Big Data Analytics course information in Marathi; आयटी उद्योगातील एक वेगाने वाढणारे क्षेत्र

What Is big data analytics

Big Data या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की काही तरी मोठी गोष्ट असणार. बिग डाटा (Big Data Analytics Course Information in Marathi) अॅनेलिटीक्सचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे क्लिष्ट वाटणाऱ्या डेटाचा अभ्यास करून त्याचा थोडक्यात समजेल अशा पद्धतीने सार (Conclusion) काढणे. पूर्वी या कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप कमी होती. बराच वेळ एकाच डेटावर काम करण्यासाठी खर्च करावा लागत असे. परंतु जसजस तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसतस या क्षेत्रामध्ये सुद्धा डेटाचा सखोल अभ्यास करण्यासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मीती करण्यात आली. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता डेटाचे विश्लेषण करणे सोपे झाले आहे. डेटाचे सखोल विश्लेषण करून कंपनीच्या हिताचा योग्य आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता डेटा विश्लेषकाकडे असते. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या आणि फर्म्समध्ये Data Analytics या पदावर काम करणाऱ्या चांगल्या उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

बिग डेटा अॅनिलिटिक्स हे आयटी उद्योगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्याची चांगली संधी आहे. मोठमोठ्या कंपन्या (Google, Netflix, Amazon and Spotify) उमेदवारांना चांगला पगार देण्यास तयार आहेत. परंतु कंपन्यांना त्या दर्जाचे उमेदवार मिळत नाहीत. डेटाचे विश्लेषण करण्यापुरता हा जॉब मर्यादीत नाही. यामध्ये विविध क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. जसे की, Machine Learning, Data Architect आणि Data Modeller. त्यामुळे या क्षेत्राची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या मराठी मुलांना/तरुणांना या क्षेत्राबद्दल क्वचितच माहिती आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या मराठी तरुणांची संख्या कमी आहे. मराठी तरुणांचा या क्षेत्रामध्ये डंका वाजावा या हेतूने हा ब्लॉग लिहण्यात आला आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

Types of big Data Analytics

क्षेत्र कोणतेही असो त्याचे प्रकार समजूण घेणं खूप गरजेचे असते. प्रकार समजल्यामुळे अभ्यासक्रम कोणता असणार किंवा या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचे काम चालते याची माहिती विद्यार्थ्यांना होते. Big Data Analytics चे प्रामुख्याने चार प्रकार पडतात. यामध्ये Diagnostic Analytics, Descriptive Analytics, Prescriptive Analytics आणि Predictive Analytics. तसेच डेटाचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया सुधारित करण्यासाठी आणि एकत्रीत केलेल्या डेटामधून कंपनीला फायदा व्हावा यासाठी विविध प्रक्रियांची मदत घेतली जाते. जसे की, Data Mining, Cleaning, Integration, Visualization इत्यादी.

1) Diagnostic Analytics (निदान वश्लेषण)

डायग्नोस्टिक अॅनिलिटिक्स हा बिग डेटा अॅनिलिटिक्समधील महत्वाच्या प्रकारांपैकी एक प्रकार आहे. या प्रकारामध्ये कंपनीच्या दृष्टीकोणातून एखादी गोष्ट का घडली? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विश्लेषण केले जाते. उदा. कंपनीच्या एखाद्या वस्तुची विक्री मार्केटींगमध्ये कोणताही बदल न करता अचानक कमी झाली किंवा एखाद्या वस्तुची विक्री अचानक वाढली, तर त्यामागचे कारण शोधण्यासाठी Diagnostic Analytics या प्रकाराचा वापर केला जातो.

