विध्यार्थीनींसाठी १,००,००० रु. शिष्यवृत्ती Navisite’s Next Steminist Scholarship India 2023-24/ STEM

विध्यार्थीनींसाठी १,००,००० रु. शिष्यवृत्ती (Scholarship For Undergraduate students in India). विध्यार्थींनींना चांगले शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी नेव्हीसाइट्स नेक्स्ट स्टेमिनिस्ट स्कॉलरशिप २०२३-२४ प्रदान करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यामागचा कंपनीचा मुख्य हेतु म्हणजे तंत्रज्ञानातील स्त्री आणि पुरुष हा भेदबाव नष्ट करणे. मुलींना सुद्धा या STEM What is stem (Science, technology, engineering, and mathematics) या क्षेत्रात करियर करता याव त्यांना कोणताही आर्थीक अडथळा येऊ नये यासाठी नेव्हीसाइट्स नेक्स्ट स्टेमिनिस्ट स्कॉलरशिप फायदेशीर ठरणार आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत BE/BTech, MBBS, BDS किंवा Bsc अभ्यासक्रमांसारख्या पूर्ण-वेळ अंडरग्रॅज्यूट प्रोग्राममध्ये प्रवेश घेतलेल्या महिला विध्यार्थीनींना त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी १,००,००० लाख रु. शिष्यवृत्ती दिली जाईल.

नेव्हीसाइट्स नेक्स्ट स्टेमिनिस्ट स्कॉलरशिप २०२३-२४

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थीनी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनींनी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी २२ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असणे आवश्यक आहे.
• मान्यताप्राप्त महाविध्यालये किंवा विध्यापीठांमध्ये STEM (Science, technology, engineering and mathematics) या क्षेत्रात पूर्णवेळ पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विध्यार्थीनी पात्र आहेत.
• इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत किमान ९० टक्के गुण मिळालेले असावेत.
• जर एखादी विध्यार्थीनी ३ वर्षांचची पदवी करत असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांसाठी २) चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षांसाठी ३) पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणी चौथ्या वर्षांला नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
• खाली सूचीबद्ध केलेल्या अभ्यासक्रमापैकी एकमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.
1) BE/BTech : कम्प्युटर सायन्स, संगणक अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान, संगणक हार्डवेअर अभियांत्रिकी, संगणक सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, गेम आणि इंटरएक्टिव्ह मीडिया डिझाइन, माहिती प्रणाली, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापण माहिती प्रणाली, प्रणाली अभियांत्रिकी किंवा भारतातील इतर कोणत्याही मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदवी.
2) वैधयकीय पदवी : एमबीबीएस आणि बीडीएस
3) बीएससी : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जैवतंत्रज्ञान ई. (कोणत्याही विज्ञान आणि तंत्रज्ञानाला शिकत असणाऱ्यांना परवानगी आहे), डेटा विज्ञान, डेटा विश्लेषण.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

• बारावीची मार्कशीट
• सरकारने जारी केलेला कोणताही एक ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदान कार्ड/ड्रायविंग लायसन्स/पॅन कार्ड)
• चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेशपत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनफाईड प्रमाणपत्र)
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचे किंवा पालकांचे बँक खाते तपशील.
• पासपोर्ट आकाराचा फोटो

फायदा काय होणर
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विध्यार्थीनींसाठी १,००,००० रु. शिष्यवृत्ती.

हे लक्षात ठेवा

वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचे निकष
• नॅव्हिजिट कर्मचारी आणि पहिल्या चुलत भावापर्यंतच्या विस्तारीत कुटुंबासाठी १२ लाख वार्षिक किंवा त्यापेक्षा कमी.
• नॉन- नॅव्हिजिट कर्मचारी आणि नातेवाईकांसाठी ५ लाख प्रती वर्ष किंवा त्याहून कमी.
• नॅव्हिजिट कर्मचार्यांच्या नातेवाईकांनी अर्ज करताना संदर्भ कोड म्हणूण NAVISITE कर्मचारी आयडीचा वापर करावा.
• फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि भरून झाल्यावर दोन वेळा चेक करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
०३ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी लिंक
नेव्हीसाइट्स नेक्स्ट स्टेमिनिस्ट स्कॉलरशिप २०२३-२४ / STEM

Leave a comment