HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम 2023-24/ scholarship for post graduate students in india

HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम 2023-24/ scholarship for post graduate students in india

HDFC बँकेचा हा उपक्रम आहे. याचा उद्देश समाजातील वंचित, हुशार आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणे आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम पीजी ( सामान्य आणि व्यावसायिक ) प्रोग्रॅमचा पाठपुरावा करणाऱ्यांसाठी आहे. ECSS कार्यक्रमांतर्गत जे विध्यार्थी वैयक्तिक किंवा कौटुंबीक संकटांमुळे कोणत्याही आर्थिक शिक्षणाचा खर्च उचलण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या शिक्षणासाठी किंवा अभ्यासासाठी ७५,००० रु. आर्थिक मदत दिली जाणार आहे.

scholarship for post graduate students in india / pg scholarship in india

पात्रता

•फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी लागू.
•विध्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवा विध्यापीठांमध्ये पदव्यूतर अभ्यासक्रम (सामान्य अभ्यासक्रम – Mcom, MA ई. आणि व्यावसायिक अभ्यासक्रम – Mtech, MBA ई.) प्रवेश घेणे आवश्यक.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
•वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असाव.
•ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

अपात्रता

•भारता बाहेरील विध्यार्थी
•विध्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त महाविध्यालय किंवा विध्यापिठामध्ये पदव्यूतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला नसेल तर.
•वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

•पासपोर्ट आकाराचा फोटो
•मागील वर्षाची मार्कशीट (२०२२-२३)
•ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदान कार्ड/ड्रायविंग लायसन्स)
•महाविध्यालाय किंवा विध्यापिठात प्रवेश घेतलेला चालू वर्षाचा पुरावा ( शुल्क पावती/ प्रवेश पत्र/ संस्थेचे ओळखपत्र/ बोनाफाईड प्रमाणपत्र ) २०२३-२४
•अर्ज करणाऱ्या बँकेचे पासबूक/रद्द केलेला धनादेश (माहिती अर्जामध्ये कॅप्चर केली जाईल)
•ग्रामपंचायत/ वॉर्ड समुपदेशक / सरपंच / एसडीएम / डीएम / सीओ / तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा पुरावा.
•कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटाचा पुरावा लागू असेल तर.

फायदे

सामान्य पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ३५,००० रु. आणि व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ७५,००० रु.

अर्ज कसा कराल.

पुढे दिलेली लिंक ओपन करून फॉर्म सबमीट करा
HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम 2023-24/ scholarship for post graduate students in india

हे लक्षात ठेवा.

•अर्ज करताना सर्व महती काळजीपूर्वक वाचा
•दोन वेळा फॉर्म चेक करा

अर्ज करण्याची अंतिम मुदत

३१ डिसेंबर २०२३

ही माहिती आपल्या गरजू मित्र, सहकारी, मुलगा किंवा तुमच्या ओळखीच्या विध्यार्थ्यापर्यंत पोहोचवा..

Leave a comment