Wai News – न्यू इंग्लिश स्कूल बोरगावच्या यशदाची गरूड झेप; रौप्य जिंकले आता चीनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधीत्व

नाशिक येथे दि. 28 ते 30 मार्च 2026 दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत वाई (Wai News) तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावच्या यशदा मेघा वाडकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय जम्प रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशन तसेच नाशिक जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव येथील इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी असलेल्या यशदाने 30 सेकंद सिंगल बाऊन्स आणि डबल अंडर या प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले. तिच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर यशदाची चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जम्प रोप स्पर्धेसाठी (International Asian Jump Rope Competition) निवड झाली असून, हा न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव आणि चिखली गावासह वाई तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. या यशाबद्दल यशदाला शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री अशोक दुधारे यांच्या हस्ते तसेच नाशिक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष श्री नारायण वाडकर (गुरुजी), सचिव श्री मधुकर वाडकर, माजी अध्यक्ष श्री लक्ष्मणराव वाडकर (आप्पा), मुख्याध्यापक श्री संतोष वाडकर, भागशाळा प्रमुख श्री विठ्ठल जाधव, राज्य व सातारा जिल्ह्याचे सचिव श्री नितीन सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक श्री अजित वाडकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जम्प रोप स्पर्धा म्हणजे काय? What is a jump rope competition?

जम्प रोप (Skipping) ही एक वेग, समन्वय आणि सहनशक्ती तपासणारी क्रीडा प्रकार आहे. यात खेळाडू दोरीच्या सहाय्याने ठराविक वेळेत जास्तीत जास्त उड्या मारणे (Single Bounce), वेगवेगळे तंत्र (Double Under) किंवा तालबद्ध सादरीकरण करतात. या खेळात फिटनेससोबतच टाइमिंग, संतुलन आणि एकाग्रता महत्त्वाची असते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.

error: Content is protected !!