Raj Thackeray News – 18 वर्षांच्या तरुण लेखकाचा अभिमानास्पद क्षण! ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांना पुस्तक अर्पण

मुंबईत एका तरुण लेखकाने आपल्या कर्तृत्वाने अभिमानास्पद कामगिरी करत लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या १८व्या वर्षी राज संदेश पवार यांनी आपल्या पहिल्या मराठी पुस्तकाची प्रत थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray News) यांना त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट देत सप्रेम अर्पण केली.

‘ऐकोस ऑफ पानिपत : १४ जानेवारी १७६१’ या पुस्तकाद्वारे इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि वेदनादायी अध्याय शब्दांत जिवंत करण्याचा प्रयत्न या तरुण लेखकाने केला आहे. या भेटीमुळे राज पवार यांच्या साहित्यिक प्रवासाला नवी दिशा मिळाली असून, हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरला आहे.

राज पवार यांनी आपल्या यशामागे आई मनीषा पवार आणि वडील संदेश पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले. या प्रसंगी मिळालेल्या प्रोत्साहनामुळे भविष्यात अधिक जोमाने लेखन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

तरुण वयात मिळालेलं हे यश इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, मराठी साहित्यविश्वात नव्या पिढीचा आवाज बुलंद होत असल्याचं स्पष्ट होत आहे


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!