टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 / Technip Energies India Scholarship Program 2023-24/STEM Scholarship

विध्यार्थीनींसाठी सुवर्ण संधी इंजिनिअर होण्याचं स्वप्न आता पुर्ण होणार. टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 हा STEM क्षेत्रातील म्हणजेच (Science,Technology, Engineering, Mathematics) या क्षेत्रात आपल भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विध्यार्थीनींसाठी हा शिष्यवृत्ती उपक्रम आहे. टेक्निप एनर्जीज इंडिया, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या तत्वाखाली ही शिष्यवृत्ती ऑफर करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून STEM (Science, Technology, Engineering And Mathematics) या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थीनींचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी 30,000 हजार रु. एकवेळ शिष्यवृत्ती अनुदान दिले जाईल.

टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 / STEM Scholarship

पात्रता

• अर्ज करणारी विध्यार्थीनी इयत्ता 12वी मध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण असली पाहिजे.
• हि शिष्यवृत्ती फक्त दिल्ली NCR (गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद), बिहार, आसाम, राजस्थान, तमिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रातील विध्यार्थीनींसाठी आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीने BE/B.Tech च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला असावा. (केमिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग) कार्यक्रम.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 4,00,000 लाख रु. पेक्षा कमी असावे.

अपात्रता

• अर्ज करणारी विध्यार्थीनी इयत्ता 12वी मध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा कमी गुणांनी उत्तीर्ण झाली असेल तर.
• हि शिष्यवृत्ती फक्त दिल्ली NCR (गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद), बिहार, आसाम, राजस्थान, तमिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रातील विध्यार्थीनींसाठी आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीने BE/B.Tech च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला नसेल किंवा विध्यार्थीनी द्वितीय वर्षाला शिकत असेल तर ती या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 4,00,000 लाख रु. पेक्षा जास्त असेल तर संबंधीत विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्र कोणती लागणार आहेत

• अर्ज करणार्या विध्यार्थीनीची बारावीची गुणपत्रिका
• सरकारने जारी केलेला ओळखीचा एक पुरावा (आधार कार्ड/ मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड)
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचा कोणताही एक चालु वर्षाचा पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचे बॅंक खाते तपशील
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (ITR फॉर्म-16/सक्षम सरकारी अधिकाऱ्याकडून उत्पन्न प्रमाणपत्र/पगार स्लिप)
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

फायदा काय होणार

ज्या विध्यार्थीनीची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल, त्या भाग्यवान विध्यार्थीनींना एकवेळ शिष्यवृत्ती सहाय म्हणुन 30,000 रु. आर्थिक सहाय करण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतीम तारीख
31 डिसेंबर 2023

अर्ज करण्यासाठी लिंक
टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 / STEM Scholarship

Leave a comment