ईयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकत असणार्या विध्यार्थ्यांसाठी १०,००० हजार रु.ची शिष्यवृत्ती / SBI Asha Scholarship

ईयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकत असणार्या विध्यार्थ्यांसाठी १०,००० हजार रु.शिष्यवृत्ती. SBI Asha Scholarship किंवा एसबीआय आशा शिष्यवृत्ती हा २०२३ चा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. ही स्कॉलरशिप SBI Foundation scholarship किंवा एसबीआय फाऊंडेशनच्या इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) च्या वतीने राबवण्यात येत आहे. SBI Foundation स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) CSR शाखा आहे. बँकेपूर्त मर्यादित न राहता बँकेच्या पलीकडे जावून सेवा करण्याची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे. SBI Foundation scholarship सध्या भारतातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्रामीण विकास, आरोग्यसेवा, शिक्षण, उपजीविका आणि उध्योजकता, युवा सक्षमीकरण, सामाजिक-आर्थीक क्षेत्रात योगदान देणे तसेच विविध खेळांना प्रोत्सोहान देण्यासाठी कार्य करते.
SBI Asha Scholarship चा मुख्य उद्देश सर्व भारतातील कमी-उत्पन्न कुटुंबातील गुणवंत, हुशार आणि आर्थीक बाजू कमकुवत असणाऱ्या विध्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य रहाव कोणताही खंड पडू नये या उद्देशाने ही शिष्यवृत्ती विध्यार्थ्यांसाठी आमलात आणली जात आहे. SBI Asha Scholarship अंतर्गत इयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना १०,००० रु.आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

SBI Asha Scholarship किंवा एसबीआय आशा शिष्यवृत्ती २०२३

पात्रता (SBI Asha Scholarship)

• संपूर्ण भारतातील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
• इयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकणारे विध्यार्थी पात्र आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५ टक्के गुण मिळवलेले असले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून मिळून ३ लाख रु. पेक्षा कमी असल पाहिजे.

अपात्रता (SBI Asha Scholarship)

• भारता बाहेरील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी अपात्र.
• इयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकणारे विध्यार्थी पात्र आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात ७५ टक्के पेक्षा कमी गुण मिळवलेले असतील तर अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून मिळून ३ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर अपात्र.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? (SBI Asha Scholarship)

• मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• सरकारने जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड).
• चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती / प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र / बोनफाईड प्रमाणपत्र).
• अर्जदाराचे किंवा पालकांचे बँक खाते तपशील.
• उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म १६A / सरकारी प्राधिकारणाकडून मिळकत प्रमाणपत्र / पगार स्लिप्स इ.)

फायदा काय होणार (SBI Asha Scholarship)

६वी ते १२वी मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना एक वर्षासाठी १०,००० रु. आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार.

हे लक्षात ठेवा (SBI Asha Scholarship)

• फॉर्म काळजीपूर्वक भरा.
• फॉर्म भरून झाल्यावर दोन वेळा चेक करा.
• ही माहिती जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचवा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
३० नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक
SBI Asha Scholarship / SBI Foundation scholarship

Leave a comment