Rashmi Shukla – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, निवडणूक आयोगाने केली बदली; वाचा सविस्तर…

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली आहे. तत्पुर्वी प्रचारांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. जूनी प्रकरणं खोदून काढली जात आहेत. राजकारण्यांसह विविध अधिकाऱ्यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये येत आहेत. सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महसंचालक Rashmi Shukla याचं नावं चांगलंच चर्चेत आहे.

निवडणुकीची तारीख जवळ येत चालली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. असे असताना राज्याच्या पोलीस महसंचालक Rashmi Shukla IPS यांची बदली करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, पदरचनेतील रश्मी शुक्ला यांच्या नंतर असणाऱ्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात यावेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यानुसार हालचाली सुरू केल्या आहेत. चला तर म रश्मी शुक्ला यांच्या बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

रश्मी शुक्ला यांचे प्रारंभिक जीवन

 

रश्मी शुक्ला यांचा जन्म उत्तर प्रदेशात 30 जून 1964 रोजी झाला. मात्र, त्यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईत पूर्ण झाले. वाचनाची रश्मी शुक्ला यांना प्रचंड आवड होती. त्यामुळे अभ्यासातही त्या तरबेज होत्या. रश्मी शुक्ला यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि मुंबई विद्यापिठातून एमए मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वप्नांच्या दिशेने त्यांचा खरा पाठलाग सुरू झाला. त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. दिवस रात्र मेहनत केल्यानंतर मेहनतीचे फळ त्यांना भेटले आणि वयाच्या 22 व्या वर्षी त्या उत्तीर्णही झाल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाही होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण हैदराबादमधील तेलंगणा येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्री पोलीस अकादमीमध्ये पार पडले. रश्मी शुक्ला या महाराष्ट्र केडरच्या 1988 च्या बॅचच्या भारतीय पोलीस अधिकारी आहेत.

पोलीस अधिकारी म्हणून कारकि‍र्दीला सुरुवात | Rashmi Shukla IPS

रश्मी शुक्ला यांनी आपल्या कारकि‍र्दीमध्ये विविध पदांवर काम केले. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महसंचालक पदाची मोठी जबाबदारी जानेवारी 2024 मध्ये सोपवण्यात आली होती.

रश्मी शुक्ला यांनी आतापर्यंत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP), छत्रपती संभाजी नगरचे एसपी, सातारा जिल्ह्याच्या एसपी, पुणे ग्रामीण एसपी, मुंबईतील झोन 1 आणि 5 च्या पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, संयुक्त मुंबईतील गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्त आणि नागपूर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी त्यांना पार पाडली.

  1. Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा

  2. Nick Vujicic biography – अपंगत्वावर मात करून करोडो लोकांना प्रेरणा देणारा अवलिया

2016 साली रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर अनेक पदांवर त्यांची वेळोवेळी बदली करण्यात आली. केंद्र सरकारद्वारे 2022 साली DGP म्हणून त्यांचा पॅनलमध्ये समावेश करण्यात आला. त्याच वर्षी हैदराबादमध्ये CRPF च्या अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर सीमा सुरक्षा बल महसंचालक म्हणून 2023 ते 24 असा एक वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. महायुती सरकारच्या काळात जानेवारी 2024 साली त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी निवड झाली. त्यांची ही निवड ऐतिहासिक ठरली. कारण रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महसंचालक बनल्या. मात्र नुकतात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे.

रश्मी शुक्ला आणि कुटुंब

रश्मी शुक्ला यांचे उदय शुक्ला यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, उदय शुक्ला यांचे वयाच्या 58 व्या वर्षी 2018 साली निधन झाले. उदय शुक्ला सुद्धा IPS अधिकारी होते. तसेच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

रश्मी शुक्ला आणि वाद

रश्मी शुक्ला यांचे नाव पहिल्यांदा 2021 आणि 2022 च्या दरम्यान चर्चे आलं. सत्ताधारी महाविकास आघाडीने फोन टॅपिंगचा आरोप त्यांच्यावर लावला होता. याप्रकरणी त्यांच्यावर तीन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. करण्यात आलेल्या आरोपानुसार, रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) आयुक्त असताना बेकायदेशीरपणे विरोधी पक्षातील राजकारणी आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

त्यानंतर सरकारने त्यांच्यावर चौकशीचे आदेश देत तपास करण्यासाठी खंडपीठाची स्थापना केली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 25 फेब्रुवारी 2021 रोजी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात FIR दाखल केली. 2022 मध्ये रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावले आणि FIR विरोधात याचिका दाखल केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तीवाद त्यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात केला होता.

  1. Ajay Banga – पुण्यात जन्मलेले World Bank Group चे अध्यक्ष, कोण आहेत अजय बंगा? वाचा सविस्तर…

केंद्रीय अन्वेशन ब्युरो (CBI) कडे जुलै 2022 साली रश्मी शुक्ला यांची केस सोपवण्यात आली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल असणाऱ्या तीन FIR पैकी दोन FIR रद्द केल्या. CBI ने मे 2023 रोजी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि उच्च उच्च न्यायालयाने तो रिपोर्ट स्वीकारला सुद्धा.अखेर सप्टेंबर 2023 रोजी कोर्टाच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांची निर्दोश मुक्तता करून केस बंद करण्यात आली.

अन् पोलीस महासंचालक पदी निवड झाली

4 जानेवारी 2024 रोजी एक ऐतिहासिक घटना महाराष्ट्रात घडली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या महिला महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी नियुक्ती करण्यात आली. पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकराण्यापूर्वी, त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक होत्या. विशेष बाब म्हणजे जून 2021 मध्ये रश्मी शुक्ला या निवृत्त होणार होत्या. परंतु, सरकारने त्यांना मुदतवाढ दिली.

महाविकास आघाडीमुळे बदली?

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले होते. तसेच निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार दाखल केली होती. बहुदा त्यामुळेच रश्मी शुक्ला यांची Maharashtra Assembly Election 2024 पूर्वी बदली करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या राजकारण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांमध्ये त्यात अजून भर पडणार असल्याची चिन्ह आहेत.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment