मुलींसाठी ५०,००० रु AICTE Pragati Scholarship for girls २०२३-२४ / प्रगती शिष्यवृत्ती

मुलींसाठी ५०,००० रु. AICTE Pragati Scholarship for girls म्हणजेच प्रगती शिष्यवृत्ती २०२३-२४. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे लागू करण्यात येणारी सरकारी शिष्यवृत्ती आहे. या Pragati Scholarship चा उद्देश समाजातील आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विध्यार्थीनींना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी आर्थीक पाठबळ पुरवणे आणि त्यांच्या शिक्षणात कोणताही आढतळा येऊ नये यासाठी प्रयत्न करणे. आर्थिक सहाय्य पूढील प्रमाणे देण्यात येईल जस की, प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विध्यार्थीनीला जास्तीत जास्त ४ वर्षांसाठी आणि द्वीतीय वर्षाला शिकत असणाऱ्या विध्यार्थींनींसाठी जास्तीत जास्त ३ वर्षे लॅटरल एंट्री द्वारे एकरकमी रक्कम देण्यात येईल. या रक्कमेमध्ये महाविध्यालयाची फी भरणे, संगणक, स्टेशनरी, पुस्तके, उपकरणे, सॉफ्टवेअर ई. खरेदी करणे. महत्वाच म्हणजे वसतिगृह शुल्क आणि वैधकीय शुल्क इत्यादींच्या बदल्यात कोणतेही अतिरिक्त अनुदान देय असणार नाही. ज्या विध्यार्थीनींची निवड होईल त्यांना प्रत्येक वर्षाच्या अभ्यासासाठी वार्षिक ५० हजार रु. शिष्यवृत्ती मिळेल.

मुलींसाठी AICTE Pragati Scholarship for girls २०२३-२४

पात्रता

• फक्त मुली या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
• मान्यताप्राप्त AICTE संस्थांमध्ये पूर्ण-वेळ प्रथम वर्ष डिप्लोमा किंवा पदवी प्रोग्राममध्ये प्रवेश घेतलेला असावा.
• कुटुंबांचे वार्षिक उत्पन ८ लाख रु. पेक्षा कमी असावे.

अपात्रता

• मूल या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• जर अर्ज करणारी विध्यार्थीनी AICTE संस्थेमध्ये पूर्ण-वेळ प्रथम वर्ष डिप्लोमा किंवा पदवी प्रोग्राममध्ये शिकत नसेल तर संबधीत विध्यार्थीनी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर ८ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर अर्ज करणारी विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

• इयत्ता १०वी आणि १२वी ची मार्कशीट
• आधार कार्ड
• राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने जारी केलेले वैध्य उत्पन्न प्रमाणपत्र
• तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पत्र.
• संस्थेचे संचालक किंवा प्राचार्य किंवा प्रमुख यांनी जरी केलेले प्रमाणपत्र
• शिक्षण शूलकाची पावती
• बँक खाते पासबुक अर्जदारांचे छायाचित्र, खाते क्रमांक आणि IFSC कोड दर्शविणारे आधार कार्डला कनेक्ट असणारे.
• जात प्रमाणपत्र (SC, ST किंवा OBC उमेदवारांसाठी लागू)
• अर्जामध्ये प्रदान केलेल्या माहितीच्या अचुकतेची पुष्टी करणारी पालकांनी रीतसर स्वाक्षरी केलेली घोषणा.

फायदा काय होणार

विध्यार्थीनींची निवड होईल त्यांना प्रत्येक वर्षाच्या अभ्यासासाठी वार्षिक ५० हजार रु. शिष्यवृत्ती मिळेल. प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विध्यार्थीनीला जास्तीत जास्त ४ वर्षांसाठी आणि द्वीतीय वर्षाला शिकत असणाऱ्या विध्यार्थींनींसाठी जास्तीत जास्त ३ वर्षे लॅटरल एंट्री द्वारे एकरकमी रक्कम देण्यात येईल. या रक्कमेमध्ये महाविध्यालयाची फी भरणे, संगणक, स्टेशनरी, पुस्तके, उपकरणे, सॉफ्टवेअर ई. खरेदी करणे. महत्वाच म्हणजे वसतिगृह शुल्क आणि वैधकीय शुल्क इत्यादींच्या बदल्यात कोणतेही अतिरिक्त अनुदान देय असणार नाही

हे लक्षात ठेवा

• प्रती कुटुंब दोन मुली या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
• फॉर्म कळीजपूर्वक भरा आणि दोन वेळा चेक करा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
३१ डिसेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक
AICTE Pragati Scholarship for girls २०२३-२४

Leave a comment