Harihar Fort वर जाण्याच्या विचारात आहात! थांबा… प्रथम 300 पर्यटकांनाच प्राधान्य, वन विभागाच्या सुचना जारी; वाचा…

पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीत भटकण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी बाहेर पडत असतात. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. परिणामी हरिहर (Harihar Fort), राजगड, सिंहगड, कळसुबाई, कलावंतीण इत्यादी. अशा काही गडांवर मोठ्या संख्येने पर्यटक गेल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच अपघात होऊन गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जण या भागांमध्ये दगावले आहेत. त्यामुळे हरिहर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने सुचना जारी केल्या आहेत.

वनविभाग नाशिक यांनी जारी केलेल्या सुचनेनुसार

  1. हरिहर गडावरील पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता, गडावर प्रत्येक दिवशी प्रथम 300 पर्यटकांनाच सोडण्यात येईल.
  2. हरिहर गडावर दुपारी 2 नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
  3. हरिहर गडावर जर कोणताही 20 पेक्षा जास्त संख्येत मोठा ग्रुप येत असेल, तर त्यांनी पुढील अधिकृत मोबाईल नंबरवर किमान 72 तास आधी नोंदणी केलेली असावी. तरच त्यांना प्रवेश दिला जाईल.
  4. अधिकृत मोबाईल नंबर – 9420352395

नाशिक भागातील ब्रम्हगिरी, अंजनेरी, दुगारवाडी धबधबा, नेकलेल फॉलन (पहिने), हरिहर गड या पर्यटन क्षेत्रात मद्यपान निषिद्द क्षेत्र आहे. त्यामुळे मध्यपान केल्याचे आढळून आल्यास पर्यटन क्षेत्रार प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल.

अशाच माहितीसाठी वॉट्सॅप चॅनल जॉईन करामराठी चौक विशेष 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!