Satara Vishesh – कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी बावधन, वासोळे, बलकवडीत शिबीर भरणार; तारीख कोणती? वाचा…

Satara Vishesh मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या उपोषणामुळे सरकार खडबडून जागं झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (17 सप्टेंबर 2025) आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर 2025) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाद्वारे या सेवा पंधरवडा कालावधी कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी शिबीरांचे आयोजन … Read more

Satara Vishesh – ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 चा’ निकाल जाहीर; वाई तालुक्यातील मंडळानेही पटकावला पुरस्कार

सातारा (satara Vishesh) जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव बऱ्यापैकी पर्यावरणपूरक झाला. अनेक गावांनी पुढाकार घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच विसर्जन सुद्धा नदीमध्ये न करत विहिरीमध्ये करण्यास प्राधान्य दिले. या उपक्रमात अनेक मंडळांनी सुद्धा हिरहिरीने सहभाग नोंदवला होता. मंडळांना प्रोत्सोहान देण्यासाठी राज्य स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे निकाल जाहीर करण्यात आले … Read more

Photo – ढगांचा लपंडाव आणि धुक्यांमध्ये हरवलेला राजगड

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच सुरक्षेच्या कारणामुळे … Read more

Satara News – जमिनीचा सातबारा, घरांवर पुरुषांच्या बरोबरीने महिलांची नावे; गजवडी गावाच्या ऐतिहासिक उपक्रमाची राज्यात चर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी म्हणजे सातारा जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात जिल्ह्याने पुढाकार घेतला. पुस्तकांच गाव, मधाचं गाव, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण सुद्धा याच सातारा जिल्ह्यात आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याला असलेल्या गजवडी गावाच्या ऐतिहासिक उपक्रमामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. जमीन असो अथवा … Read more

Satara News – देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना लष्कराच्या जवानाने गंडा घातला, पावणे चार लाखांची फसवणूक; पोलि‍सांनी बेड्या ठोकल्या

फौजींचा जिल्हा म्हणून साताऱ्याचा (Satara News) साऱ्या जगात नावलौकिक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक तरी व्यक्ती देशाच्या सेवेसाठी सीमेवर कार्यरत आहे किंवा सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहे. असचं देशसेवेचं स्वप्न दोन तरुणांनी उराशी बाळगलं होतं. भरतीची वय मर्यादा ओलांडण्याचे शेवटचे वर्ष असल्यामुळे क्लर्क पदावर भरती होण्यासाठी रितेश वे त्याचा भाऊ आयुष जाधव यांनी आरोपी … Read more

Tennis Cricket News – 22 यार्ड क्रिकेट कार्निव्हल स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला ‘वाई 11’

22 Yard Cricket Carnival या रबर बॉल क्रिकेट (Tennis Cricket News) स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलाय ‘वाई 11’. नवी मुबंईतील कोरपखैरणेमध्ये असलेल्या भूमीपुत्र मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 8 संघांचा दोन दिवस थरार रंगला. रविवारी (21 सप्टेंबर 2025) पार पडलेल्या अंतिम सामन्यात वाई 11 विरुद्द कोयना किंगस्टार असा सामना रंगला. या सामन्यात वाईने बाजी मारली आणि 36 … Read more

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांची धावपळ थांबणार; गावाजवळच्या CSC केंद्रांवर मिळणार माफक दरात सेवा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ सोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता महामंडळाच्या (Annasaheb Patil Economically Backward Development Corporation ) विविध योजनांचा लाभ CSC केंद्रामध्ये घेता येणार आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आणि CSC सोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील तरुणांच्या वेळेची आणि … Read more

Surekha Yadav- आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक आणि सातारची लेक सुरेखा यादव निवृत्त होणार

आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक मराठमोळ्या सुरेखा यादव (Surekha Yadav) या 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. Central Railway ने आपल्या सोशल मीडियावर त्यांचे काही खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुरेखा यादव यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून कायम ओळखला जाईल, असही पोस्टमध्ये म्हटलं … Read more

Navratri 2025 – भक्तांसाठी ST महामंडळाची झकास योजना, साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन घेता येणार; जाणून घ्या सविस्तर

सोमवारी (22 सप्टेंबर 2025) नवरात्रोत्सवाला (Navratri 2025) सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांसह सर्वांचीच सध्या लगबग सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व देवींची मंदिरे भक्तांनी फुलून निघणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठ आहेत. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. परंतु वेळ आणि पैशांची गणित जुळवताना सामान्यांची तारांबळ उडते. यासाठीच आता … Read more