Photo – ढगांचा लपंडाव आणि धुक्यांमध्ये हरवलेला राजगड

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच सुरक्षेच्या कारणामुळे … Read more

Shrawan Somvar – श्रावणसरी आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला विसापूरचा महादेव

Shrawan Somvar मुंबई-पुणे या महामार्गाच्या अगदीच शेजारी असणाऱ्या विसापूर गडाची तटबंदी महामार्गावरून अगदी सहजच नजरेस पडते. त्यामुळे या गडावर जाण्याचा मोह टाळता येत नाही. लोणावळ्याच्या कुशीत असलेला हा गड पावसाळी वातावरणात दुर्गप्रेमींना आकर्षीत करतो. मावळ तालुक्यात मोडणारा हा Visapur Fort खंडाळा म्हणजेच बोर घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. लोहगड आणि विसापूर या दोन गडांवर बोर … Read more

Wai News – वंदनगडावर आढळली प्राचीन नंदी महाराजांची मुर्ती, श्री. शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांची धडाकेबाज कामगिरी

Wai News श्री. शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांचं वंदनगडावर संवर्धनाच काम सुरू आहे. वेळात वेळ काढून सर्व सदस्य गडावर संवर्धनाच काम नियमीतपणे करत आहे. सोमवारी (4 जुलै 2025) सुद्धा गडाचं संवर्धन करण्यासाठी सर्वजण गडावर गेले होते. यावेळी संवर्धन करत असताना मातीच्या ढिगाऱ्यामध्ये नंदी महाराजांची मुर्ती आढळून आली आहे. दोरीच्या सहाय्याने नंदी महाराजांना वरती काढण्यात आलं … Read more

Mahawarasa Award – गडांच संवर्धन करणाऱ्यांना मिळणार विशेष पुरस्कार; राज्य शासन तीन लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविणार, जाणून घ्या निकष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गड थाटात उभे आहेत. विविध संस्थांच्या माध्यमातून गडांची डागडुजी केली जात आहे. दर रविवारी वेळात वेळ काढून तरुण मंडळी गडांच संवर्धन करण्यासाठी झटत आहे. यासाठी त्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर असणाऱ्या प्रेमापोटी दिवस रात्र ही … Read more

Maratha Military Landscapes – UNESCO मान्यता मिळाली आता गडांचे संवर्धन कसे होणार? आपली जबाबदारी काय? समजून घ्या सोप्या शब्दांत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Maratha Military Landscapes) 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. गडांच्या संवर्धनासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या विविध संस्थांना यामुळे अधिकच बळ मिळणार आहे. मान्यता मिळाली म्हणजे काम झालं असं नाही. याचसबोत आपली सुद्धा जबाबदारी वाढली आहे. आपले गड हे मंदिरासमान आहेत. त्यामुळे त्यांची काळजी … Read more

Maratha Military Landscape – हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या काळातील 12 किल्ल्यांच नामांकन पाठवण्यात आलं होतं. 2024-25 या वर्षासाठी भारत सरकारडून ‘Maratha Military Landscape of India’ म्हणजेच भारतीय लष्करी भूदृश्ये असा प्रस्ताव युनेस्कोकडे देण्यात आला होता. युनेस्कोच्या जागतीक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या गडांमध्ये स्वराज्याची … Read more

Ratangad Fort – आता मी मरणार… भर जंगलात एक दोन नव्हे तर तीन वेळा वाट चुकलो, बिबट्याचा सहवास; आम्ही अनुभवलेला थरारक रतनगड

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर Ratangad Fort कळसूबाई डोंगररांगेत आणि प्रवरा नदीच्या उगमस्थानावर अगदी थाटात उभा असलेला गिरीदूर्ग. मधल्या काळात कारवीचा बहर आल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गप्रेमी, सह्याद्रीप्रेमी दरवर्षी रतनगडाला भेट देत असतात. त्यात आम्ही सुद्धा नंबर लावला आणि आमचा सात जणांचा ग्रुप मुंबईहून रतनगडाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सह्याद्री … Read more

Morgiri Fort – चला किल्ले मोरगिरीकडे! लोणावळ्याच्या कुशीत असलेला एक सुंदर दुर्ग, वाचा संपूर्ण माहिती

पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा सह्याद्रीत भटकणाऱ्यांसाठी तिन्ही ऋतु सारखेच. तरीही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सह्याद्रीच सैर करण म्हणजे थेट स्वर्गात जाऊन पुन्हा माघारी येण्यासारखंच. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा अतिरेक झाल्यामुळे डोंगर दऱ्यांमध्ये, किल्ल्यांवर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. तुम्ही सुद्धा ट्रेकिंगला जाण्याच्या विचारात आहात, पण कुठे जायंच हे समजत नाहीये. तर तुमच्यासाठी … Read more

Harihar Fort वर जाण्याच्या विचारात आहात! थांबा… प्रथम 300 पर्यटकांनाच प्राधान्य, वन विभागाच्या सुचना जारी; वाचा…

पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीत भटकण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी बाहेर पडत असतात. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. परिणामी हरिहर (Harihar Fort), राजगड, सिंहगड, कळसुबाई, कलावंतीण इत्यादी. अशा काही गडांवर मोठ्या संख्येने पर्यटक गेल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अपघात होऊन गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जण या … Read more

Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या … Read more