2) Descriptive Analytics (वर्णनात्मक विश्लेषण)

चालू ट्रेंडच्या मदतीने कंपनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रामुख्याने Descriptive Analytics या प्रकाराचा वापर केला जातो. हा ट्रेंड कशाप्रकारचा आहे आणि याचा आपल्या कंपनीच्या ग्रोथसाठी कशाप्रकारे वापर करून घेता येईल. याचे योग्य विश्लेषण करून निर्णय घेण्यासाठी वर्णनात्मक विश्लेषण गरजेचे ठरते. याप्रकारच्या विश्लेषणामुळे उत्पादन, वित्त आणि विक्री कौशल्याच्या सहाय्याने व्यवहार करण्यासाठी मदत होते. वर्णनात्मक विश्लेषणामुळे चालू ट्रेंडचा वापर करून कंपन्यांची व्यवयाय करण्याच्या किंवा मार्केटींग करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होताना पहायला मिळतो.

3) Prescriptive Analytics

कंपनीच्या हितासाठी वर्णनात्मक आणि भविष्यसूचक विश्लेषण करण्यासाठी Prescriptive Analytics या प्रकाराच्या सहाय्याने विश्लेषण केले जाते. Prescriptive विश्लेषणाचा वापर करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांपैकी Google ही एक कंपनी आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, Google ने त्यांच्या Self-Driving वाहनाची रचना करण्यासाठी Prescriptive Analytics चा वापर केला होता.

4) Predictive Analytics

कंपनीच्या भविष्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणि भुतकाळातील आणि वर्तमानकाळातील सर्व डेटाचे सखोल विश्लेषण करण्याच्या प्रकाराला Predictive Analytics असे म्हणतात. या प्रकारामध्ये मशील लर्नींग, डेटा मायनिंग तंत्र आणि सांख्यिकीय घटकांचा एकत्रीत डेटा वापरून अंदाज लावला जातो. भविष्यात होणारी जोखीम टाळण्यासाठी या प्रकाराचा वापर केला जातो.

Big Data Analytics कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता

कोर्सला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी. तसेच पदवीपूर्ण झाल्यावर कोर्सला प्रवेश घेण्यासाठी संबंधित विषयामध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. पात्रता निकषांचा विचार केला, तर पात्रता निकष हे महाविद्यालयांवर अवलंबून आहेत. त्यामुळे पात्रता निकषांमध्ये फरक असू शकतो.

1) 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर Big Data Analytics कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता

• विद्यार्थ्याने इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केलेली असावी. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा कंपल्सरी अभ्यासक्रमामध्ये समावेश असावा.
• मान्यताप्रप्त महाविद्यालयातून 60 टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
• जर विद्यार्थ्याने बारावीमध्ये Computer Science चा अभ्यास केला असेल, तर संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेसाठी तो एक Advantage असेल.

2) पदवी पूर्ण केल्यानंतर Big Data Analytics ला प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष

• कोर्सला प्रवेश घेण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवी पूर्ण केलेली असावी.
• विद्यार्थ्यांनी बॅचलर पदवी किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी.

पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे प्रवेश प्रक्रिया.

इयत्ता बारावी आणि पदवी पात्रता निकषांप्रमाणे पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. तसेच काही महाविद्यालये त्यांची स्वत:ची विद्यापीठ स्तरावर प्रवेश परीक्षा घेतात. प्रामुख्याने भारतामध्ये SSU Entrance Exam, AMET Entrance Exam आणि Jain University Entrance Test या काही महत्वाच्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

भारतातील विद्यार्थ्यांच्या पसंतीची Top Big Data Analytics Private Colleges in India

भारतामध्ये Big Data Analytics चा अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. परंतु त्यातील काही टॉपच्या महाविद्यालयांची यादी खाली देण्यात आली आहे.

