इयत्ता पहिले ते सहावीच्या मुलांना १५,००० रु. आर्थिक सहाय्य शालेय विध्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम/ HDFC Bank Parivartan’s ECSS Programme for School Students (Merit-cum-Need Based) 2023-24

इयत्ता पहिले ते सहावीच्या मुलांना १५,००० रु.आणि ८वी ते १२वी च्या मुलांना १८,००० रु.आर्थिक सहाय्य शालेय विध्यार्थ्यांसाठी (scholarship for school students) HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम (मेरिट-कम-नीड बेस्ड). या शिष्यवृत्तीचा उद्देश समाजातील वंचित, हुशार आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणे आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता पहिले ते बारावी (scholarship for 10th passed students), डिप्लोमा, आयटीआय आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला शिकत असणाऱ्या तसेच खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी आहे. ECSS कार्यक्रमांतर्गत जे विध्यार्थी वैयक्तिक किंवा कौटुंबीक संकटांमुळे कोणत्याही आर्थिक शिक्षणाचा खर्च उचलण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या शिक्षणासाठी किंवा अभ्यासासाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे.

शालेय विध्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम / HDFC Bank Parivartan’s ECSS Programme for School Students (Merit-cum-Need Based) 2023-24 / scholarship for school students

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी.
• अर्ज करणार विध्यार्थी इयत्ता १ ते १२ वी, डिप्लोमा, आयटीआय आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला मागील पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळाले असले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन २.५ लाख रु किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या पूढील विध्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल उदा. एखाध्या विध्यार्थ्याला मागील तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या संकटांमुळे त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यास अडचणी आल्या असतील किंवा शिक्षण सोडण्याचा धोका निर्माण झाला असेल तर अश्या विध्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाही.
• जर अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला मागील पात्रता परीक्षेत ५५ टक्के पेक्षा कमी गुण मिळाले असतील तर तो विध्यार्थी अर्ज करू शकणार नाही.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर संबधीत विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• मागील वर्षाच्या मार्कशीट (२०२२-२३)
• ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स)
• चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र) (२०२३-२४)
• अर्जदार बँकेचे पासबुक/रद्द केलेला धनादेश
• उत्पन्नाचा पुरावा (खालील तीनपैकी कोणताही पुरावा चालेल)
१) ग्रामपंचायत/वॉर्ड समुपदेशक/सरपंच यांनी जारी केलेल्या उत्पन्नाचा दाखला.
२) एसडीएम/डीएम/सीओ/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला
३) प्रतिज्ञापत्र
• कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटांचा पुरावा (लागू असल्यास)

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यावर फायदा काय होणार

अर्ज करणार विध्यार्थी जर १ ते सहावी या वर्गात शिकत असेल (scholarship for school students) तर १५ हजार रु., अर्ज करणार विध्यार्ठी जर ७वी ते १२वी, डिप्लोमा, आयटीआय आणि पॉलिटेक्निक यपीकी काही शिकत असेल तर १८ हजार रु. शिष्यवृत्ती मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
३१ डिसेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक

शालेय विध्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम / HDFC Bank Parivartan’s ECSS Programme for School Students (Merit-cum-Need Based) 2023-24

Leave a comment