Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.

रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशील इर्शाळगड वसला आहे. मुंबई-पुणे जुन्या हायवेच्या शेजारी हा गड पाहायला मिळतो. तसेच कल्याण-पुणे लोहमार्गावरून प्रवास करताना देवणीचा सुळका, माथेराण, पेब, म्हैसमाळ, प्रबळगड, मलंगगड आणि इर्शाळगडाचे दर्शन होते. मुंबई, पुणे आणि ठाणे पासून ईर्शाळगड हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या संख्येने गिर्यारोहक, सह्याद्रीप्रेमी गडावर येत असतात.

इर्शाळगडावर विशाळादेवीची छोटेखाणी मंदिर आहे. याच विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन गडाचे नाव इर्शाळगड झाले असावे, असे स्थानिकांच्या माध्यमातून सांगण्यात येते. पाहायला गेल तर इर्शाळगड हा एक सुळखा आहे. त्यामुळेचइर्शाळगडाचा इतिहासात उल्लेख आढळून येत नाही. इसवी सन 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडी, कल्याण आणि रायरी पर्यंतचा सर्व परिसर ताब्यात घेतला, तेव्हा इर्शाळगड देखील स्वराज्यात दाखल झाला असावा. प्रबळगड, कलावंतीणी हे गड शेजारी शेजारी आहेत. या गडाच इतिहासात फारस नाव नसलं तरी, गडाखाली असणाऱ्या चौक या गावाची इतिहासात नोंद आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.

गडाची उंची, प्रकार आणि सध्याची अवस्था

इर्शाळगड हा एक सुळखा असून समुद्रसपाटीपासून गडाची उंची 3,7000 फूट इतकी आहे. गिरीदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या या गडावर चढण्याची श्रेणी अतिकठीण आहे. गिर्यारोहणासाठी हा गड उत्तम आहे.

गडावर जाण्याच्या वाटा कोणत्या आहेत?

मुंबई-पुणे वरून येणाऱ्या भटक्यांसाठी चौक रेल्वे स्थानकावर उतरून गडाच्या दिशेने प्रवास करावा. तसेच खोपोली रेल्वेस्थानकावरून सुद्धा गडाच्या दिशेने जाणे सोईस्कर ठरू शकते. खोपोलीवरून एसटी किंवा सहा आसणी रिक्षा तुम्हाला चौक या गावापर्यंत घेऊन जाईल. चौकवरून इर्शाळगडाच्या पायथ्याला चालत जाण्यास अर्धा तास लागतो. तुमची स्वत:ची गाडी असेल, तर गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी घेऊन जाता येईल. गडावर जाण्याची ही एकच मुख्य वाट आहे. गडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यास अंदाजे एक तास लागु शकतो.

गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे

इर्शाळगड हा एक सुळखा असल्यामुळे विस्तीर्ण सह्याद्री सोडला, तर गडावर पाहण्यासारखे काही नाही. परंतु इर्शाळगड माचीपासून गडावर जाताना वाटेमध्ये पाण्याचे टाके लागते. गडावर जाण्यासाठी एक शिडी लावण्यात आली आहे. तसेच गडावर विशाळादेवीचे मंदिर सुद्धा पाहायला मिळते. गडावर पोहचल्यावर गडावरून माथेरानची विस्तीर्ण डोंगररांग, मलंगगड, चंदेरी, कर्नाळा, माणिकगड आणि इर्शाळगडाचा सोबती प्रबळगड नजरेस पडतो.

गडावर जेवणाची आणि पाण्याची सोय आहे का?

गडावर जेवणाची, राहण्याची आणि पाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे गडावर जाताना आपली सोय आपणच करावी. जेव्हा इर्शाळवाडी होती तेव्हा जेवणाची आणि राहण्याची सोय होत होती. परंतु दुर्दैवाने मोठी दुर्घटना घडली आणि इर्शाळवाडी नष्ट झाली. त्यामुळे गडावर राहण्याची, जेवणाची आणि पाण्याची सोय नाही.

ईर्शाळवाडी दुर्घटनेची थोडक्यात माहिती

इर्शाळवाडी म्हणजे इर्शाळगडाचे पहारेकरी अस म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. ज्या ज्या शिवप्रेमींनी 2023 पूर्वी इर्शाळगडाला भेट दिली होती. त्या सर्वांना इर्शाळवाडीच्या नागरिकांचा सहवास लाभला. बरेच जण इर्शाळवाडीमध्ये राहिले सुद्धा असतील. 40 ते 45 कुटुंबे इर्शाळवाडीमध्ये आनंदाने राहत होती. काही जण शेतीची कामे करत होती, काहीजण गडाखाली चौक या गावामध्ये कामाला होती. याच कुटुंबांमधील काही मुले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाडीपासून लांब आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. सर्व काही सुरळीत सुरू होत. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. 2023 चा जुलै महिना इर्शाळवाडीसाठी काळरात्र ठरला. रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू होता. वादळाचा वेग सुद्धा प्रचंड होता. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. अशातच खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावात बुधावर (19 जुलै 2023) दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली. रात्रीच्या अंधारात साधारण 11:30 ते 12 च्या दरम्यान इर्शाळवाडीवर दरड कोसळली. पाहता पाहता वाडीतील बरीच कुटुंब या मलब्याखाली दबली गेली. 70 हुन अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबली गेली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे बचाव कार्य करताना प्रशासनाला सुद्धा मोठी कसरत करावी लागली. परंतु मलबा खूप जास्त असल्यामुळे आणि इर्शाळवाडी डोंगरामध्ये असल्यामुळे प्रशासनाला मलबा बाजूला करताना बरेच कष्ट घ्यावे लागले. मुंबई-रायगड आणि पुण्यातील अनेक संस्थांनी यावेळी मदतीचा हात पुढे करत प्रशासनाला सहकार्य केले.

दुर्घटना झाल्यानंतर चार दिवस भर पावसात बचावकार्य सुरू होते. दुर्घटनेनंतर येथील दुर्गभ भौगोलिक स्थिती, पावासामुळे अंधार आणि निसरडा रस्ता यांच्यामुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाला. परंतु तरीही बचावकार्य वेगाने सुरू होतं. अखेर 22 जुलै 2023 रोजी प्रशासनाने बचावकार्य थांबवले. या दुर्घटनेत 27 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली, तर अंदाजे 80 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. तसेच या दुर्घटनेत एकूण 22 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत जणावरं सुद्धा मोठ्या प्रमाणात मलब्याखाली दबली गेली. या दुर्घटनेतील 31 विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत होते त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. परंतु यापैकी बऱ्याच मुलांचं कुटुंब या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं.

हे सुद्धा वाचा

1) Sondai Fort; मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड
2) कमळगड किल्ला/Kamalgad fort Information In Marathi

Leave a comment