Nikon Scholarship 2023-24 / निकॉन शिष्यवृत्ती 2023-24

फोटोग्राफीमध्ये आपलं करीअर करु इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने निकॉन शिष्यवृत्ती 2023-24 आणली आहे. समाजातील आर्थीक दृष्ट्या मागास असणाऱ्या विध्यार्थ्यांना ही एक उत्तम संधी Nikon Scholarship च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विध्यार्थ्यांनी 12 वी चे शिक्षण पुर्ण केले आहे तसेच, तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या फोटोग्राफी-संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल त्या विध्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती एक बुस्टर ठरणार आहे.

निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही इमेजिंग आणि ऑप्टिक्स मधील जागतीक लीडर म्हणुन पुढे आली आहे. निकॉन इंडीयाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती विध्यार्थ्यांसाठी आणण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश विध्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. गेल्या काही वर्षांपासून, कंपनीने विध्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि रोजगार-वर्धित व्यावसायिक कौशल्यांसह प्रामुख्याने शिक्षणाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करणारे अनेक उपक्रम राबवत आहे.

Nikon Scholarship 2023-24

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी Nikon Scholarship आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने 12वी उत्तीर्ण केलेली असावी.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचे फोटोग्राफी संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असावे.

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थ्यां Nikon Scholarship साठी अपात्र असतील.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने 12वी उत्तीर्ण केलेली नसेत तर अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचे फोटोग्राफी संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला नसेत तर तो विध्यार्थी अपात्र असेल.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त असेत तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असेल.

कागदपत्र कोणती लागणार आहेत?

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
• उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र/बीपीएल प्रमाणपत्र/पगार स्लिप इ.)
• फोटोग्राफी संबंधीत अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला पुरावा (कॉलेजचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र इ.)
• चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची पावती
• शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे बॅके खात्याचे तपशील (रद्द चेक किंवा पासबुक प्रत)
• आधीच्या वर्गाची मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड
• अपंगत्व आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

फायदा काय होणार
ज्या विध्यार्थ्याची Nikon Scholarship 2023-24 साठी निवड होईल त्या यशस्वी विध्यार्थ्याना 1 लाख रु. पर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळेल.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
31 डिसेंबर 2023

अर्ज करण्यासाठी लिंक
Nikon Scholarship 2023-24

Leave a comment