५० हजार रु शिष्यवृत्ती, DXC प्रोग्रेसिंग माइंड्स स्कॉलरशिप २०२३-२४ / DXC Progressing Minds Scholarship 2023-24

५० हजार रु शिष्यवृत्ती रक्कम DXC प्रोग्रेसिंग माइंड्स स्कॉलरशिप प्रोग्राम २०२३-२४ अंतर्गत हा स्कॉलरशिप उपक्रम राबवण्यात येत आहे. गरीब आणि होतकरू हुशार विध्यार्थ्यांच्या क्रीडा किंवा शैक्षणिक खर्चाला चालना देण्यासाठी हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात आला येत आहे. या राष्ट्रीयस्तरीय शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, STEM म्हणजेच Science, Technology, Engineering, Math या क्षेत्रात शिकत असलेल्या मुली आणि ट्रान्सजेंडर विध्यार्थ्याना शिक्षणासाठी हि शिष्यवृत्ती मदत करणार आहे. तसेच राज्य/राष्ट्रीय/अंतराष्ट्रीय स्तरावर राज्य/देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या महिला खेळाडूंना देखील प्रोत्सोहान देणार आहे.

Scholarship For Girls / Science, Technology, Engineering, Math या क्षेत्रातील पदवीधर विध्यार्ध्यांसाठी DXC प्रोग्रेसिंग माइंड्स शिष्यवृत्ती.

पात्रता

• भारतातील विध्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
• STEM संबधित क्षेत्रात कोणत्याही वर्षी पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुली आणि ट्रान्सजेंडर विध्यार्थी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील वर्ग किंवा सेमिस्टर मध्ये कमीत कमी ६० टक्के गुण प्राप्त केलेल असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी किंवा समान असावे.
• दिव्यांग विध्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

अपात्रता

• भारताबाहेरील विध्यार्थी अपात्र.
• STEM संबधीत क्षेत्रा व्यतीरीक्त इतर क्षेत्रात शिकणारे विध्यार्थी या शिष्यवृत्तीसठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील वर्ग किंवा सेमिस्टर मध्ये ६० टक्के पेक्षा कमी गुण मिळाले असतील तर ते विध्यार्थी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ४ लाखांपेक्षा जास्त असेल तर तो विध्यार्थी अपात्र.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• मागील वर्षाची गुणपत्रिका.
• प्रवेश घेतलेल्या संस्थेचा पुरावा (प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र ई.)
• शैक्षणिक खर्चासाठी देय पावत्या जसे की वसतिगृह फी, शिक्षण शुल्क, पुस्तके, मेस फी ई. संपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या फी रचनेसह.
• इयत्ता १२ वी ची मार्कशीट
• ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स ई.)
• बँक पासबुक
• ट्रान्सजेंडर आणि शारिरीक अपंगत्वासाठी कागदपत्र पुरावा (लागू असेल तर)

शिष्यवृत्तीचा फायदा
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास ५० हजार रु ही रक्कम.

हे लक्षात ठेवा.

• फॉर्म काळजीपूर्वक भरा.
• फॉर्म भरून झाल्यावर दोन वेळा वाचा.

खेळाडूंसाठी DXC स्कॉलरशिप २०२३-२४

पात्रता

• अर्ज करणाऱ्या खेळाडूचे वय १३ ते २५ वर्ष या दरम्यान असावे.
• ज्या मुलींनी गेल्या २ किंवा ३ वर्षांत राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरवर राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे असे विध्यार्थी पात्र असणार आहेत.
• फक्त इयत्ता ८ वी ते पदव्यूत्तर अभ्यासक्रमात शिकणारे विध्यार्थी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५ लाख रु. पेक्षा कमी किंवा समान असावे.

अपात्रता

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वय १३ वर्षापेक्षा कमी किंवा २५ वर्षापेक्षा जास्त असेल तर संबधीत विध्यार्थी अपात्र ठरेल.
• ज्या मुलींनी मागील २ किंवा ३ वर्षांत राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरवर राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीत्व केले नसेल असे विध्यार्थी अपात्र असणार आहेत.
• फक्त इयत्ता ८ वी ते पदव्यूत्तर अभ्यासक्रमात शिकणारे विध्यार्थी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर तो विध्यार्थी अपात्र असेल.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• वैध ओळखपत्र जसे की आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदार ओळखपत्र.
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा जस की आयटीआर रिटर्न, पगाराच्या स्लिप्स, संबधित सरकारी प्राधिकरणाची पत्रे ई.
• शैक्षणिक खर्चासाठी देय पावत्या, जसे की शिक्षण शुल्क, वसतिगृह फी, मेस फी ई. संपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या फी रचनेसह.
• क्रीडा श्रेणी प्रमाणपत्र.
• क्रीडा सहभाग प्रमाणपत्र.
• बँक पासबुक.
• ट्रान्सजेंडर आणि शारीरिक अपंगत्वासाठी कागदपत्र पुरावा. (लागू असल्यास)

हे लक्षात ठेवा

• फॉर्म काळजीपूर्वक भरा.
• फॉर्म भरून झाल्यावर दोन वेळा वाचा.
• शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये क्रीडा उपकरणे, प्रशिक्षक शुल्क, प्रवास, निवास इत्यादी सारख्या क्रीडा संबंधीत खर्चांचा समावेश होतो.

फायदा

१ लाख २५ हजार रु. ही रक्कम शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विध्यार्थ्याला मिळेल.

फॉर्म भरण्याची अंतिम मुदत
३१ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्यासाठी खालील लिंक ओपन करा
DXC प्रोग्रेसिंग माइंड्स स्कॉलरशिप २०२३-२४ / DXC Progressing Minds Scholarship 2023-24

Leave a comment