Supreme Court News – भटक्या कुत्र्यांना खायला द्याल तर गोत्यात यालं; स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर, दंडात्मक कारवाई होणार!

प्राण्यांमध्ये कुत्र्याला माणसाचा सगळ्याच चांगला मित्र म्हणून मानाच स्थान आहे. त्यामुळे कुत्रा पाळीव असो किंवा भटका श्वानप्रेमी त्याची आवर्जून काळजी घेतो, आणि त्याला खायला सुद्धा देतो. मात्र, आता भटक्या कुत्र्‍यांना खायला दिल्याच तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका … Read more

VIP Number For Car – नादापुढे सगळं बाद! खास क्रमांकासाठी एक-दोन लाख नव्हे तर कोटींच्या घरात पैसे मोजले, कशी पार पडले लिलाव प्रक्रिया?

‘हौसेला मोल नसतं’, अशी प्रसिद्ध म्हण प्रचलित आहे. हौस पुरवण्यासाठी पैशांचा मागचा पुढचा कोणताही विचार केला जात नाही. हौस पूर्ण करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी हल्लीच्या तरुणांची असते. त्यात विषय गाडीचा असेल, तर VIP क्रमांकासाठी (VIP Number For Car) तरुणांची धडपड पाहण्यासारखी असते. गाडीच्या किंमतीपेक्षा गाडीचा क्रमांकाची किंमत दुप्पट असल्याच्या अनेक बातम्या तुमच्या वाचण्यात … Read more

Dr Verghese Kurien – दुग्धउत्पादकांचा क्रांतीसूर्य! शेतकऱ्यांचं सोनं करणाऱ्या अवलियाची यशोगाथा

गोठ्यात गुरांचं हंबरणं, खुराड्यात कोबड्यांचा धिंगाणा, आकाशात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला की पहाट झाल्याची चाहूल लागते.  प्राण्यांच्या सहवासात राहणाऱ्या गावच्या शेतकऱ्याला सकाळी लवकर उठण्यासाठी आजही घड्याळाची आवश्यकता भासत नाही. सकाळी उठल्यावर गाय आणि म्हशीची धार काढण्यापासून दिवसाला सुरुवात होते. त्यानंतर शेतीच्या इतर कामांचा सपाटा सुरू होतो. शेतकऱ्यांची ही मेहनत नित्यनियमाने सुरू असते. परंतू आजही त्यांच्या … Read more

Dr. Babasaheb Ambedkar Typewriter – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ज्या टाइपरायटरवर टाइप केले, तो आहे कुठे?

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या टाइपरायटरवर (Dr. Babasaheb Ambedkar Typewriter) संविधान लिहिले तो टाइपरायटर बघण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिले, तेव्हा ते दिल्लीला रहायला होते. त्या काळात लॅपटॉप सारखी आधुनिक यंत्रणा नव्हती. त्यामुळे टाइपराटरवरच सगळा मजकूर लिहिला जायचा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा टाइपरायटरवरच संविधान लिहिले. 2 वर्ष 11 महिने आणि … Read more

Indian Constitution Day – ‘संविधान दिन’ 26 नोव्हेंबरलाच का साजरा होतो? काय आहे या मागचा इतिहास, जाणून घ्या एका क्लिकवर

देशभरात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय ‘संविधान दिन’ (Indian Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आणि त्याबद्दलची माहिती भारतीयांना व्हावी या उद्देशाने देशभरातील शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्या संविधानामुळे संविधानावर चालणारा भारत देश, अशी भारताची ओळख जगाच्या पटलावर निर्माण झाली, त्या संविधानाचा दिवस भारतात मोठ्या उत्साहात … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया; पाहा Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्री रामजन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाचा भाग असणे हा माझ्यासाठी एक अतिशय भावनिक अनुभव होता, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “अयोध्येच्या पवित्र … Read more

घरमालक-भाडेकरू वादावर पडदा पडणार! New Rent Agreement 2025 अन् 5 हजारांच्या दंडाची तरतूद, वाचा…

मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी नव्याने सुरुवात करायची म्हणजे हक्काच घर पाहिजेच. परंतू अनेकांना सुरवातीला नवीन घर घेणं शक्य होत नाही, त्यामुळे भाड्याने तात्पुरत्या स्वरुपात निवारा शोधला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये भाड्याने राहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच घरमालक आणि भाडेकरू हा वाद सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. आता या सर्व वादाला कुठेतरी … Read more

High Court News – खड्ड्यांमुळे अपघात किंवा मृत्यू, 50 हजार ते 6 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार! उच्च न्यायालय

चांगल्या आणि खड्डेमुक्त रस्त्यांनी प्रवास करायला सर्वांनाच आवडतं. तसेच तो प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क सुद्धा आहे. परंतू सध्याच्या घडीला नागरिकांच्या मुलभूत अधिकारचं धोक्यात आला आहे. भारतामध्ये दररोज अनेक नागरिकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू होत आहे. आता उच्च न्यायालयाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. खड्ड्यामुळे अपघात झालेल्या पीडितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले … Read more

Palak Muchhal Biography – शहीद जवानांच्या कुटुंबासाठी निधी ते 3800 हून अधिक चिमुकल्यांची हृदय शस्त्रक्रिया; प्रसिद्ध गायिकेचं समाजकार्य

‘Beauty With Brain’ हा शब्द फार कमी ऐकायला मिळतो. कारण या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणं म्हणजे दुग्ध शर्करा योगचं. अशा काही ठराविक व्यक्तीच या जगामध्ये आहेत. ज्या दिसायला सुंदर तर आहेतच, पण त्यांचे काम त्याहूनही सुंदर आहे. याच पंक्तीमध्ये आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने (Palak Muchhal Biography) आपल्या नावाची नोंद केली आहे. पलक … Read more

Delhi Car Blast Ashok Kumar – घरी जातानाच स्फोट झाला; तीन चिमुकल्यांना बाप कायमचा सोडून गेला, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ (Delhi Car Blast Ashok Kumar) काल (09 नोव्हेंबर 2025) एका कारमध्ये स्फोट झाला आणि संपूर्ण देश या स्फोटामुळे हादरून गेला. या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, मृतांच्या शरीराचे तुकडे छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये पडलेले आढळून आले. या भयंकर स्फोटामध्ये 34 वर्षीय अशोक कुमार यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. … Read more

error: Content is protected !!