सोलापूरच्या कुर्डूवाडीतून आलेला आणि God OF Tennis Cricket म्हणून प्रचलित असणारा कृष्णा सातपूते साऱ्या टेनिस विश्वाला माहित आहे. महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले हे रत्न आज देशासह जगामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. याच पश्चिम महाराष्ट्रातून नावारुपाला आलेलं आणखी एख रत्न म्हणजे Vijay Pawale. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांची दांडी गूल करणारा विजय पावले सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. फक्त गोलंदाजीच नव्हे तर वेळ पडल्यास पाच चेंडूच पाच षटकार ठोकण्याची किमया सुद्धा त्याने साधली आहे. Maharashtra Premier League चा हंगाम विजय पावलेने गाजवला आणि पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. मुनाफ पटेल, शॉन पॉलॉक सारख्या दिग्गज गोलंदाजांकडून त्याने गोलंदाजी धडे घेतले आहेत. सचिन तेंडूलकरला सुद्धा आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे. अशा या सांगलीच्या पठ्ठ्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. चला तर जाणून घेऊया विजय पावलेचा संपूर्ण जीवन प्रवास
सांगलीच्या छोट्याशा गावात जन्म
विजय पावले सर्व साधारण गरीब कुटुंबातून वरती आलेला आहे. सांगली जिल्ह्यातील मांगले या टुमदार खेडेगावात त्याचा जन्म झाला. घरती परिस्थिती हालाकीची होती. त्यामुळे त्याचे सर्व शिक्षण गावीच झाले. लहानपणापासून त्याला क्रिकेटची प्रचंड आवड. शालेय जीवनातच त्याने आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवण्यास सुरुवात केली होती. लयबद्ध गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा तो तितक्याच चांगल्या पद्धतीने करत होता. मात्र, ग्रामीण भागात असल्यामुळे त्या काळात त्याला फार संधी मिळाली नाही. घरची परिस्थिती हलाकीची होती त्यामुळे मिळेल ते काम त्याने त्या काळात केले. परंतु या सर्व गडबडीत क्रिकेट काही त्याने सोडलं नाही. क्रिकेटवर असणारं त्याच प्रेम कायम होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना त्यांने अनेकांना प्रभावित केले. आपल्या गोलंदाजीने अनेकांच्या दांड्या त्याने गूल केल्या. परिस्थितीची जाणीव ठेवत त्याने एका बाजूने क्रिकेटचा सराव सुरू ठेवला होता.
अन् तिरुपती सावर्डे संघाने संधी दिली
कौशल्यपूर्ण गोलंदाजी आणि गरज पडल्यास तितक्याच ताकदीची फटकेबाजी पाहून टेनिस क्रिकेटमधले दादा संघ सुद्धा विजय पावलेच्या गोलंदाजीवर त्या काळात फिदा झाले होते. या संघांमध्ये तिरुपती सावर्डे या संघाचा सुद्धा समावेश होतो. कोकणातील चिपळूनच्या तिरुपती सावर्डे या संघाने विजय पावलेचे कौशल्य हेरले आणि आपल्या संघातून खेळण्यासाठी आमंत्रित केले. विजय पावलेच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी संधी होती. त्याच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा खऱ्या अर्थाने त्यादिवशी श्री गणेशा झाला. तिरुपती सावर्डे संघाकडून खेळताना त्याने अनेक मैदाने गाजवली, आपल्या गोलंदाजीच्या तालावर भल्या भल्या फलंदाजांना त्याने नाचवले. अनेक मातब्बर संघांना त्याने अस्मान दाखवले. या विरुद्ध संघांमध्ये पुण्यातील नामांकित संघ Ding Dong या संघाचा सुद्धा समावेश होता.
तिरुपती सावर्डे आणि डिंग डॉंग या संघाचा सामना सुरू होता. तिरुपती सावर्डे संघाकडून विजय पावले मैदानात उतरला. प्रथम गोलंदाजी करताना त्याने डिंग डॉंग संघाच्या तगड्या फलंदाजांना मैदानात उभेच राहू दिले नाही. वेगावर स्वार होऊन तो गोलंदाजी करत होता. त्याने दोनच षटकांमध्ये डिंग डॉंग संघाचे 6 मोहरे टिपले आणि त्यांची हवाच काढून टाकली. तिरुपती सावर्डे संघाला या सामन्यात विजयाची नामी संधी होती. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. परंतु या सामन्यात विजय पावलेनी केलेली गोलंदाजी डिंग डॉंग संघाला प्रभावित करून गेली. कृष्णा सातपूते, योगेश पेणकर सारखे तगडे फलंदाज डिंग डॉंग संघातून खेळत होते. विजय पावलेचा खेल पाहून त्याल संघाकडून खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर विजय पावलेने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. घरच्या परिस्थितीवर मात करत व्यवसायिक क्रिकेटची वाट त्याने धरली आणि तो यशस्वी सुद्धा झाला. आज विजय पावेल एका वेगळ्या उंचीवर गेला आहे. पंरतु ज्या संघाने आपल्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी दिली, त्या तिरूपती सावर्डे संघाला तो आजही विसरलेला नाही. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो तिरुपती सावर्डे संघाकडून आजही मैदानात उतरतो.
रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून पुणे डिस्ट्रिक्ट प्रिमियर लिग खेळण्याची संधी
विजय पावलेच्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कोकणाने चांगली साथ दिली. त्यामुळे कोकण आणि विजय पावले यांचे नाते व्यवसायिक क्रिकेट खेळण्यासाठी महत्त्वाचे ठरले. कोकणातच त्याला पहिल्यांदा लेदर बॉलवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्या संधीचे त्याने सोनं केलं. त्याच्या गोलंदाजीचे आणि फलंदाजीचे सर्वांनी कौतुक केले. विजय पावलेच्या खेळाचा आलेख सतत उंचावत चालला होता. याच दरम्यान त्याला पुणे डिस्ट्रीक्ट प्रिमियम लीग खेळण्याची संधी मिळाल. त्यामुळे विजयच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, लिलाव प्रक्रियेमध्ये विजयला कोणत्याच संघाने खरेदी केले नाही. त्यामुळे विजय खऱ्या अर्थाने नाराज झाला होता. ही मोठी संधी हूकणार असेच त्याला वाटले होते. मात्र, नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. एका खेळाडू एंजर्ड झाला होता. त्याची रिप्लेसमेंट म्हणून त्याला संघात घेण्यात आलं. विजयने त्याच रात्री ट्रकमध्ये बसून पुणे गाठले. त्याला ही संधी सोडायची नव्हती. पुण्यात राहण्याची काहीही व्यवस्था नव्हती. तरीही त्याने स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी पुणे गाठले पुणे डिस्ट्रिक्ट प्रिमियल लिगमध्ये दर्जेदार गोलंदाची करत आपल्या खेळाची छाप पाडली.
IPL मध्ये सचिन तेंडूलकरसह अनेक दिग्गज खेळाडूंना गोलंदाजी
विजय पावलेच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंक पॉइंट म्हणजे IPL. इंडियन प्रीमियर लीग खेळण्याची त्याला संधी मिळाली नाही. परंतु मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये गोलंदाजी करण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात आले. या काळात त्याने सचिन तेंडूलकर, रिकी पॉण्टिंगसह अनेक दिग्गज खेळाडूंना गोलंदाजी केली. सचिन तेंडूलकरने विजयच्या गोलंदाजीच्या शैलीचे आणि फिटनेसचे तोंडभरून कौतुक केले होते. ट्रेनिंग कॅम्प दरम्यान मुनाफ पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज शॉन पोलॉक याने विजयला गोलंदाजीचे धडे दिले. या गोष्टीचा विजयला भविष्यात चांगला फायदा झाला. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये अमुलाग्र बदल झाला आणि तोडफोड गोलंदाजी करायला त्याने सुरुवात केली. त्यानंतर ज्या ज्या स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेतला ती प्रत्येक स्पर्धा त्याने गाजवली. कृष्णा सातपूते सारख्या फलंदाजांना सुद्धा त्याने अनेक वेळा तंबुचा रस्ता दाखवला आहे.
जेव्हा विजयने पाच चेंडूच पाच षटकार ठोकले
विजय पावलेच्या गोलंदाजीचा जलवा आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिला. अनेक वेळा तुम्ही सुद्धा त्याच्या गोलंदाजीची धार मैदानामध्ये पाहीली असेल. मात्र, विजय पावले तितक्याच ताकदीचा एक तगडा फलंदाज सुद्धा आहे. वेळ पडली तर षटकार आणि चौकार ठोकण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. तशी किमया त्याने अनेक वेळा साधली आहे. एका सामन्यात त्याने पाच चेंडूंमध्ये पाच षटाकर ठोकण्याचा विक्रम सुद्धा केला होता. आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने आपल्या संघाला अनेक वेळा एकहाती विजय मिळवून दिला आहे. विजयच्या दर्जेदार खेळाचा डंका फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहिला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी त्याला आमंत्रित केले जाते. भारताच्या संघात सुद्धा त्याची निवड करण्यात आली होती. भारताकडून खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे. पाकिस्तानसह अनेक देशांच्या फलंदाजांना त्याने अस्मान दाखवले आहे.
MPL मध्ये डंका वाजला
इंडियन प्रिमियर लीगच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. विजय पावलेसाठी पुन्हा एकदा मोठी संधी चालून आली होती. MPL मध्ये त्याला रत्नगागिरी जेट्स या संघाने 20 हजार या बेस प्राईजला खरेदी केले होते. संपूर्ण स्पर्धा त्याने गाजवली. आपल्या गोलंदाजीचा डंका त्याने महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये गाजवला. रत्नागिरी संघाकडून खेळताना अंतिम सामन्यात केदार जाधवची विकेट त्याने घेतली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही. परंतु गुण तालिकेनुसार विजय पावलेचा संघ महाराष्ट्र प्रीमियर लीगचा चॅम्पिनय संघ ठरला. MPL मुळे विजय पावलेचे नाव टेनिस विश्वात पुन्हा एकदा चर्चेत आले. आपल्या खेळाच्या जोरावर त्याने आपल्या नावाची दखल घ्यायला संपूर्ण महाराष्ट्राला भाग पाडलं. इथून पुढे ही त्याचा दमदार खेळ असाच सुरू राहीलं.
View this post on Instagram
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.