५,८०० हुन अधिक अभ्यासक्रम L’oreal Boost Scholarship 2023

L’oreal Boost Scholarship 2023 हा महत्वकांक्षी उपक्रम वंचीत आणि गरजू तरुणांना चांगले शिक्षण घेता यावे आणि त्यांच्या शिक्षणाला कोणताही अढतळा येऊ नये हा महत्वाचा उद्देश या L’oreal Boost Scholarship चा आहे.
संपुर्ण भारतातील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकणार आहेत. फक्त शिक्षणच नव्हे तर एक उत्तम व्यावसायिक घडवण्यासाठी सुद्धा ही शिष्यवृत्ती विध्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाची भूमिका बजावनार आहे.

scholarship for girls / scholarship for degree students / scholarship for undergraduate students in India

पात्रता

• संपुर्ण भारतातील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणारा विध्यार्थी हा १८ ते ३० या वयोगटातील असला पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने आयटीआय डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदवीपुर्व (scholarship for undergraduate students in India) आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले पाहिजे.
• किंवा अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने NIRF यादीत समावेश असलेल्या कॉलेज किंवा विध्यापीठातून पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरी केलेली असावी. पण अशा उमेदवारांना ५ वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव नसावा.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ८ लाख रु. पेक्षा कमी असावे

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणारा विध्यार्थी हा १८ ते ३० या वयोगटातील नसेल तर तो या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने आयटीआय डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदवीपुर्व आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नसेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• किंवा अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने NIRF यादीत समावेश असलेल्या कॉलेज किंवा विध्यापीठातून पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरी केलेली नसेल. किंवा ५ वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव असेल तर तो विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ८ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ उचलु शकणार नाही.

फायदा काय होणार

• विध्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती सर्वच बाबतीत फायदेशीर ठरणार आहे.
• उध्योग क्षेत्रातील अग्रगण्य अशा उध्योग तज्ञांद्वारे आयोजीत केल्या जाणाऱ्या ऑनलाईन अपस्किलिंग वेबिनार किंवा कार्यशाळेत सहभागी होण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
• या कार्यक्रमात विविध महत्वपुर्ण आणि आवश्यक विषयांचा समावेश असणार आहे.
1. व्यावसायिक नेटवर्किंग, वैयक्तिक ब्रँडिंग आणि मुलाखत कौशल्ये.
2. वेळेचे व्यवस्थापन कसे करावे त्याची सविस्तर माहिती होईल.
3. सर्वात महत्वाच म्हणजे संभाषण कौशल्ये कसे असावे याच ज्ञान दिले जाईल.
4. तसेच आयुष्य घडविणाऱ्या अनेक रोमांचक विषयांबद्दल माहिती होईल.
• कोर्सेरावर उपलब्ध असणाऱ्या ३४ अभ्यासक्रमांसाठी ३ महिन्यांचा विनामुल्य अमर्याद प्रवेश दिला जाईल. तसेच, ५,८०० हुन अधिक अभ्यासक्रम, व्यावसायिक प्रमाणपत्रे आणि जगभरातील विध्यापिठे आणि कंपन्यांकडून पदवी असलेले शैक्षणीक व्यासपीठ.
• लॉरिअल इंडिया मधील उध्योग तज्ञांकडून समोरा समोर बसवून मार्गदर्शन सत्र घेण्यात येईल.

हे लक्षात ठेवा

• जे विध्यार्थी सध्या शिकत आहेत आणि त्यांच्या पदवी किंवा पदव्युत्तरच्या अंतिम आणि प्री-फायनल वर्षात आहेत. त्या विध्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
a) ज्या विध्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ३ वर्षांचा आहे, अशा दुसऱ्या किंवी तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या विध्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
b) ज्या विध्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ४ वर्षांचा आहे, अशा तिसऱ्या किंवी चौथ्या वर्षाला असणाऱ्या विध्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
c) ज्या विध्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ५ वर्षांचा आहे, अशा चौथ्या किंवी पाचव्या वर्षाला असणाऱ्या विध्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
d) आणि जे विध्यार्थी दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला आहेत. त्यांच्यापैकी दुसऱ्या वर्षातील विध्यार्थी पात्र असेल.
• समजा एखाध्या विध्यार्थ्याने पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमापुर्वी किंवा शिक्षण घेत असताना काम केले असेल, तर त्यांच्या कामाचा अनुभव हा ५ वर्षांपेक्षा जास्त नसावा.

महत्वाचे

• ऑनलाइन अपस्किलिंग वेबिनारला उपस्थित राहणाऱ्या अर्जदाराला लॉरिअल प्रोफेशनलसह वन-टु-वन मेंटॉरशिपसाठी आणि ३४ अभ्यासक्रमांसाठी अमर्यादित ३ महिन्यांच्या प्रवेशासाठी मिळवायचा असेत तर गुणवत्ता आधारीत चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
• निवड झालेल्या लाभार्थीला प्रवेश मिळाल्यावर कोर्सेरा अभ्यासक्रमामध्ये पुढील अभ्यासक्रम असणार आहेत.
 अत्यावश्यक डिजिटल, ई-कॉमर्स आणि डेटा स्किल्सवरील ११ अभ्यासक्रम
 लोक कौशल्य आणि अत्यावश्यक व्यवसाय कौशल्यांवर आधारित १४ अभ्यासक्रम
 शाश्वतता कौशल्यांवर आधारित ५ अभ्यासक्रम
 व्यवसाय इंग्रजी प्राविण्यत्तेवर आधारित ४ अभ्यासक्रम

कागदपत्रे कोणती लागणार

• ओळखीचा पुरावा ज्याच्यावर वयाचा उल्लेख असावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
• मागील पात्रता परीक्षेची मार्कशीट
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म १६A, वेतन स्लिप किंवा उत्पन्न प्रमाणपत्र इ.)
• अर्ज करणारा विध्यार्थी शिकत आहे हे सिध्द करण्यासाठी प्रवेशाचा पुरावा किंवा दस्तऐवज (कॉलेज / संस्थेचे ओळखपत्र / प्रवेश शुल्क पावती इ.)

निवड प्रक्रिया पुढील प्रकारे असेल

1) नोंदणी – शिष्यवृत्तीत सहभागी होण्यासाठी, विध्यार्थ्यांना अधिकृत वेबपृष्ठावर प्रदान केलेल्या नियुक्त अर्ज दुव्याद्वारे अर्ज प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे.
2) चाचणी – अर्जदारांना गुणवेत्तवर आधारीत चाचणी द्यावी लागणार आहे.
3) ३ महिन्यांसाठी ३४ कोर्सेस अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश – मेरिट आधारित चाचणीमधील उमेदवाराच्या कामगिरीवर आणि वरती सूचीबध्द केलेल्या पात्रता निकषांच्या आधारावर अंतिव निवड केली जाईल. त्यानंतर विध्यार्थ्याला ३ महिन्यांच्या कोर्सेरावरील ३४ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळेल.

अर्ज करण्याची अंतीम मुदत
१७ डिसेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक
L’oreal Boost Scholarship 2023

Leave a comment