Digital marketing scholarships

डिजिटल मार्केटिंग शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातच नाही तर संपूर्ण जगात डिजिटल मार्केटिंगचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुढील स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या डिजिटल मार्केटिंगच्या प्रवासाला सुरू करू शकता.

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डिजिटल एज्यूकेशन (IIDE) शिष्यवृत्ती

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डिजिटल एज्यूकेशन (IIDE) द्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डिजिटल एज्यूकेशन (IIDE) द्वारे ऑफर केलेल अभ्यासक्रम.

•डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीए-स्तरीय पोस्ट ग्रॅजुएशन प्रोग्राम.
•प्रमानपत्रांसह ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग कोर्स.
•डिजिटल मार्केटिंग मधील अल्प मुदतीचे प्रमाणन अभ्यासक्रम.

निवड प्रक्रिया

•निवडीसाठी विध्यार्थ्याला कठोर गुणवत्ता-आधारित स्क्रीनिंग प्रक्रियेतून जातील.
•निवड प्रक्रियेचा भाग म्हणून अर्जदारांनी पात्रता चाचणी आणि मुलाखतीत भाग घेणे आवश्यक आहे.
•पात्रता चाचणी आणि मुलाखतीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर शिष्यवृत्ती रक्कम निश्चित केली जाईल.

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डिजिटल एज्यूकेशन (IIDE) शिष्यवृत्तीचे फायदे.

•अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांना निवडलेल्या अभ्यासक्रमावर अवलंबून ५,००० रु. ते ८०,००० रु पर्यंतची शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते.
•या शिष्यवृत्ती उपक्रमाचा उद्देश १००० हुन अधिक विध्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये करीअर करण्यासाठी मदत करून त्यांच्या स्वप्नांना बळ देणे आहे.
•या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी एकून २.५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अर्ज कसा कराल

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी IIDE च्या अधिकृतट वेबसाइटला भेट द्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डिजिटल एज्यूकेशन

अंतिम तारीख – ११-०९-२०२३

विकास दीप फाऊंडेशन शिष्यवृत्ती

विकास दीप फाऊंडेशन या गैर-सरकारी संस्थेने पात्र, वंचित विध्यार्थ्यांना आधार देण्यासाठी ‘डिजिटल मार्केटिंग कोर्स – शिष्यवृत्ती कार्यक्रम’ सुरू केला आहे.

पात्रता

•ज्या अर्जदारांनी १२ वी पूर्ण केली आहे किंवा पदवी पूर्ण केली आहे ते विध्यार्थी त्यांचे अर्ज सबमीट करू शकतात.
•फॉर्म भरताना, विध्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये १२ वी ग्रेड मार्कशिट किंवा प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो समाविष्ट करायचा आहे.

शिष्यवृत्तीसाठी महत्वाचे मुद्दे.

•विकास दीप फाऊंडेशन कोर्स फी साठी ७० टक्के शिष्यवृत्ती प्रदान करेल आणि उर्वरित ३० टक्के रक्कम विध्यार्थ्यांनी भरायची आहे.
•महिला उमेदवारांना महिला सक्षमीकरण प्रोत्सोहान मोहिमेचा भाग म्हणून अतिरिक्त ५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
•कोर्सच्या माध्यमातून संपूर्ण डिजिटल मार्केटिंग कोर्स, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन (SMO) आणि गूगल जाहिराती किंवा डिस्प्ले अॅडव्हर्टायझिंग कोर्स शिकवले जाणार आहेत.
•कोर्सच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये थेट प्रकल्प प्रशिक्षण, ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण पर्याय, लहान बॅचेस, १०० टक्के नोकरीची हमी, कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिल जाईल.

हे लक्षात ठेवा

•कोर्समध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोर्स फीच्या ३० टक्के रक्कम भरण आवश्यक आहे आणि देयक पावती विकास दीप फाऊंडेशनच्या अधिकृत ईमेलवर पाठवणे आवश्यक आहे.
•पेमेंट मिळाल्यानंतर, विकास दीप फाऊंडेशन उर्वरित ७० टक्के रक्कम संस्थेला वितरित करेल.
•ज्या विध्यार्थ्यांनी आधीच ३० टक्के पेमेंट केले आहे त्यांना प्राधान्य देऊन प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्वावर शिष्यवृत्ती दिली जाईल.

शिष्यवृत्ती साठी तुम्ही पुढील विकास दीप फाऊंडेशनच्यां अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता विकास दीप फाऊंडेशन

टीप – सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच फॉर्म भरण्यास सुरुवात करा.

Leave a comment