Kotak Kanya Scholarship 2023/कोटक कन्या स्कॉलरशिप-scholarship for girls

कोटक कन्या शिष्यवृत्ती 2023 ( scholarship for girls )

कोटक महिंद्रा समूहाच्या कंपन्यांचा एक समूह असून यांचा एक सहयोगी CSR प्रकल्प आहे. कोटक एज्यूकेशन फाऊंडेशनच्या वतीने समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमध्ये शिक्षण आणि उपजीविकेला प्रोत्सोहान देण्यासाठी ही शिष्यवृत्ती राबवली जात आहे. या शिष्यवृत्तीच मुख्य उद्दिष्ट कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत आणि हुशार विद्यार्थीनींना इयत्ता १२ वी नंतर व्यावसायीक शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेता याव त्यासाठी या मुलीनं आर्थिक सहाय्य देण्याच आहे.

Scholarship For Girl

१२ वी उत्तीर्ण झालेल्या आणि नामांकित संस्थांमधून (NAAC National Assessment and Accreditation Council / NIRF National Institutional Ranking Framework मान्यताप्राप्त) व्यावसायीक पदवी अभ्यासक्रम जस की अभियांत्रिकी, MBBS, आर्कीटेक्चर, एलएलबी ई. करण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना १.५ लाख रु प्रतिवर्ष शिष्यवृत्ती पदवी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी दिली जाते.

पात्रता

•संपूर्ण भारतातील विद्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
•अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीने १२ वी बोर्ड परीक्षेत ८५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण किंवा समतूल्य CGPA म्हणजेच Cumulative Grade Point Average मिळवलेले असावे.
•अर्ज करणाऱ्या विद्यार्थीनीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
•गुणवंत विध्यार्थीनी ज्यांनी शैक्षणिक वर्ष-२०२३ मध्ये प्रथम वर्षाच्या व्यावसायीक पदवी अभ्यासक्रमासाठी नामांकित संस्थांमधून (NAAC National Assessment and Accreditation Council / NIRF National Institutional Ranking Framework मान्यताप्राप्त) प्रवेश मिळवला आहे.

अपात्रता

•१२ बोर्ड परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा कमी टक्के असतील तर ती विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
•अर्ज करणाऱ्या विद्यार्थीनीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर.
•गुणवंत विध्यार्थींनी ज्यांनी शैक्षणिक वर्ष-२०२३ मध्ये प्रथम वर्षाच्या व्यावसायीक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला नसेल तर ती विध्यार्थीनी अपात्र ठरेल.

कागदपत्र कोणती लागणार आहेत ?

•मागील पात्रता परीक्षेची गुणपत्रिका म्हणजेच १२ वी ची गुणपत्रिका.
•पालकांचा उत्पन्नाचा पुरावा
•FY 2022-23 चा पालकांचा ITR (उपलब्ध असल्यास)
•महाविध्यालयाकडून बोनाफाईड विध्यार्थी प्रमाणपत्र
•फी सरंचना (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी)
•कॉलेज सीट वाटप दस्तएवज
•महाविध्यालयीन प्रवेश परीक्षेचे स्कोअर कार्ड
•आधार कार्ड
•बँक पासबूक
•पासपोर्ट आकाराचा फोटो
•अपंगत्व प्रमाणपत्र लागू असेल तर
•पालकांच मृत्यू प्रमाणपत्र (एकल पालक किंवा अनाथ उमेदवारांसाठी)

हे लक्षात ठेवा.

– अटी आणि नियम लागू. शिष्यवृत्तीची निवड आणि रक्कम पात्रता निकषांच्या पूर्ततेवर आधारित आहे आणि कोटक एज्यूकेशन फाऊंडेशनच्या विवेकबुद्धीनुसार असेल.
– फॉर्म व्यवस्थित भरून झाल्यावर दोन वेळ तरी चेक करा त्यानंतरच सबमीतट करा.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत – ३१ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा

कोटक कन्या स्कॉलरशिप २०२३/Kotak Kanya Scholarship 2023

तुम्हाला या बद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त गरजू मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा.

Leave a comment