लेख – एक गाव – एक संघ! अंतिम फेऱ्यांचा बादशाह वयगांव; सलग 8 स्पर्धांमध्ये विजयी गुलाल

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< “आमची ऐकी हेच आमचं बळ” ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येक वयगांवकराच्या मनात बसलेली भावना आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये राहून, वेगवेगळ्या भागात नोकरी, व्यवसाय, शिक्षण करत असूनही जेव्हा क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून मुलं एकत्र येतात आणि वयगांवचा झेंडा उंचावण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरतात. या एकीमुळेच आज वयगांव संघ … Read more

Tennis Cricket News – जन्नी कुंभळजाई चषक 2026 दिमाखात; वयगांव 11 चा विजयी जल्लोष, बोरगाव बुद्रुक उपविजेता

जगदंब स्पोर्ट्स, जोर आणि ग्रामस्थ मंडळ जोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जन्नी कुंभळजाई चषक जोर-२०२६ ही भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा (Tennis Cricket News) नवी मुंबईतील घणसोली येथे उत्साह, जल्लोष आणि क्रीडामय वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या निमित्ताने जोर परिसरातील तसेच बाहेरील अनेक संघ एकत्र आले आणि प्रेक्षकांना थरारक सामने पाहायला मिळाले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट संघभावना, शिस्तबद्ध … Read more

Wai News – मुंबईत अवतरणार बोरगांव! क्रिकेटच्या मैदानावर गावपणाचा जिव्हाळा; ‘बोरगांव प्रीमियर लीग पर्व 3’चा रणसंग्राम

धावपळीच्या, स्वप्नांच्या आणि संघर्षांच्या या जगात शिक्षणामुळे किंवा कामानिमित्त गावापासून लांब शहरांमध्ये येऊन रहाव लागतं. गाव दुरावलं असलं तरी मुंबई-पुण्यात राहूनही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपलं गाव (Wai News) सतत आठवत असतं. ती गावाप्रती असणारी ओढ कधी कमी होत नाही. पण जेव्हा मुंबईसारख्या महानगरात संपूर्ण गाव एकत्र येतं, तेव्हा काही काळासाठी मनातली मुंबई नाहीशी होते आणि … Read more

Wai Premier League – पावसाचा व्यत्यय आणि नाणेफेकीचा कौल, ‘खोडियार माता 11’ संघ ठरला मंत्री चषकाचा मानकरी

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (आबा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत वाई तालुक्यातील सर्वात मोठ्या वाई प्रीमियर लीगचे (Wai Premier League) आयोजन करण्यात आले होते. वाईतील द्रविड हायस्कूलच्या मैदानावर 16 संघांमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी तुंबळ लढाई पाहायला मिळाली. मात्र, अखेरच्या क्षणी पावसाने हिरमोड केल्याने नाणेफेकीच्या … Read more

New Rule In Cricket – आडवे-तिडवे शॉट मारणाऱ्या फलंदाजांना दणका; नव्या नियमामुळे गोलंदाजांना होणार फायदा!

गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट खूप फास्ट झालं आहे. फलंदाजांनी आगळे वेगळे शॉट मारण्यास सुरुवात केल्यामुळे क्रिकेट पाहणाऱ्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. प्रामुख्याने टी-20 क्रिकेटची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि मॅरीलेबोन क्रिकेट क्लब क्रिकेटमध्ये नवनवे नियम लागू करत आहेत. आता यात आणखी एका नव्या नियमाची (New Rule In … Read more

Tennis Cricket News – 22 यार्ड क्रिकेट कार्निव्हल स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला ‘वाई 11’

22 Yard Cricket Carnival या रबर बॉल क्रिकेट (Tennis Cricket News) स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलाय ‘वाई 11’. नवी मुबंईतील कोरपखैरणेमध्ये असलेल्या भूमीपुत्र मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 8 संघांचा दोन दिवस थरार रंगला. रविवारी (21 सप्टेंबर 2025) पार पडलेल्या अंतिम सामन्यात वाई 11 विरुद्द कोयना किंगस्टार असा सामना रंगला. या सामन्यात वाईने बाजी मारली आणि 36 … Read more

Rubber Test Championship 2025 चा पहिला शतकवीर ठरलाय विनायक भोईर, पालघर मजबूत स्थितीत

RUBBER TEST CHAMPIONSHIP 2025 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना चंदन 11 रायगडविरुद्ध ताई पॅकर्स पालघर या संघांमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पालघरच्या विनायक भोईरने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत शतक ठोकले आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर 2025) पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रायगडच्या संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या होत्या. टेनिस क्रिकेटच्या बातम्यांसाठी … Read more

Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video

Tennis Cricket Marathi मिस्टर परफेक्शनिस्ट आणि संगमनेर तालुक्याचा कोहिनूर हिरा शेखर शेळकेच अपघाती निधन झालं. शेखर शेळकेच्या मृत्यूमुळे टेनिस क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. एक दर्जेदार खेळाडू गमावल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीमध्ये अनेक सामने गाजवले. गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे त्याच नाव फक्त संगमनेर तालुक्यापूर्त … Read more

Tennis Cricket विश्वावर शोककळा, संगमनेरचा हुकमी एक्का शेखर शेळकेच अपघाती निधन

टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शेखर शेळकेच अपघाती निधन झालं आहे. संयमी आणि विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जात होतं. त्याच्या निधनामुळे संगमनेर तालुक्यासह टेनिस क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेखर शेळके संगमनेर … Read more

Tennis Cricket Marathi – निखील जाधवची वादळी खेळी! षटकारांचा पाडला पाऊस, 28 चेंडूंत ठोकलं शतक; पाहा Video

Tennis Cricket Marathi केएसकेचा कोहिनूर हिरा आणि गिरगांवचा वंडर बॉय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निखील जाधवने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडीतील मानकोलीमध्ये खेळल्या गेलेल्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेत Tai Packers RJ या संघाकडून खेळताना त्याने 28 चेंडूंमध्ये 104 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. पहिल्या चेंडूंपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या निखीलने गोलंदाजांना अक्षरश: … Read more

error: Content is protected !!