Wai News – वाई तालुक्यातील वेलंग गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पाहा Video

Photo - अभिषेक साहेबराव सणस

वाई (Wai News) तालुक्यातील वेलंग गावाच्या हद्दीमध्ये बिबट्या आढळून आल्याने खळबल उडाली आहे. सोमवारी (18 डिसेंबर 2025) सायंकाळी 6.15 च्या सुमारास सणसवाडी येथील डोंगर परिसरात बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला. गेल्या काही दिवसांमध्ये वाई, पांचगणी आणि महाबळेश्वरमध्ये नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा बिबट्या … Read more

Wai News – वाईत अल्पवयीन मुलांकडून दुचाकीची धोकादायक वाहतूक, अपघाताचा धोका वाढला; कारवाईची मागणी

गजबजलेल्या आणि ऐतिहासिक वाई (Wai News) शहराला भेट देण्यासाठी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे. तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीला जाण्यासाठी वाईतूनत जावं लागतं. त्यामुळे बऱ्याच वेळा वाई स्टँड आणि किसनवीर कॉलेजपर्यंतच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. शनिवारी, रविवार आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. तसेच सामान्य दिवसांमध्येही वाई शहरामध्ये वाहनांची कायम वर्दळ असते. … Read more

Wai News – अन् कष्टाचं फळ मिळालं; संजय मालुसरे यांची शरीरसौष्ठव जिल्हा पंचपदी नियुक्ती

सातारा जिल्ह्यातील मानाची ‘स्पोर्टिका श्री’ स्पर्धा नुकतीच बाजार समिती हॉल वाई (Wai News ) येथे पार पडली. स्पोर्टिका फिटनेस क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून अनेक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला आणि शरीरप्रदर्शन करत आपल्या कलेची झलक उपस्थितांना दाखवली. यावेळी सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व वाई तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्याकडून संजय चंद्रकांत … Read more

Wai News – पुन्हा जुळून आल्या रेशीम गाठी! आजी-आजोबा अडकले विवाह बंधनात, वयगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

एक उपक्रमशील गाव म्हणून वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावाने तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत गावामध्ये विविध सामाजिक एकोपा वाढवणारे उपक्रम राबवले जात आहेत. असाच एक उपक्रम पुन्हा एकदा गावाने राबवला असून याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. सध्या विवाह सोहळ्यांची लगबग सुरू आहे. परंतू सध्या तरुण-तरुणींचे विवाह फार … Read more

वाई स्वच्छता चषक स्पर्धा 2025-26 : वयगांवची विजयी घोडदौड सुरूच, लोकसहभागाच्या जोरावर पटकावला तालुक्यात पहिला क्रमांक

पाणी व स्वच्छता विभागांतर्गत वाई चषक स्पर्धा 2024-25 या नाविण्यपूर्ण उपक्रमांत जिल्हास्तरीय समितीने केलेल्या तपासणीत वयगांव गावाने लोकसहभागाच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (6 डिसेंबर 2025) देशभक्त किसनवीर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. ना. मकरंद पाटील (आबा) मंत्री, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात … Read more

Wai News – वीज गेली की टॉवरही बंद! पश्चिम भागात मोबाईल नेटवर्कचा लंपडाव, सात गावांना बसतोय फटका

निसर्गसंपन्न वाई (Wai News) तालुका फिरण्यासाठी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगली वाढली आहे. प्रामुख्याने वाई शहर, धोम परिसर आणि पश्चिम भागातील डोंगराळ भागांमध्ये पर्यटक दर शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, याच पश्चिमेकडील अतिदुर्गम पट्ट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईल नेटवर्कचा लंपडाप सुरू आहे. खावलीपासून ते कोंढावळेपर्यंतच्या सात गावाना यांना चांगलाच दणका बसत … Read more

Wai News – टाळ मृदुंगाच्या गजरात वयगावकरांनी साजरा केला दत्त जयंती सोहळा, आज रंगणार खेळ पैठणीचा

वाई (Wai News) तालुक्यातील मौजे वयगांव गावामध्ये गुरुवारी (4 डिसेंबर 2025) दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती सोहळा पार पडला. दत्त जयंतीनिमीत्त मोठ्या संख्येने वयगांवकरांनी हजेरी लावली होती. शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने गावाबाहेर असलेला तरूण दत्त जयंतीनिमित्त वयगांवमध्ये दाखल झाला. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस प्रवचन, किर्तन आणि भजनाच्या तालावर दत्तभक्तांनी मनमुराद आनंद … Read more

Wai Nagar Parishad Election – वाई नगरपरिषद निवडणूक, 72.98 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

वाई नगरपरिषद निवडणुकीसाठी (Wai Nagar Parishad Election) सोमवारी (2 डिसेंबर 2025) 34 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सध्या थंडीचा तडाखा सुरू असल्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या अगदीच तुरळक स्वरुपाची होती. मात्र, दुपारच्या सत्रात वयोवृद्धांसह तरुणांनी सुद्धा मतदान केंद्रांवर हजेरी लावत आपला हक्क बजावला. 31,763 पैकी 23,182 म्हणजेच 72.98 टक्के मतदान दिवसभरात झाल्याची … Read more

Wai Nagar Parishad Election- एन थंडीत गरमागरम वातावरण! आज 34 केंद्रांवर मतदान, 65 उमेदवार रिंगणार

वाईमध्ये (Wai Nagar Parishad Election) थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मात्र, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी गरमागरम वातावरण वाईकरांना अनुभवायला मिळत आहे. याच गरमागरमीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पडावी म्हणून 264 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांचीही गस्त वाढवण्यात आली असून 34 केंद्रांवर आज (2 डिसेंबर 2025) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक सुरळीत पार पाडावी … Read more

Panchgani News – छत्री निशाणी हाती घेऊन युवा नेतृत्व गणेश कासुर्डे मैदानात; विकासासाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा

पाचगणीतील (Panchgani News) स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्व म्हणून गणेश कासुर्डे छत्री निशाणी घेऊन मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. प्रामाणिक कार्यपद्धती, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि सर्वसमावेशक विचारसरणी यांच्या बळावर कासुर्डे यांनी मतदारांची दारोदारी भेट घेत संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत पाणीपुरवठा, रस्ते-विकास, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा आणि युवांसाठी … Read more

error: Content is protected !!