Wai News – जेव्हा सरपंच स्वत: गांडूळ खत बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात, हा Video पाहाच

उपक्रमशील गाव म्हणून सध्या वाई (Wai News) तालुक्यात वयगांव गावाने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. याच उपक्रमात आणखी एका उपक्रमाची भर पडली. वयगांव गावच्या सरपंच अश्विनी एकनाथ सुतार यांनी गांडूळ खत (Gandul Khat) बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तसेच गांडूळ खताच्या फायद्यांची माहिती ग्रामस्थांना दिली. गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे ड्रम रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ग्रामपंचायत वयगांवला देण्यात … Read more

Wai News – वाई आगारातील चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स केली परत

प्रवास करत असताना अनावधानाने बऱ्याच वेळा आपल्या मौल्यवान वस्तू या गाडीमध्येच राहतात. अशा परिस्थितीत आपल्या हरवलेल्या वस्तू परत मिळण्याची शक्यता फार कमी असते. परंतू संबंधीत गाडीचे चालक आणि वाहक जर प्रामाणिक असतील, तर वस्तू कितीही मौल्यवान असो ती हरवण्याचा धोका अजिबात राहत नाही. याचाच प्रत्यय पारगाव-खंडाळा येथील भोसले कुटुंबाला आला आहे. एसटी बसमध्ये दागिने, मोबाईल … Read more

Wai News – वयगांवकरांच्या एकीचे बळ; मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून बंधाऱ्याचे बांधकाम, पाहा Photo

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विविध समाजउपयोगी उपक्रम राबवविले जात आहेत. वाई तालुक्यातील वयगांव हे गाव या उपक्रमांमध्ये सध्या आघाडीवर आहे. (फोटो सौजन्य – ग्रामपंचायत वयगांव) सरपंच आणि उपसरपंचांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचा सुद्धा या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. असाच एक उपक्रम ग्रामपंचायतीच्या पुढाकारने राबविण्यात आला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी … Read more

Radha Buffalo Satara – माण तालुक्यातील ‘राधा’म्हशीची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद

माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’म्हैशीची (Radha Buffalo Satara) सध्या देशात नव्हे तर जगभरात चर्चा आहे. उंचीने कमी असणारी ही म्हैस सध्या शेतकर्‍यांसह सर्वांच्या आकर्षणांच केंद्रबिंदु ठरत आहे. त्यातच तिची आता जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून Guinness Book of World Record मद्ये नोंद झाली आहे. ‘राधा’ची उंची फक्त 83.8 सेंमी इतकी म्हणजेच 2 फुट 8 इंच असून … Read more

Wai News – जिद्द, चिकाटी आणि मेहनत! बोरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा, अंजली राजेंद्र शिंदे बनली गावातील पहिली CA

मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्य या सर्व गोष्टींचं नित्यनियमाने पालन केलं की, त्याची गोडं फळं लेट पण थेट चाखता नक्की येतात. याचा चांगला परिणाम स्वत:पुरता किंवा कुटुंबापुरता मर्यादित न राहत सर्वदुर पाहायला मिळतो. याची प्रचिती वाई तालुक्यातील बोरगाव खुर्द गावात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (ICAI) सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन, … Read more

Wai Panchayat Samiti Election – अभेपुरी गणातून पंकज वाडकर यांच्या उमेदवारीची चर्चा

वाई (Wai) पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात सोमवारी (13 ऑक्टोबर) उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती (Wai Panchayat Samiti Election) गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सध्यस्थितीत वाई तालुक्यात चार गट व अभेपुरी, यशवंतनगर, केंजळ, ओझर्डे, भुईंज, पाचवड, बावधन आणि शेंदुरजणे हे आठ गण आहेत. या आरक्षण सोडतीत बावधन आणि अभेपुरी गण … Read more

Jaoli News – श्री मोळेश्वर देवाची ‘तुळशी बार्शी यात्रा’ आणि गावकऱ्यांचा उत्साह शिगेला

जावळी (Jaoli News) तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या सानिध्यात वसलेल्या मोळेश्वर गावात श्री मोळेश्वर देवाची “तुळशी बार्शी यात्रा 2025” मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. यात्रेसाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांसह भागातील नागिरकांनी हजेरी लावली होती. ढोल ताशांच्या गजरात देवाचा उत्सव संपन्न झाला.  श्री मोळेश्वर … Read more

सह्याद्रीत तंगडतोड भटकंती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Vasota Fort 1 नोव्हेंबरपासून खुला होणार

सातारा जिल्ह्यातील सदाहरित घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या घनदाट अभयारण्यात Vasota Fort Trek हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा वासोटा स्वराज्याचं तुरूंग म्हणून प्रचलित आहे. गडावर जाणारा मार्ग भयभीत करणारा आणि असंख्य हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला आहे. सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेला हा ऐतिहासिक हा गड 1 नोव्हेंबर 2025 पासून पर्यटनासाठी सुरू होत आहे. त्यामुळे  वासोटा … Read more

Wai News – घरात असो किंवा महाराष्ट्रात सर्वत्र मराठीत बोललं पाहिजे, पसरणीमध्ये अजित पवार यांचं जनतेला आवाहन

लोकशाहीर पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कला स्मारकाची पाहणी आणि स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाई (Wai News) तालुक्यातील पसरणी येथे पार पडले. यावेळी बोलत असताना घरात असो किंवा महाराष्ट्रात सर्वत्र मराठीत बोललं पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं. “अलिकडच्या काळात आपली मराठी भाषा इतकी महत्त्वाची आहे. परंतु बहुतेकांची मुलं, … Read more

Satara Doctor Case – दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात, तपास कुठपर्यंत आला! पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे (Satara Doctor Case) यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी आणि महिला डॉक्टर या एकमेकांच्या संपर्कात असल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर 2025) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. सुसाईड नोटच्या आधारावर दोन … Read more

error: Content is protected !!