७५,००० रु. पर्यंत शिष्यवृत्ती आणि संपूर्ण शुल्क माफी, निरंकारी राजमाता शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ / Nirankari Rajmata Scholarship 2023-24.

७५,००० रु. पर्यंत शिष्यवृत्ती आणि संपूर्ण शुल्क माफी. गरजू, गुणवंत आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या हुशार विध्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करताना कोणताही अढतळा येऊ नये यासाठी निरंकारी राजमाता शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ विध्यार्थ्यांना अर्थीक सहकार्य करणार आहे. संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने ही शिष्यवृत्ती राबवण्यात येत आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत पदवी (Scholarship for undergraduate students in India) किंवा पदव्यूत्तर (Scholarship for post graduate students in India) स्तरावर तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना या संत निरंकारी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

निरंकारी राजमाता शिष्यवृत्ती २०२३-२४ / Scholarship for undergraduate students in India / Scholarship for post graduate students in India / Scholarship for girls

या शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हायच असेल तर

• अर्ज करणारा विध्यार्थी केंद्र किंवा राज्य सरकार-मान्यताप्राप्त संस्था किंवा विध्यापीठाचा नियमित विध्यार्थी असावा.
• स्पर्धात्मक लेखी परीक्षेद्वारे संस्था किंवा विध्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.
• खालीलपैकी एका विषयातील अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा. जसे की
1. अभियांत्रिकी पदवी (किंवा समतूल्य विषय)
2. आर्किटेक्चर
3. सीए (सीपीटी परीक्षा पात्र झाल्यानंतर)
4. मेडिसीनमध्ये पदवीधर पदवी (अॅलोपॅथीक/आयूर्वेदीक/होमिओपॅथीक)
5. एमबीए किंवा पीजीडीएम
6. CFA (फाऊंडेशन चाचणी पात्र झाल्यानंतर)
7. एलएलबी (पदवी परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर किंवा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर)
8. पत्रकारिता किंवा जनसंवाद
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला १२वी च्या परीक्षेत किमान ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असले पाहिजेत.
• सर्व स्त्रोतांकडून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३,५०,००० रु पेक्षा कमी असाव.

शिष्यवृत्तीसाठी अपात्रता काय आहे ? (Scholarship for undergraduate students in India / Scholarship for post graduate students in India / Scholarship for girls).

• अर्ज करणार विध्यार्थी केंद्र किंवा राज्य सरकार-मान्यताप्राप्त संस्था किंवा विध्यापीठाचा नियमित विध्यार्थी नसेल तर तो या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने जर स्पर्धात्मक लेखी परीक्षेद्वारे संस्था किंवा विध्यापीठात प्रवेश घेतलेला नसेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• वरील पात्रतेच्या निकशांमध्ये देण्यात आलेल्या विषयांतील अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला नसेल तर संबधीत विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला १२वी च्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तर तो विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाही.
• सर्व स्त्रोतांकडून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३,५०,००० रु पेक्षा जास्त असेल तर विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? (Scholarship for undergraduate students in India / Scholarship for post graduate students in India / Scholarship for girls).

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• खलील कागदपत्रांची स्वयं-साक्षांकित प्रत:
 अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याच्या कुटुंबातील सर्व कमावत्या सदस्यांचे नवीन पेस्लिप आणि आयटी रिटर्न किंवा क्षेत्र एसडीएम किंवा बीडीओ किंवा तहसीलदार यांनी जारी केलेले कुटुंब उत्पन्न प्रमाणपत्र.
 विध्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेने दिलेले प्रवेशपत्र
 पूर्वीच्या शैक्षणिक पात्रतेच्या मार्कशीट, इयत्ता १० वी पासून सुरू होणारी
 इयत्ता १०वी आणि १२वी चे सर्टीफीकेट
 उत्तीर्ण झालेल्या सर्व सेमिस्टर परीक्षांच्या निकालांची प्रत
 रेशन कार्ड/आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/पॅन कार्ड किंवा इतर कोणताही रहिवासी पुरावा.
 विध्यापीठ किंवा संस्थांनी जरी केलेल्या नवीनतम फी पावतीची प्रत
 पासबूकची प्रत आणि अर्थीक मदत पाठवण्यासाठी विध्यार्थ्याच्या बचत बँक खत्यातून रद्द केलेल चेक (जर विध्यार्थ्याने संस्थेत/महाविध्यालयात फी आधीच जमा केली असेल आणि परतफेड मागत असेल तर)
• संस्थेने दिलेले प्रमाणपत्र
 विध्यार्थ्याला इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळणार नाही किंवा प्राप्त होणार नाही.
 विध्यार्थ्याने व्यवस्थापन किंवा संयोजक कोट्यातून किंवा इतर कोणत्याही कोट्यातून प्रवेश घेतलेला नाही.
 सर्व स्त्रोतांकडून विध्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक ३,५०,००० रु पेक्षा जास्त नाही.

या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास फायदा काय होणार. (Scholarship for undergraduate students in India / Scholarship for post graduate students in India / Scholarship for girls).

शिष्यवृत्तीसाठी यशस्वीरीत्या पात्र ठरलेल्या विध्यार्थ्यांना वार्षिक ७५ हजार रु पर्यंत संपूर्ण शिक्षण शुल्क मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
३० नोव्हेंबर २०२३

हे लक्षात ठेवा

• शिष्यवृत्तीचे नूतनीकरण जर विध्यार्थ्याला करायच असेल तर चांगला अभ्यास करून दरवर्षी किमान ७५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
• फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि भरून झाल्यावर दोन वेळा चेक करा.
• चांगल शिक्षण घ्या आणि त्या शिक्षणाचा प्रसार करा.

अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहे एक म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरून आणि दुसरी पद्धत पोस्टाद्वारे सुद्धा तुम्ही अर्ज पाठवू शकता.

अर्ज करण्यासाठी लिंक – Nirankari Rajmata Scholarship 2023-24. किंवा Scholarship for undergraduate students in India / Scholarship for post graduate students in India / Scholarship for girls

अर्ज करण्यासाठी पत्ता

शिक्षण विभाग,
संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन,
८०-ए, अवतार मार्ग,
संत निरंकारी कॉलनी, दिल्ली-११०००९

Leave a comment