एकलव्य शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2023-24 / Eklavya Scholarship, Maharashtra 2023-24

पोस्ट ग्रॅज्यूएशन करु इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे एकलव्य शिष्यवृत्ती (Maha Dbt Scholarship)राबवण्यात येत आहे. पदव्यूत्तर पदवी (Scholarship for post graduate students in India) अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विधी, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीधरांना (Scholarship for degree students) आर्थिक मदत देण्यासाठी एकलव्य शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे. ज्या विध्यार्थ्यांची या (Maha Dbt Scholarship) शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल त्या विध्यार्थ्यांना 5,000 रु. गुणवत्तेवर आधारीत एक-वेळ आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

एकलव्य शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2023-24 (Scholarship Maharashtra And Scholarship for post graduate students in India)

पात्रता

• अर्ज करणारा विध्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने महाराष्ट्रातून पदवी पुर्ण केलेली असावी.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने कायदा, वाणिज्य आणि कला शाखेत कमीत कमी 60 टक्के गुण आणि जर विज्ञान शाखेतून पदवी पुर्ण केली असेल तर 70 टक्के गुण महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्था किंवा विध्यापीठातून मिळवले असले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 75,000 रु. किंवा त्यापेक्षा कमी असावे.
• अर्ज करणारा विध्यार्थी पुर्ण वेळ किंवा अर्ध वेळ नोकरी करत नसावा.

अपात्रता

• महाराष्ट्रा बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने महाराष्ट्रातून पदवी पुर्ण केलेली नसेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने कायदा, वाणिज्य आणि कला शाखेत कमीत कमी 60 टक्के गुण आणि जर विज्ञान शाखेतून पदवी पुर्ण केली असेल तर 70 टक्के गुण महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्था किंवा विध्यापीठातून मिळवण्यात अयशस्वी ठरले असतील तर ते विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 75,000 रु. किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर.
• अर्ज करणारा विध्यार्थी पुर्ण वेळ किंवा अर्ध वेळ नोकरी करत असेल तर.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

• तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
• शेवटच्या परीक्षेची मार्कशीट
• अधिवास प्रमाणपत्र

अर्ज करण्याची अंतीम मुदत
31 मार्ज 2024

अर्ज करण्यासाठी लिंक (Mahadbt Official Website)

एकलव्य शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2023-24 (Scholarship for post graduate students in India)

Leave a comment