Wai Rain News – कृष्णा नदी दुथडी भरून, धोम धरणातून 8700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग; छोटा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता

Wai Rain News मागील काही दिवसांपासून सातारा जिल्हाात पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाबळेश्वरसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी शिरलं आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर नदीच पाणी मंदिराशेजारी असणाऱ्या दुकानांमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोम धरणातून 8700 क्युसेकने पाच वक्र दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग … Read more

Shahir Sable- शाहीर साबळे यांना शतकोत्तर जयंतीनिमित्त विशेष मानवंदना, एकसरमध्ये रंगणार सोहळा

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्रात लोकप्रिय करणारे महाराष्ट्र भूषण, पद्मश्री शाहीर साबळे (Shahir Sable) यांना मानवंदना देण्यासाठी विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 सप्टेंबर 1923 रोजी त्यांचा पसरणीमध्ये जन्म झाला तर 20 मार्च 2015 रोजी मुंबईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त ‘संकल्प कला स्पर्श सोहळा 2025’ चे आयोजन करण्यात आळे … Read more

Wai News – वयगांवमध्ये साजरा झाला निसर्गप्रेमाचा सण, रक्षाबंधननिमित्त झाडांना राखी बांधण्याचा कौतुकास्पद उपक्रम

वाई तालुक्यातील वयगांवमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधत निसर्गप्रेमाणाचा सण साजरा करण्यात आला. शनिवारी (9 ऑगस्ट 2025) देशभरात बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाचा उत्साह होता. एकीकडे बहिणी भावांना राखी बांधत होत्या तर, दुसरीकडे वयगांवमध्ये मात्र झाडांना राखी बांधून हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. “वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून … Read more

Balkawadi Dam – बलकवडी धरणाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा Video पाहिलात का!

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या वाई तालुक्यातील बलकवडी धरण (Balkawadi Dam) परिसर शांततेमुळे आणि निसर्गाच देखण्या रुपामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाईसह मुंबई पुण्यातून अनेक पर्यटक बलकवडी धरणाला भेट देत असतात. वाई तालुक्याच्या पर्यटनासाठी विशेष मेहनत घेणारे वैभव जाधव यांनी आपल्या बलकवडी धरण परिसराचा सुंदर नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी wai_tourism_official या इन्स्ट्राग्राम पेजवर … Read more

Wai News – वंदनगडावर आढळली प्राचीन नंदी महाराजांची मुर्ती, श्री. शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांची धडाकेबाज कामगिरी

Wai News श्री. शिव वंदनेश्वर प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांचं वंदनगडावर संवर्धनाच काम सुरू आहे. वेळात वेळ काढून सर्व सदस्य गडावर संवर्धनाच काम नियमीतपणे करत आहे. सोमवारी (4 जुलै 2025) सुद्धा गडाचं संवर्धन करण्यासाठी सर्वजण गडावर गेले होते. यावेळी संवर्धन करत असताना मातीच्या ढिगाऱ्यामध्ये नंदी महाराजांची मुर्ती आढळून आली आहे. दोरीच्या सहाय्याने नंदी महाराजांना वरती काढण्यात आलं … Read more

Wai News – चोरांचा सुळसुळाट, ओझर्डेमध्ये घरफोडी; काही मिळालं नाही म्हणून चक्क बंब चोरून नेला

वाई (Wai News) तालुक्यातील ओझर्डे गावात मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी घर फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोखंडी गजाच्या सहाय्याने चोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेशे केला परंतु त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. हाती काहीच लागलं नाही म्हणून चोरांनी शेजाऱ्याच्या घरासमोर असलेला पितळेला बंब लंपास केला. याप्रकरणी भुईंच पोलिसांनी अज्ञान चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी … Read more

Wai News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लाँग मार्च; या सरकारने आमची दखल घेतलेली नाही…, आंदोलनकर्त्या महिलांना अश्रु अनावर

Wai News कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र झाला असून मुंबईच्या वेशीवर सर्व आंदोलनकर्ते पोहचले आहेत. खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आंदोलन सुरू आहे. मंत्रालयायाच्या दिशेने निघालेला हा लाँग मार्च आता नवी मुंबईमध्ये पोहोचला आहे. सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले असून वाई पासून मुंबईपर्यंत येईपर्यंत सर्वांनाच विविध अडचणींचा सामना करावा लागला, परंतु सरकारने … Read more

Wai News – वयगांवने पटकावला माझी वसुंधरा अभियान – E pledge मध्ये राज्यात प्रथम क्रमांक; बलकवडी, दह्याट आणि गोळेगाव अव्वल दहामध्ये

विविध समाज उपयोगी उपक्रम आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांमध्ये वाई तालुक्यातील वयगांव गावाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. गावातील प्रत्येक नागरिक गावाच्या विकासासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी जबाबदारीने काम करत आहेत. याचचं फळ म्हणजे वयगांवने माझी वसुंधरा अभियान – E pledge तिमाहीच्या पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत बलकवडी, ग्रामपंचायत दह्याट आणि … Read more

Wai News – मुसळधार पावसाचा तडाखा, जोर गावातील पूल कोसळला; पाहा Video

वाई (Wai News) तालुक्यासह सातारा जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत. याचा फटका जोर गावाला सुद्धा बसला आहे. शनिवारी (26 जुलै 2025) रात्री कुंभजाई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे. जोर गावामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तसेच अतिशय दुर्गम भागात हे गाव असल्यामुळे … Read more

Wai – श्रावण महिना आणि निसर्ग सौंदर्याने उजळून निघालेला वाई तालुक्याचा पश्चिम भाग

श्रावण महिना सुरू झाला की, सह्याद्रीने जणू हिराव शालू पांघरून घेतल्याचा भास होतो. पर्यटकांसाठी नेहमची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या Wai तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्गाने नटलेल्या देवघराचे रूप येते. धुक्यात हरवलेली डोंगररांग, कमळगड किल्ला, धोम आणि बलकवडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, खळखळ वाहणारे लहान-मोठे झरे हे दृश्य थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणार असतं. त्यामुळे आपसूक पर्यटकांची पावलं महाबळेश्वर, पाचगणीसह … Read more