International Letter Writing Competition 2026 – मित्र-मैत्रिणीला पत्र लिहून 50 हजारांचे बक्षीस जिंकण्याची संधी

लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचं डोकं सतत मोबाईलमध्ये घुसलेलं असतं. मोबाई, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या आणि अति वापरामुळे कुठेतरी लिहिण्याची सवय मोडत चालल्याचं चित्र आहे. यामुळे पत्र (International Letter Writing Competition 2026 ) लिहिण्याची परंपराही मागे पडत चाललीये. विद्यार्थ्यांमधील पत्रसंस्कृती तर नाहीच्या बरोबर आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय टपाल विभागाने महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पत्रसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी युनिव्हर्सल पोस्टल युनियनअंतर्गत ‘आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा २०२६’ जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस जिंकण्याची सूवर्णसंधी आहे. याबाबत लोकसत्ताने वृत्त दिले आहे. 

नेमकी ही स्पर्धा काय आहे? या स्पर्धेचा विषय काय आहे? वयोमर्यादा किती आहे? नियम काय आहेत? बक्षिसांचे स्वरुप कसे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे थोडक्यात आणि सोप्या शब्दांचा जाणून घेऊ. 

नेमकी ही स्पर्धा काय आहे?

आधुनिकतेच्या या जगात सोशल मीडियामध्ये हरवलेल्या विद्यार्थ्यांना पत्रसंस्कृतीबद्दल जाणीव निर्माण करूण देण्याच्या उद्दीष्टाने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेतून निवडलेले सर्वोत्तम पत्र भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवले जाईल. त्यामुळे एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासह आपल्या नावाचा डंका वाजवता येणार आहे. 

स्पर्धेचा विषय काय आहे?

जग या वेगाने आधुनिकतेची कस धरून पुढे जात आहे. त्याच अनुषंगाने विषयाची निवड यंदा करण्यात आली आहे. पत्र लेखनाचा विषय आहे, ‘डिजिटल जगात मानवी संवाद का महत्त्वाचा आहे?’ लेखन पत्राच्या स्वरूपातच असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती आहे?

या पत्रलेखन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 9 ते 15 वर्षे अशी असणार आहे. या वयोगटातील विद्यार्थीच या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील. पत्र मराठी, हिंदी किंवा इंग्रजी पैकी कोणत्याही एका भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. परंतू, लेखन पत्राच्या स्वरुपात आणि स्वत:च्या हस्ताक्षरात असणे बंधनकारक आहे. 

नियम काय आहेत? कागदपत्रे कोणती लागणार?

स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा तत्सम कागदपत्र आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो असले पाहिजेत. पत्राची शब्दमर्यादा 800 इतकी आहे. त्यामुळे 800 किंवा त्याहून अधिक शब्दामध्ये तुम्ही पत्र लिहू शकता. 

सहभाग कसा नोंदवायचा ?

विद्यार्थी आपल्या शाळेत किंवा सातारा मुख्य टपाल कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवू शकतात.

बक्षिसे

राष्ट्रीय स्तर :

  1. 50 हजार रुपये व सुवर्णपदक
  2. 25 हजार रुपये व रौप्यपदक
  3. 10 हजार रुपये व कांस्यपदक

राज्य स्तर :

  1. प्रथम – 25 हजार
  2. द्वितीय – 10 हजार
  3. तृतीय – 5 हजार

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक रत्नाकर टोपारे यांनी केले आहे.

error: Content is protected !!