रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३-२४/reliance foundation scholarship

reliance foundation scholarship

श्री धिरूभाई अंबानी यांच्या कष्ट आणि चिकाटीमुळे आज रिलायन्स समूहाच नाव जगभरात आदराने घेतल जात. श्री धिरूभाई अंबानी यांच्या मते देशाची प्रगती करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तरुणांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी गुंतवणूक करणे. याच त्यांच्या मताचा आदर ठेवत गेल्या २५ वर्षापासून रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने स्कॉलरशिप दिली जाते.
रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३-२४ ही समाजातील वंचित घटकांमधील ५,००० गुणवंत पदवीधर आणि पदव्यूत्त्तर विद्यार्थ्यांची मदत करणार आहे. या स्कॉलरशिपचे मुख्य उद्दिष्ट गुणवंत विद्यार्थ्यांचे पालनपोषण आणि सक्षमीकरण करून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी सहकार्य करणे तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भारताच्या विकासाला चालना देणे.

रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रॅजुएट शिष्यवृत्ती/scholarship for undergraduate students in india

५,००० गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुणवत्तापूर्ण निकषांच्या आधारे पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना यशस्वी व्यावसायिक बनवण्यासाठी आणि त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम बनवने आहे. भारताच्या भविष्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासात या विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा असावा यासाठी ही शिष्यवृत्ती सहकार्य करणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रॅजुएट स्कॉलरशिप २०२३-२४/ scholarship for undergraduate students in india

पात्रता

•भारताचा नागरिक असावा.
•इयत्ता १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.
•भारतात पूर्णवेळ पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असावा.
•घरचे उत्पन्न १५ लाख रु. पेक्षा कमी असावे. ( २.५ लाख रु. पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य )
•अभियोग्यता चाचणी/Aptitude Test अनिवार्य आहे.

अपात्रता

•जे विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला आहेत.
•ऑनलाइन, रिमोट, डिस्टन्स किंवा इतर कोणत्याही नॉन-रेग्युलर पद्धतीने पदवी मिळवणारे विद्यार्थी.
•दहावीनंतर डिप्लोमा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
•जे विद्यार्थी अभियोग्यता चाचणी/Aptitude Test देणार नाहीत किंवा परीक्षेदरम्यान फसवून करताना आढळतात.

कागदपत्र कोणती लागणार आहेत ?

•अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
•राहत असणाऱ्या घरच्या पत्त्याचा पुरावा (कायमच पत्ता)
•१० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेची मार्कशीट.
•ज्या महाविध्यालयात शिकत आहात त्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र
•ग्रामपंचायत/वॉर्ड समुपदेशक / सरपंच / एसडीएम / डीएम / सीओ / तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा पुरावा
•संबधित सरकारी प्राधिकरणाने जारी केलेल अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असेल तर)

फायदा

पदवी कार्यक्रमाच्या कालावधीत २ लाख रु. शिष्यवृत्ती.

हे लक्षात ठेवा

•अर्ज करताना सर्व महती काळजीपूर्वक वाचा
•दोन वेळा फॉर्म चेक करा
•लिंक ओपन केल्यावर ऑनलाइन पात्रता प्रश्नावली भरा ( अनिवार्य )
•तुम्ही जर पात्रता निकष पूर्ण केले, तर रिलायन्स फाऊंडेशनच्या अॅप्लीकेशन पोर्टलद्वारे अर्ज करण्यासाठी लॉग-इन महितीसह ईमेल आमंत्रण पाठवले जाईल
•ईमेल मध्ये मिळालेले युजरनेम आणि पासवर्ड वापरुन अॅप्लीकेशन पोर्टलवर लॉग इन करा
•फॉर्म भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे आपलोड करा आणि अर्ज सबमीट करा.

अर्ज कसा कराल ?

पुढील लिंक ओपन करू अर्ज करू शकता रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रॅजुएट स्कॉलरशिप २०२३-२४.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख
१५ ऑक्टोबर २०२३

ही माहिती आपल्या गरजू मित्र, सहकारी, मुलगा किंवा तुमच्या ओळखीच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा..

हे ही वाचा
१ ) १२ वी उत्तीर्ण व्यवयसायिक शिक्षण घेण्यास इच्छुकक असणाऱ्या मुलींसाठी कोटक कन्या स्कॉलरशिप
२ ) शालेय आणि महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप

Leave a comment