिव्यांच्या प्रकाशात तरुणांची कल्पनाशक्ती, चला किल्ले प्रतापगड पाहूया

प्रतापगड (Pratapgad Fort) म्हणजे अफजलखानाचा वध आणि आदिलशाहीला घडलेली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋतेस 13 किमी. च्या अंतरावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात प्रतापगड वसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकले आणि प्रतापगड स्वराज्यात दाखल झाला. 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांना किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली होती. त्याचबरोबर … Read more

Torna Fort – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले तोरणा पाहूया

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला मानकरी ठरला तो तोरणा (Torna Fort). इ.स 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्यात सामीला केला आणि स्वराज्याच्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. हा गड स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडाचे नाव तोरणा असे पडले.  सातारा जिल्ह्यातील … Read more

Diwali 2025 – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले सिंधुदुर्ग पाहूया

दीपावली (Diwali 2025 ) म्हटलं की महाराष्ट्रातल्या मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. ग्रामीण भागांमध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक घरामध्ये एक किल्ला आजही बनवला जातो. परंतू मुंबईमध्ये जागे अभावी प्रत्येक घरामध्ये किल्ला उभा करणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्व मुले एकत्र येऊन एकाच ठिकाणी भव्य दिव्य किल्ला उभा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला हा … Read more

Fort Making Competition – वयगांवमध्ये शिवस्मृतींना उजाळा देणारी भव्य दिव्य किल्ला बांधणी स्पर्धा

वाई तालुक्यातील वयगांव गावामध्ये श्री गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या वतीने “किल्ला बांधणी स्पर्धा 2025” (Fort Making Competition) चे आयोजन करण्यात आले आहे. 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इच्छूक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलाकृतीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची सुवर्ण संधी आहे. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात … Read more

New Rule In Cricket – आडवे-तिडवे शॉट मारणाऱ्या फलंदाजांना दणका; नव्या नियमामुळे गोलंदाजांना होणार फायदा!

गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट खूप फास्ट झालं आहे. फलंदाजांनी आगळे वेगळे शॉट मारण्यास सुरुवात केल्यामुळे क्रिकेट पाहणाऱ्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. प्रामुख्याने टी-20 क्रिकेटची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि मॅरीलेबोन क्रिकेट क्लब क्रिकेटमध्ये नवनवे नियम लागू करत आहेत. आता यात आणखी एका नव्या नियमाची (New Rule In … Read more

U23 Athletics Competition – जावळीच्या सुदेष्णाची ‘सुवर्ण’ झेप; पदकांची हॅट्रिक आणि दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड

वारंगळ (तेलंगणा) येथे झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत (U23 Athletics Competition) जावळीच्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. फक्त सुवर्णपदकच जिंकले नाही तर दक्षिण आशियाई वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड सुद्धा झाली आहे. सुदेष्णाने या सुवर्णपदकासह पदकांची हॅट्रीक पूर्ण केली असून साताऱ्यासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जावळी … Read more

Wai News – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, वाई तालुक्यात 10 हजार वृक्षांची लागवड; हरित वसंताचा उत्सव साजरा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई (Wai News) तालुक्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जात आहे. वाईकर सुद्धा या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता वाई तालुक्यात मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) दहा हजार वृक्षांची विक्रम लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीच्या सोबतीने गावोगावी हरित वसंताचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.  तालुक्यातील 32 … Read more

Wai News – कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा; ज्ञानदीप स्कुलच्या मुलांनी पटकावले उपविजेतेपद

कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा हातकणंगले तालुक्यातील आदर्श गुरुकुल पेठवडगावमध्ये मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) पार पडली. या स्पर्धेत वाईच्या (Wai News) ज्ञानदीप स्कुल व ज्युनियर कॉलेजच्या मुलांना सातारा जिल्ह्याचे प्रितिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या संधीच मुलांनी सोनं केलं आणि स्पर्धेत विभागीय उविजेतेपद पटकावले. विविध स्पर्धांमध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर ज्ञानदीप स्कूल व ज्युनियर कॉलेजची … Read more

Satara Crime – पहिल्या बलात्कार प्रकरणात निर्दोष, ‘पॉर्न’ बघण्याच व्यसन; राहुल यादवला ठेचून ठेचून मारा… मृत आर्याच्या आईची मागणी

सातारा (Satara Crime) तालुक्यातील सासपडे गावात 13 वर्षी चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या संतापजनक घटनेमुळे साताऱ्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. सासपडे गाव आक्रमक झाले असून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सोमवारी (13 ऑक्टोबर 2025) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. मोठ्या संख्येने सासपडे ग्रामस्थ आणि सातारकर या मोर्चामध्ये सहभागी … Read more