Prabalgad Fort – प्रबळगडाच्या शेजारी असणारा कलावंतीण दुर्ग आहे की सुळका? जाणून घ्या सविस्तर…

नवी मुंबई आणि मुंबई या प्रगतशील शहरांपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे Prabalgad Fort आणि kalavantin fort हे दुर्गप्रेमींच्या रडारवर असणारे गड. मात्र, या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचा सतावणारा प्रश्न म्हणजे, कलावंतीण हा दुर्ग आहे की सुळका? प्रबळगड आणि कलावंतीण हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही गडांना भेट देता येते. मुंबई आणि नवी मुंबई पासून … Read more

Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका … Read more

Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये … Read more

Daulatabad Fort – भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली चमत्कार, देवांचा किल्ला

महाराष्ट्रातील शंकूच्या आकाराच्या टेकडीवर वसलेला, Daulatabad Fort हा भारताच्या समृद्ध स्थापत्य आणि लष्करी वारशाचा दाखला आहे. “अभेद्य किल्ला” किंवा “देवांचा किल्ला” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौलताबादने शतकानुशतके इतिहासकार, प्रवासी आणि वास्तुविशारदांना मोहित केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वायव्येस अंदाजे 16 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भव्यता, महत्त्वाकांक्षा आणि लवचिकतेची कथा सांगतो. दौलताबाद किल्ला त्याच्या अद्वितीय रचना आणि … Read more

Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड

सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक महत्व लाभलं आहे. परंतु या सर्व जिल्ह्यांमध्ये वाईच नाव प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ढोल्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाईमद्ये मराठी विश्वकोश कार्यालय आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वाईतील मेणवलीच्या घाटावर आणि ढोल्या गणपतीच्या परिसरात होत असतं. ऐतिहासीक महत्व लाभलेल्या या वाई शहराचा पाठीराखा … Read more

Visapur Fort – दुर्गप्रेमींच्या आवडीचा लोणावळ्याच्या कुशीत वसलेला विसापूर, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती Shivaji Maharaj यांचे सर्वाधिक वास्तव्य पुणे जिल्ह्यात होते. शिवरायांच बालपण लाल महालात गेल्यामुळे आणि राजधानी राजगड असल्यामुळे सुरुवातीला स्वराज्याचा सर्व कारभार पुण्यातून हाकला जाई. त्यामुळे पुणे आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी विशेष काळजी घेतली होती. पुण्यातील बऱ्यापैकी सर्वच गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ घालवला आहे. विशेष लक्ष देऊन त्यांनी गडांची निर्मिती केली … Read more

Dhakoba Fort – घाटांचा रक्षणकर्ता, सह्याद्रीतला दुर्लक्षीत पण देखणा गड

दिवाळी म्हटल की सर्वत्र दिव्यांची आरास, फराळांचा गोडवा आणि पै पाहुण्यांची तारांबळ पहायला मिळते. मात्र, या सर्व धावपळीत लहान मुलांसह तरुणांची लगबग सुरू होते, ती किल्ला कोणता बांधायचा या चर्चेने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एखादा गड निवडायचा आणि बांधकामाला सुरुवात करायची. प्रत्येकाने आपल्या लहानपणी एकदा का होईना पण किल्ला हा बनवला असेलच. पण आपल्या महाराष्ट्रात … Read more

Daulatmangal fort – माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या गडावर नृत्य केलं होतं, जाणून घ्या सविस्तर…

गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा Daulatmangal Fort सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गडावर थेट गाडीने जाता येते त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना पाहण्यासाठी हा गड योग्य पर्याय ठरू शकतो. गडावर प्रसिद्ध असे भुलेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 12 व्या शतकात पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट खडकात हे मंदिर बांधण्यात आले आहे. खुद्द शहाजी महाराजांनी या गडाची उभारणी … Read more

Kalyangad Fort – दत्तांच्या पादुकांपर्यंत पोहचण्याचा एक थरारक अनुभव, साताऱ्याचा कल्याणगड

सातारा जिल्ह्यातील काही गडांची माहिती आपण मागील काही ब्लॉगमध्ये पाहीली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिलाहार घराण्याने बराच काळ कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक गडांची निर्मिती केली होती. या गडांमध्ये अजिंक्यतारा, भुदरगड, दातेगड सारख्या … Read more

Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मराठ्यांची राजधानी म्हटल की सातारा जिल्ह्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. निसर्ग संपन्नतेने नटलेला सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. शुरवीरांची परंपरा लाभलेल्या या सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले अगदी थाटात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला, त्या प्रतापगडापासून फुटणाऱ्या … Read more