जमिनीचा व्यवहार करताना सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन जमिनीचे चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले जातात. याचा शेतकऱ्यांसह खरेदी करणाऱ्याला सुद्धा चांगलाच फटका बसतो. त्यामुळे भविष्यात जमीन विकणाऱ्याला (land law) आणि खरेदी करणाऱ्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार करणे, एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणे, खरेदी करणाऱ्या व्यक्तीला अंधारात ठेऊन सरकारी किंवा वादग्रस्त जमिनींचा व्यवहार करणे, वारसा हक्क लपवून विक्री करणे या सर्व चुकीच्या व्यवहारांमुळे खरेदी करणारा चांगलाच गोत्यात येतो. या सर्व व्यवहारांमध्ये मधले दलाल चांगला पैसै छापून त्यांची बाजू सुरक्षित करून घेतात. परंतु खरेदी करणारा अडचणीत येतो. परंतु जर तुम्हाला याग्य कायेदशीर माहित असेल तर, तुम्ही अशा व्यवहारांच्या जाळ्यात फसू शकणार नाही.
सामान्य फसवणुकीचे प्रकार
- बनावट 7/12 उतारे आणि खोटी दस्तऐवज
- एका जमिनीचे अनेक व्यवहार
- मृत व्यक्तीच्या नावे अजूनही जमीन असणे
- बोगस पावर ऑफ अॅटर्नीवर विक्री
- शासकीय किंवा आदिवासी जमिनीची फसवून विक्री
खरेदी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे
- 7/12 उतारा व फेरफार नोंदी तपासा
- जमीन मालकी हक्क सिद्ध करणारे दस्तऐवज पाहा
- जमीन वादात आहे का, याची माहिती घ्या
- NA Order, बांधकाम परवानग्या व NOC तपासा
- पाणी, रस्ता, वीज यांची स्थिती जाणून घ्या
- जमीन खरेदी करताना वकीलाची मदत घ्या
महत्त्वाचे कायदे:
- IPC 420: फसवणुकीविरुद्ध गुन्हा दाखल करता येतो
- Registration Act, 1908: दस्तनोंदणी अनिवार्य
- Transfer of Property Act, 1882: मालकी हस्तांतरणाचे नियम
- Benami Act, 1988: बनावटी नावावर असलेल्या जमिनी प्रतिबंधित
- RERA कायदा: प्रोजेक्ट विकसकांचे पारदर्शक नियमन
- Maharashtra Land Revenue Code, 1966: जमिनीच्या महसूल नियमांची चौकशी
फसवणुकीपासून बचावासाठी काय कराल?
- सर्व कागदपत्रांची वकिलामार्फत पडताळणी करा
- ऑनलाईन 7/12 उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड तपासा
- ‘Encumbrance Certificate’ मागवा – म्हणजे कोणताही बोजा तर नाही?
- सरकारी वेबसाईटवरून जमीन वादग्रस्त आहे का ते तपासा
- व्यवहार नोंदणी पूर्ण झाल्यावरच पैसे द्या
फसवणूक झाल्यास काय करावे?
- स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करा (IPC 420 अंतर्गत)
- जिल्हा न्यायालय किंवा सिव्हिल कोर्टात दावा दाखल करा
- गरज पडल्यास जमीन सील करण्याची विनंती करा
- महसूल कार्यालयात तक्रार दाखल करा
जमिनीचे व्यवहार करताना भावनिक निर्णय न घेता, कायदेशीर आणि कागदोपत्री प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जमीन ही एक मोठी गुंतवणूक असते, आणि योग्य खबरदारी घेतल्यास तुम्ही अनेक प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता. आम्हाला आशा आहे या माहितीमुळे जमीन खरेदी करताना आवश्यक असा मुलभूत गोष्टींची तुम्हाला माहिती झाली असेल.
अशाच माहितीसाठी आपलं वॉट्सअप चॅनल आवर्जून फॉलो करा…