बलात्काऱ्यांना ठोकणारे Encounter Man Of India, कोण आहेत VC Sajjanar?

हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबर 2019 रोजी देशाला हादरवून सोडणारी बलात्काराची घटना घडली. नराधमाने 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरची बलात्कार करून निर्घृण हत्या केली. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. मोर्चे, आंदोलनं आणि रास्ता रोको सारख्या घटना देशभरात घडल्या, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. परंतु निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यास ज्या प्रकारे दिरंगाई झाली. त्या प्रमाणेच या प्रकरणात सुद्धा दिरंगाई होणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र घटना घडल्यानंतर 10 दिवसांच्या आत 6 डिसेंबर 2019 रोजी सर्व चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. त्याच ठिकाणी नराधमांचा एन्काऊंटर करण्यात आला. हा एन्काउनटर करण्यामागे सर्वात मोठा हात होता तो सायबराबादचे पोलीस आयुक्त vc sajjanar यांचा.

फक्त 10 दिवसात पीडितेला न्याय मिळाल्यामुळे व्ही.सी. सज्जनार हे देशभरात चर्चेचा विषय ठरले. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाची थाप पडली. मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार आणि चंताकुता चेन्ना केशवुलु या चारही आरपींना त्यांना यमसदनी धाडले आणि पीडितेला न्याय दिला. गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई, उरण, कोलकाता आणि बदलापूर या शहरांमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे दोषींना भर चौकात फाशी देण्यात यावी किंवा त्यांचा एन्काऊंटर करण्यात यावा अशी जनसामान्यांची तीव्र भावना आहे. या दुर्दैवी घटनांमुळे व्ही.सी. सज्जनार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोण आहेत व्ही.सी सज्जनार? त्यांचे गाव कोणते? त्यांचे शिक्षण किती झाले? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा.

व्ही.सी.सज्जनार यांची जबरदस्त कारकीर्द (Who Is VC Sajjanar)

VC Sajjanar यांचा जन्म कर्नाटकातील पगडी ओनी, हु्बळी येथे 24 ऑक्टोबर 1968 साली झाला. त्यांचे वडील सीबी सज्जनार हे कर सल्लागर आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणीच त्यांना शिक्षणाचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर वडील समाज कार्यात सक्रीय असल्यामुळे समाजात घडत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टींची त्यांना माहिती मिळत गेली. कुटुंबियांच्या छत्रछायेखाली त्यांचे हुबळी येथून प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांना जेजी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कर्नाटक विद्यापीठाच्या कौसली इन्स्टीट्यूट इन मॅनेजमेंड स्टडीजमधून MBA चे शिक्षण पूर्ण केले. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो असे म्हणतात तसेच व्ही सी सज्जनार यांच्या यशामागे नक्कीच त्यांच्या पत्नी अनुपा सज्जनार यांचा तितकाच हात आहे.

जानगाव ते सायबराबाद

VC Sajjanar हे 1996 च्या बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. त्यांनी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जानगावातून सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली. बेधडक स्वभावामुळे वेगवेगळ्या पदांवर आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी निर्विवाद पण हाताळल्या. त्यांनी OCTOPUS आणि आर्थिक गुन्हे शाखेत (CID) पोलीस अधिक्षक म्हणून पदभार सांभाळला. तसेच पोलीस उपमहानिरीक्षक (Special Intelligence Branch) आणि पोलीस महानिरीक्षक (Special Intelligence Branch) या पदांवर काम केले. त्यानंतर त्यांची नियुक्ती इंटेलिजन्स विंग येथे झाली. मार्च 2018 साली त्यांनी सायबराबाद पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला.

महिला आणि मुलांची सुरक्षा ते माओवाद्यांचा कर्दनकाळ

सिंघम चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला असले. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटलं असेल की, रियल लाईफमध्ये सुद्धा सिंघम सारखा पोलीस अधिकारी असला पाहिजे. व्ही सी सज्जनगार यांची भेदडक कारकीर्द पाहता देशभरातली नागरिकांनी रियल लाईफमध्ये सिंघम पाहिला, असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. सायबराबाद पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेताच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. राज्यातील गुन्हेगार त्यांच्या रडारवर होते. वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना राबवल्या. त्याच बरोबर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी आयटी क्षेत्राच्या विकासाला हातभार लावला. महिला आणि मुलांच्या सुरक्षेला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. तसेच आयटी क्षेत्रची सुरक्षा, रस्ते अपघात आणि वाहतूक समस्या या सर्व समस्यांच्या मुळाशी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष ते या सर्व समस्यांवर काम करत आहेत. शांत, संयमी आणि वेळ पडेल तेव्हा दोषींचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. डिसेंबर 2008 साली तेलंगणातील वारंगळ जिल्ह्यात झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींचा सुद्धा त्यांनी एन्काऊंटर केला होता.

टप्याटप्याने सज्जनार यांनी एक एक गोष्ट हाताखाली घेतली. त्यांनी आता आपला मोर्चा माओवाद्यांच्या दिशेने वळवला आणि त्यांना यश सुद्धा मिळाले. तेलंगणातील माओवादी कारवाया मोडून काढण्यात व्ही सी सज्जनार यांची भूमिका महत्वाची होती. व्ही सी सज्जनार आणि त्यांच्या पूर्ण टीमने तेलंगणातील माओवादी कारवाया पूर्णपणे थांबवण्यासाठी विविध धोरणे आखली. त्यामुळे माओवाद्यांचा हालचाल पूर्णपणे थांबली. “व्ही. सी. सज्जनार यांच्या देखरेखीखाली माओवाद्यांची कोणतीच हालचाल दिसत नव्हती.” असे पोलीस महासंचालक एम महेंद्र रेड्डी यांना त्यावेळी अभिमानाने सांगीतले होते.

Encounter Man Of India

The Hyderabad Vet Rape Case 2019 मध्ये दोषींच्या केलेल्या एन्काऊंटरमुळे व्ही सी सज्जनार खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. परंतु 2008 साली झालेल्या Acid Attack Case मध्ये त्यांनी पीडितांना दिलेल्या न्याय तेव्हा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. 2008 मध्ये सज्जनार तेलंगणातील वारंगल जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. वारंगलमधील काकतिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगला प्रणिता आणि स्वप्निका या विद्यार्थीनी शिक्षण घेत होत्या. त्यावेळी नराधम श्रीनीवासने स्वप्निका समोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला, मात्र तिने त्याला नकार दिला. याच रागातून नराधमाने स्वप्निका आणि तिची मैत्रीण प्रणिता हीच्यावर अॅसिड फेकले. या दुर्घटनेत स्वप्निकाचा जागीच मृत्यू झाला, तर प्रणिता उपचारानंतर बरी झाली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. जेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, तेव्हा व्ही सी सज्जनार यांच्या टीमने त्यांना घटनास्थळी नेले. त्याचवेळी आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि या झटापटीत तिन्ही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.

गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात घडत असलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे दोषींना फाशीची शिक्षा दिली जावी. तसेच कायद्यात बदल करावा अशी मागणी वाढत आहे. त्याचबरोबर VC Sajjanar सारख्या अधिकाऱ्यांना अशा केसेस द्यावात अशी मागणी सुद्धा सामान्यांची आहे. दोषींना कशपद्धतीची शिक्षा दिली पाहिजे. तुम्हाला काय वाटत हे कंमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात महत्वाचे आपल्या आजबाजूला असणाऱ्या मुली आणि तरुणी यांची मित्र आणि भाऊ म्हणून सुरक्षा करा.

Leave a comment