Top Private Colleges in India

1. Lovely Professional University, Phagwara (LPU Jalandhar)
2. IFMR Graduate School of Business, Sri City (IFMR GSB Sri City)
3. Karpaga Vinayaga College of Engineering and Technology, Kancheepuram (KVCET Chennai)
4. Uttaranchal Institute of Technology, Dehradun (UIT Dehradun)
5. Vellore Institute of Technology, Vellore (VIT Vellore)
6. SRM Institute of Science and Technology, Chennai (SRM University Chennai)
7. School Of Computer Science, University of Petroleum and Energy Studies, Dehradun (School of Computer Science, UPES Dehradun)
8. Amrita Sai Institute of Science and Technology, Krishna
9. Vel Tech Rangarajan Dr Sagunthala R And D Institute of Science and Technology (Vel Tech Chennai)
10. Apex Institute of Technology, Chandigarh
11. Ganpat University Institute of Computer Technology, Mehsana
12. Joy University, Vadakkankulam
13. JIET Institute of Design and Technology, Jodhpur
14. JECRC University, Jaipur
15. KSR Institute for Engineering and Technology, Namakkal

Top Government Colleges in India

1. Ambedkar Institute of Advanced Communication Technology and Research, Delhi
2. Devi Ahilya Vishwavidyalaya, Indore
3. Annamalai University, Annamalai Nagar
4. Jawaharlal Nehru Technologies University, Kakinada (JNTUK Kakinada)
5. Netaji Subhash University of Technology, New Delhi (NSUT Delhi)
6. School Of Data Science and Forecasting, Devi Ahilya Vishwavidyalaya, Indore

Top Big Analytics Colleges in Maharashtra

1. MIT World Place University, Pune (MIT-WPU)
2. MIT Art, Design and Technology University, Pune
3. COEP Technological University, Pune
4. Symbiosis Centre for Information Technology, Pune
5. Vishwakarma University, Pune
6. Savitribai Phule Pune University, Pune
7. Flame University, Pune
8. Dr. D Y Patil Institute of Technology, Pimpri-Chinchwad, Pune
9. Symbiosis Centre for Management and Human Resource Development, Pune
10. NMIMS Deemed to be University, Navi Mumbai
11. Mukesh Patel School of Technology Management and Engineering, Mumbai
12. S.P.Jain Institute of Management and Research, Mumbai
13. St.Xavier’s College (Autonomous), Mumbai
14. Dr. D Y Patil’s Ramrao Adik Institute of Technology, Mumbai
15. K.J.Somaiya College of Engineering, Mumbai
16. Chhatrapati Shivaji Maharaj University, Navi Mumbai

(टीप – विद्यार्थ्यांना कॉलेजची माहिती व्हावी या उद्देशाने कॉलेजची नावे देण्यात आली आहेत. परंतु कोणत्याही कॉलेजला प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन त्याची संपूर्ण माहिती घ्या, खात्री करा आणि त्यानंतरच प्रवेश घ्या)

Job Profile आणि Salary for Big Date Analytics

बिग डेटा अॅनिलिटिक्सचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्या नंतर. विद्यार्थ्यांची जॉबसाठी धावपळ सुरू होते. यामुळेच लोकप्रिय जॉब प्रोफाईलची नावे आपण पाहणार आहोत.

 Data Analyst (Average Salary Rs. 4 to 5 LPA)
 Data Modeler (Average Salary Rs. 9 To 11 LPA)
 Database Administrator (Average Salary Rs 5 TO 6 LPA)
 Database Developer (Average Salary Rs. 5 To 6 LPA)
 Data Scientist (Average Salary Rs. 9 To 10 LPA)
 Database Manager (Average Salary Rs 4 To 5 LPA)
 Big Data Engineer (Average Salary Rs. 6 To 7.5 LPA)
 Data Architect (Average Salary Rs. 15 To 18 LPA)
 Business Intelligence Analyst (Average Salary RS. 6 To 7.5 LPA)

(टीप – पगाराची रक्कम ही अनुभवाच्या आधारे वेगवेगळी असू शकते.)

Big Data Analytics या कोर्सची चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आपण या ब्लॉगमध्ये केला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर कंमेंट सेक्शनमध्ये आवर्जून विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

हे सुद्धा वाचा

मुलींनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे? After 10th Courses List for Girls
Best courses after 12th commerce
Ethical Hacking; भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र
लोको पायलट कसे व्हावे / How To Become a Loco Pilot information in Marathi

Leave a comment