पती आणि कुटुंबाला सोडून प्रियकरासोबत नवीन संसार थाटणाऱ्या एका विवाहितेचा अत्यंत निर्घृणपणे खून (Crime News Marathi) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दमन येथे एका बेवारस ट्रॉली बॅगमध्ये या महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. बिहारमधील नवादा जिल्ह्यातील या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिऊर गावची रहिवासी असलेली छोटी कुमारी हिचे लग्न झाले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी तिची ओळख गावातीलच ऋषभ कुमार याच्याशी झाली. हळूहळू या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन वर्षांपूर्वी छोटीने कुटुंब, समाज आणि पतीची पर्वा न करता घर सोडले आणि ती ऋषभसोबत पळून गेली. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रोह पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. घर सोडल्यानंतर दोघेही दमन येथे गेले आणि भाड्याच्या खोलीत पती-पत्नीसारखे राहू लागले. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मात्र, या प्रेमसंबंधांचा शेवट अत्यंत क्रूर झाला. दमन पोलिसांना एका बेवारस ट्रॉली बॅगबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बॅग उघडली असता आतमध्ये छोटीचा मृतदेह पाहून पोलिसांचेही भान हरपले. हत्येनंतर तिचा प्रियकर ऋषभ कुमार फरार झाला असून त्याचा फोनही बंद आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयाची सुई थेट ऋषभकडे वळवली आहे.
वादविवादातून ऋषभनेच ही हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून फेकून दिल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या घरात शोककळा पसरली असून नातेवाईक दमनकडे रवाना झाले आहेत. दमन पोलीस सध्या आरोपीच्या शोधात ठिकठिकाणी छापेमारी करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.