Pratiksha Bagdi – पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, सांगलीच्या लेकीची धडाकेबाज कामगिरी

महाराष्ट्र केसरी म्हटल की एखादा धिप्पाड तरुण तुमच्या डोळ्या समोर आला असेल. लाल मातीत रंगणाऱ्या कुस्तीवर पुरुषांच आजही अधिराज्य आहे, अस म्हटल तर चुकीचं ठरणार नाही. खाशाबा जाधव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौघुले, शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक शेख, नरसिंग यादव, सिकंदर शेख इ. ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध कुस्तीपटुंची नावं. महाराष्ट्रातील कुस्ती न पाहणाऱ्या … Read more

Visapur Fort – दुर्गप्रेमींच्या आवडीचा लोणावळ्याच्या कुशीत वसलेला विसापूर, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती Shivaji Maharaj यांचे सर्वाधिक वास्तव्य पुणे जिल्ह्यात होते. शिवरायांच बालपण लाल महालात गेल्यामुळे आणि राजधानी राजगड असल्यामुळे सुरुवातीला स्वराज्याचा सर्व कारभार पुण्यातून हाकला जाई. त्यामुळे पुणे आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी विशेष काळजी घेतली होती. पुण्यातील बऱ्यापैकी सर्वच गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ घालवला आहे. विशेष लक्ष देऊन त्यांनी गडांची निर्मिती केली … Read more

Balasaheb Thorat – सहकार क्षेत्रातलं मोठं नाव, तब्बल 39 वर्षांनी मोठा उलटफेर; तरूण उमेदवाराने केला पराभव

Maharashtra Assembly Election 2024 मध्ये महायुतीने जबरदस्त मुसंडी मारत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. महायुतीच्या या वादळी लाटेत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांची कामगिरी काँग्रेसपेक्षा बरी राहिली. मात्र, काँग्रेसची या निवडणूकीत चांगलीच वाताहत झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून आणि माजी … Read more

Bacchu Kadu – दिव्यांग बांधवांचा आधारवड! पराभवाचा धक्का बसलेला एक तगडा नेता, बाळासाहेब ठाकरेंमुळे राजकारणात एन्ट्री

Maharashtra Assembly Election 2024 चे निकाल जाहीर झाले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. लाडकी बहीण योजना या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरली आणि याचा फटका महाविकास आघाडीला बसला. राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारी ही निवडणूक राजकारणात मुरलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना अक्षरश: घाम फोडणारी ठरली. काही उमेदवार काठावर पास झाले तर काहींची दांडी गूल झाली. सलग तीन ते … Read more

Raju Patil – मनसेचा एकमेव आमदार पराभूत, कसा होता राजू पाटील यांचा संघर्ष, राज ठाकरेंच काय चुकलं; वाचा सविस्तर…

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे 2019 पासून आमदार असणारे प्रमोद रतन पाटील उर्फ Raju Patil यांचा Maharashtra Assembly Election 2024 मध्ये पराभव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे ते एकमेव आमदार होते. त्यांचाही पराभव झाल्यामुळे मनसेला विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे पक्षाचे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा कल्याण … Read more

Assembly Election 2024 – भुईंज गावचे सरपंच ते चार वेळा आमदार Prataprao Bhosale उर्फ भाऊ यांची झंझावाती कारकीर्द, वाचा सविस्तर…

विधानसभा निवडणुकीच्या या धामधुमीत वाई-खंडाळा-महाबळेश्वर या मतदारसंघाचे चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केलेल्या Prataprao Bhosale  यांची आवर्जून आठवण काढावी लागेल. आपल्या कामाचा आणि कर्तृत्वाचा ठसा त्यांनी राज्याच्या राजकारणात चांगलाच उमटवला होता. त्यामुळेच सरपंच पदापासून ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत उंच उडी मारण्यात त्यांना यश आले. तसेच तीन वेळा सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनही प्रतापराव भोसले यांनी प्रतिनिधीत्व … Read more

Dhakoba Fort – घाटांचा रक्षणकर्ता, सह्याद्रीतला दुर्लक्षीत पण देखणा गड

दिवाळी म्हटल की सर्वत्र दिव्यांची आरास, फराळांचा गोडवा आणि पै पाहुण्यांची तारांबळ पहायला मिळते. मात्र, या सर्व धावपळीत लहान मुलांसह तरुणांची लगबग सुरू होते, ती किल्ला कोणता बांधायचा या चर्चेने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एखादा गड निवडायचा आणि बांधकामाला सुरुवात करायची. प्रत्येकाने आपल्या लहानपणी एकदा का होईना पण किल्ला हा बनवला असेलच. पण आपल्या महाराष्ट्रात … Read more

Daulatmangal fort – माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या गडावर नृत्य केलं होतं, जाणून घ्या सविस्तर…

गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा Daulatmangal Fort सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गडावर थेट गाडीने जाता येते त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना पाहण्यासाठी हा गड योग्य पर्याय ठरू शकतो. गडावर प्रसिद्ध असे भुलेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 12 व्या शतकात पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट खडकात हे मंदिर बांधण्यात आले आहे. खुद्द शहाजी महाराजांनी या गडाची उभारणी … Read more

Kalyangad Fort – दत्तांच्या पादुकांपर्यंत पोहचण्याचा एक थरारक अनुभव, साताऱ्याचा कल्याणगड

सातारा जिल्ह्यातील काही गडांची माहिती आपण मागील काही ब्लॉगमध्ये पाहीली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिलाहार घराण्याने बराच काळ कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक गडांची निर्मिती केली होती. या गडांमध्ये अजिंक्यतारा, भुदरगड, दातेगड सारख्या … Read more

Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मराठ्यांची राजधानी म्हटल की सातारा जिल्ह्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. निसर्ग संपन्नतेने नटलेला सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. शुरवीरांची परंपरा लाभलेल्या या सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले अगदी थाटात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला, त्या प्रतापगडापासून फुटणाऱ्या … Read more