Nikon Scholarship Program – फोटोग्राफीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती!

ताई तुझा एक फोटो काढू का… असं म्हणत सुंदर सुंदर फोटो (Nikon Scholarship Program) काढून कंटेंट क्रिएट करणाऱ्या क्रिएटर्सची अफाट संख्या सोशल मीडियावर आहे. काही नवखे आहेत, तर काही या क्षेत्रात चांगले मुरलेले आहेत. फोटोग्राफीची आवड असणारा प्रत्येकजण आपल्या कलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पण बऱ्याच वेळा आर्थिक अडचणींमुळे प्रतिभा असूनही विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये व्यावसायिक शिक्षण पूर्ण करणे कठीण जाते. 

हीच बाब लक्षात घेऊन निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ‘Nikon Scholarship Program 2026-27’ ची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष उपक्रमाचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे आणि त्यांच्यातील कौशल्याला प्रोत्साहन देणे हा आहे. 

१. शिष्यवृत्तीचे मुख्य स्वरूप व फायदे (Benefits)

  • आर्थिक मदत: निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना ₹१,००,००० (१ लाख रुपये) पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.
  • फीनुसार रक्कमेचे वाटप: ही शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या फोटोग्राफी कोर्सच्या प्रत्यक्ष फी स्ट्रक्चरवर (Actual Fee Structure) आधारित असेल.
  • कौशल्याला वाव: या मदतीमुळे विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे मूलभूत ज्ञान, प्रगत तंत्रज्ञान (Advanced Techniques) आणि स्वतःची कला विकसित करण्यास मदत होईल.

२. पात्रता निकष (Eligibility Criteria)

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • राष्ट्रीयत्व: अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • शैक्षणिक पात्रता: विद्यार्थी १२ वी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतून) असावा.
  • कोर्सचा प्रकार: अर्जदार सध्या किमान ३ महिने कालावधीच्या कोणत्याही व्यावसायिक (Professional) फोटोग्राफी कोर्समध्ये शिक्षण घेत असावा.
  • उत्पन्नाची अट: सर्व मार्गांनी मिळून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹६,००,००० (६ लाख रुपये) पेक्षा जास्त नसावे.
  • व्हिडिओ इंटरअॅक्शन: शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी दिलेल्या प्रक्रियेनुसार ‘व्हिडिओ इंटरअॅक्शन’ पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  • अपवाद: निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांची मुले या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

Google Scholarship 2026 – विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया

३. आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

अर्ज करताना खालील कागदपत्रांची डिजिटल कॉपी (Scan Copy) तयार ठेवावी:

  • छायाचित्र: पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखपत्र: वैध सरकारी फोटो ओळखपत्र (उदा. मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड इ.)
  • शैक्षणिक पुरावे: १२ वी ची मार्कशीट आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे
  • प्रवेशाचा पुरावा: सध्या सुरू असलेल्या फोटोग्राफी कोर्सचा प्रवेश पुरावा (फी पावती, फी स्ट्रक्चर, बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा आयडी कार्ड)
  • उत्पन्नाचा दाखला: कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला (फॉर्म १६, पगाराची स्लिप, ITR किंवा अधिकृत दाखला)
  • बँक तपशील: विद्यार्थ्याच्या बँक पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला चेक (Cancelled Cheque)

४. महत्त्वाची तारीख (Important Date)

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ ऑगस्ट २०२६

(टीप: ही तारीख तात्पुरती असून, संस्थेच्या निर्णयानुसार यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा.)

५. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (How to Apply)

या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – Photography Scholarship


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!