Wai News – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, वाई तालुक्यात 10 हजार वृक्षांची लागवड; हरित वसंताचा उत्सव साजरा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई (Wai News) तालुक्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जात आहे. वाईकर सुद्धा या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता वाई तालुक्यात मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) दहा हजार वृक्षांची विक्रम लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीच्या सोबतीने गावोगावी हरित वसंताचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.  तालुक्यातील 32 … Read more

Wai News – कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा; ज्ञानदीप स्कुलच्या मुलांनी पटकावले उपविजेतेपद

कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा हातकणंगले तालुक्यातील आदर्श गुरुकुल पेठवडगावमध्ये मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) पार पडली. या स्पर्धेत वाईच्या (Wai News) ज्ञानदीप स्कुल व ज्युनियर कॉलेजच्या मुलांना सातारा जिल्ह्याचे प्रितिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या संधीच मुलांनी सोनं केलं आणि स्पर्धेत विभागीय उविजेतेपद पटकावले. विविध स्पर्धांमध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर ज्ञानदीप स्कूल व ज्युनियर कॉलेजची … Read more

Wai News – वयगांवमध्ये पार पडलं ‘महा आरोग्य शिबीर’, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावामध्ये “माझी वसुंधरा अभियान 6.0” अंतर्गत विविध सामाजिक आणि पर्यावरणपुरक उपक्रम राबवविले जात आहेत. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा मोठा वाटा असतो, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणं हे ग्रामपंचायतीचे सामाजिक कर्तव्य असते. याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत … Read more

Wai Ganpati Mandir- ढोल्या गणपतीचा इतिहास काय आहे? मंदिर कोणी बांधल? वाचा…

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर वाई हे ऐतिहासिक शहर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी “दक्षिणेची काशी” म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या पानावर वाईचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. याच वाईमध्ये छोठीमोठी अशी शंभराहून अधिक प्राचीन मंदिरे (Wai Ganpati Mandir) आहेत. या सर्व मंदिरांमध्ये … Read more

Wai News – धावलीमध्ये बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; Video आला समोर

वाई (Wai News) तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचा वावर असल्याचे काही व्हिडीओ मागील काही दिवसांमध्ये व्हायरल झाले होते. अशातच आता धावली गावात एका व्हिलामध्ये घुसून बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भागात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी (10 ऑक्टोबर 2025) … Read more

Wai News – ‘एक विवाह, एक झाड’; बावधन ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक निर्णय, विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक

माझी वसुंधरा 6.0 अभियानांतर्गत वाई तालुक्यातील (Wai News) बावधन ग्रामपंचायतीने विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक करण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेत एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसाळ यांनी मांडलेल्या ठरावाला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने मंजूरी देण्यात आली. फक्त झाडं लावणे नाही, तर झाडाची काळजी घेणे आणि झाडाचे संगोपन करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. गावामध्ये … Read more

Dasara 2025 – ग्रामस्थांच्या गाठीभेटी आणि मुंबईतल्या वाईकरांचा दसरा मेळावा, पाहा Photo

सातारा जिल्ह्यातील वाईकरांचा दसरा (Dasara 2025) मेळावा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. कामाच्या व्यापातून वेळ काढत काही तास गावकऱ्यांच्या सानिध्यात घालवण्यासाठी ग्रामस्थ या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईतल्या मुंबईत असूनही बऱ्याच वेळा एकमेकांची भेट होत नाही. दसरा एकमेव असा सण आहे, जेव्हा सर्व गावकरी वेळात वेळ काढून एकत्र येतात. राम राम.. … Read more

Satara Vishesh – कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी बावधन, वासोळे, बलकवडीत शिबीर भरणार; तारीख कोणती? वाचा…

Satara Vishesh मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या उपोषणामुळे सरकार खडबडून जागं झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (17 सप्टेंबर 2025) आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर 2025) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाद्वारे या सेवा पंधरवडा कालावधी कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी शिबीरांचे आयोजन … Read more

Satara Vishesh – ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 चा’ निकाल जाहीर; वाई तालुक्यातील मंडळानेही पटकावला पुरस्कार

सातारा (satara Vishesh) जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव बऱ्यापैकी पर्यावरणपूरक झाला. अनेक गावांनी पुढाकार घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच विसर्जन सुद्धा नदीमध्ये न करत विहिरीमध्ये करण्यास प्राधान्य दिले. या उपक्रमात अनेक मंडळांनी सुद्धा हिरहिरीने सहभाग नोंदवला होता. मंडळांना प्रोत्सोहान देण्यासाठी राज्य स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे निकाल जाहीर करण्यात आले … Read more

Wai News – पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025; वयगांवसह सातारा जिल्ह्यातील 12 गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील अनेक गावांनी हिरहिरीने या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. अखेर 11 तालुक्यांमधील 12 गावं या उपक्रमात बाजी मारण्यात यशस्वी ठरली. या सर्व गावांचा सत्कार सोहळा पालकमंत्री शंभुराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी … Read more