पिज्जा, बर्गर, मोमोस, चायनीज भेळ, वडा पाव, भजी या पदार्थांची नावं जरी घेतली तरी सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत. त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी हे सर्व पदार्थ म्हणजे एकप्रकारे पर्वणीच. घरात बनवलेली चपाती, डाळ, पौष्टिक भाज्या खाण्यापेक्षा बाहेरील पदार्थ लहान मुलांसह सर्वच अगदी चवीने खातात. कधी तरी बाहेरील पदार्थांचा अस्वाद घेणं एकवेळ चालून जातं. परंतू सतत बाहेरील पदार्थांवर ताव मारल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. लहान मुलांना शाळेत जाताना बऱ्याच वेळा मेदू वडा, वडा पाव सारखे तेलकट पदार्थ टिफीन बॉक्समध्ये दिल्याच मी स्वत: पाहिलं आहे. लहान मुलांसाठी सतत बाहेरचं खाणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. अशावेळी पालकांची डोकेदुखी वाढते आणि मुलांना नेमक काय बनवून खायला द्यायचं? हा प्रश्न त्यांना सतावत राहतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांसमोर एक मोठं आव्हान असतं ते म्हणजे दररोज मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट लंचबॉक्स तयार करणं! मुलांना आवडेल आणि त्याच वेळी शरीरासाठी उपयोगी असे पदार्थ निवडणं ही एक कला आहे. चला तर मग पाहूया काही सोप्या, चविष्ट आणि हेल्दी लंचबॉक्स आयडिया ज्या तुमच्या मुलांच्या पोटात आणि आरोग्यात दोन्ही भर घालतील.
१. भाज्यांनी भरलेला व्हेज पराठा
साहित्य: गाजर, मटार, पालक, थोडा चीज, गव्हाचं पीठ
फायदे
- भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन्स
- मुलांना चव आवडते
- दही किंवा चटणीसोबत दिल्यास पौष्टिकता वाढते
टिप: पराठ्याच्या आत चीजचा हलका लेयर दिल्यास मुलं अधिक उत्साहाने खातील.
२. पनीर आणि कॉर्न सँडविच
साहित्य: ब्राउन ब्रेड, पनीर, कॉर्न, मेयोनेझ किंवा हंग कर्ड
फायदे:
- प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत
- लंचबॉक्समध्ये सुकं आणि खायला सोपं
- मुलांना झटपट एनर्जी मिळते
टिप: टोस्ट करून दिल्यास ब्रेड सॉफ्ट राहत नाही आणि खायला कुरकुरीत वाटतो.
३. व्हेज पुलाव किंवा मिनी व्हेज फ्राईड राईस
साहित्य: तांदूळ, कांदा, मटार, गाजर, शिमला मिरची
फायदे:
- विविध भाज्यांमुळे शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये
- लंचमध्ये एक संपूर्ण जेवण
- हलकं आणि पचायला सोपं
टिप: हलका तूप किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा, मसाले कमी ठेवा.
४. एग रोल / ऑमलेट रोल
साहित्य: गव्हाची पोळी, अंडी, कांदा, टोमॅटो
फायदे:
- प्रोटीन भरपूर
- मुलांना रोल प्रकार खूप आवडतो
- चव आणि पौष्टिकता दोन्ही मिळते
टिप: टोमॅटो सॉस किंवा घरचा ग्रीन चटणीसह द्या.
Best Books For Women – महिलांनी आवर्जून वाचली पाहिजेत अशी पुस्तकं, जाणून घ्या एका क्लिकवर.
५. मूग डाळीचे कटलेट / टिक्की
साहित्य: मूग डाळ, गाजर, बटाटा, ब्रेड क्रम्ब्स
फायदे
- प्रोटीन आणि आयर्नने समृद्ध
- तळण्याऐवजी तव्यावर शॅलो फ्राय करा
- नाश्त्याला किंवा लंचबॉक्सला दोन्ही उपयोगी
६. फळांची मिनी सलाड बाऊल
साहित्य: सफरचंद, केळं, द्राक्षं, डाळिंब
फायदे
- नैसर्गिक साखर आणि व्हिटॅमिन्सचा स्त्रोत
- मध किंवा थोडा चाट मसाला घातल्यास मुलांना आवडते
टिप: फळं लिंबाच्या रसात मिक्स केल्यास काळी पडत नाहीत.
७. होममेड एनर्जी बॉल्स (Dry Fruit Laddu)
साहित्य: खजूर, बदाम, काजू, ओट्स, तूप
फायदे:
- स्नॅक म्हणून हेल्दी पर्याय
- लंचनंतर गोड खाण्याची इच्छा भागवते
- ऊर्जा टिकवून ठेवते
8. हेल्दी ड्रिंक पर्याय
उदा – घरगुती शेक्स, दूधात हळद, ड्रायफ्रूट मिल्क, लस्सी.
फायदा: हे पेय मुलांना उर्जा देतात आणि दिवसभर त्यांची एकाग्रता टिकवतात.
लंचबॉक्स तयार करताना लक्षात ठेवाव्या काही गोष्टी
- रंग आणि चव यांचा समतोल ठेवा कारण मुलांना रंगीत पदार्थ आवडतात.
- अति तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा.
- प्रोटीन + फायबर + कार्बोहायड्रेट्स यांचा योग्य समावेश करा.
- प्रेझेंटेशन आकर्षक ठेवा – कार्टून आकाराच्या डब्यात लहान तुकडे करून द्या.
- थोडा बदल दर 2-3 दिवसांनी करा जेणेकरून मुलांना आणि तुम्हाला सुद्धा कंटाळा येणार नाही.
लहान मुलांच्या आहारात चव आणि पौष्टिकता दोन्ही महत्त्वाच्या आहेत. दररोज थोडी कल्पकता आणि योग्य योजना केली तर मुलांचा लंचबॉक्स त्यांचं आवडतं जेवण बनू शकतो. त्यामुले वेळ न दवडता कल्पकतेचा वापर करून लंचबॉक्स बनवायला सुरुवात करा.
टीप :- या ब्लॉगमध्ये दिलेल्या आहार कल्पना या सामान्य माहितीवर आधारित आहेत. प्रत्येक मुलाची शरीररचना आणि पचनक्षमता वेगळी असते. त्यामुळे मुलांच्या आहारात कोणताही नवीन पदार्थ समाविष्ट करण्यापूर्वी बालरोग तज्ञ किंवा आहारतज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
Building Confidence in Kids – मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, वाचा स्टेप बाय स्टेप…