बँकिंग (IBPS Recruitment 2026) क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिनाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेली अनेक महिने किंवा वर्ष तुम्ही अभ्यास करत असाल, अनेक रात्र तुम्ही अभ्यास करण्यासाठी घालवली असतील. आता आणखी काही दिवस याच जोशात अभ्यास करून तुम्ही एक महत्त्वाचा टप्पा पार करणार आहात. न्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) तर्फे सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांमधील लिपिक (Clerk / Customer Service Associate) या पदांसाठी ११,४०३ रिक्त जागांवर बंपर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील सर्व आवश्यक तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
भरतीची संक्षिप्त माहिती (Overview)
| तपशील | माहिती |
| संस्था | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) |
| पद नाव | लिपिक (Clerk / Customer Service Associate) |
| एकूण जागा | ११,४०३ |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| अधिकृत संकेतस्थळ | www.ibps.in |
शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कौशल्ये
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
-
पदवी: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.
-
संगणक साक्षरता (Computer Knowledge):
-
संगणक प्रणालीमध्ये कार्य करण्याचे ज्ञान अनिवार्य आहे.
-
उमेदवाराकडे संगणक विषयात प्रमाणपत्र (Certificate), डिप्लोमा किंवा पदवी असावी किंवा हायस्कूल/कॉलेज स्तरावर संगणक/माहिती तंत्रज्ञान (IT) हा विषय अभ्यासलेला असावा.
-
वयोमर्यादा (Age Limit)
उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२६ रोजी २० ते २८ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
नियमानुसार वयोमर्यादेत सवलत:
-
ओबीसी (OBC) प्रवर्ग: ३ वर्षे सवलत
-
एससी/एसटी (SC/ST) प्रवर्ग: ५ वर्षे सवलत
-
दिव्यांग (PwD) प्रवर्ग: १० वर्षे सवलत
परीक्षा व नोंदणी शुल्क
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाईल:
-
सर्वसाधारण (General) आणि ओबीसी (OBC) उमेदवार: ₹८५०/-
-
एससी (SC), एसटी (ST) आणि दिव्यांग (PwD) उमेदवार: ₹१७५/-
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
-
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १ ऑगस्ट २०२६
-
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ ऑगस्ट २०२६
-
पूर्व परीक्षा (Prelims Exam): ऑक्टोबर २०२६
-
पूर्व परीक्षेचा निकाल: नोव्हेंबर २०२६
-
मुख्य परीक्षा (Mains Exam): डिसेंबर २०२६
-
नियुक्ती पत्र (Provisional Allotment): मार्च २०२७
भरती प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या प्रमुख बँका
या मेगाभरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना खालील ११ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे:
-
बँक ऑफ महाराष्ट्र
-
बँक ऑफ बडोदा
-
बँक ऑफ इंडिया
-
कॅनरा बँक
-
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
-
इंडियन बँक
-
इंडियन ओव्हरसीज बँक
-
पंजाब नॅशनल बँक
-
पंजाब अँड सिंध बँक
-
यूको बँक
-
युनियन बँक ऑफ इंडिया
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर संगणक आधारित परीक्षांद्वारे (CBT) होईल:
-
पूर्व परीक्षा (Preliminary Examination)
-
मुख्य परीक्षा (Mains Examination)
-
कागदपत्र पडताळणी (Document Verification)
अर्ज कसा करावा?
-
उमेदवारांनी सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर भेट द्यावी.
-
होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘IBPS Clerk Recruitment 2026’ या लिंकवर क्लिक करावे.
-
सर्व आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
-
आवश्यक कागदपत्रे आणि फोटो/स्वाक्षरी अपलोड करावी.
-
शेवटी परीक्षा शुल्क भरून अर्जाची प्रिंटआउट काढू ठेवावी.
टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून सर्व माहिती खात्रीशीर करून घ्यावी. अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.