Chess Scholarship – स्कॉलरशीप बुद्धिबळाच्या पटावरच्या हिऱ्याला घडवण्याची, क्लिक करून लगेच वाचा…

राजा, वजीर, घोडा आणि उंटांच्या चालींमागे लपलेलं आयुष्याचं कोडं जाणून घेण्याची सवय बुद्धीला तल्लक करण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरते. परंतू त्यासाठी सराव आणि योग्य मार्गदर्शनाची गरजही तितकीच महत्त्वाची आहे. बुद्धिबळ (Chess Scholarship) खेळण्याची सवय खऱ्या आयुष्यात जगतानाही अनेक कठीण निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याच जाणकारांनी म्हटलं आहे. परंतू बऱ्याच वेळा बुद्धिबळ शिकण्यासाठी क्लास कुठे लावायचा इतपासून पालकांचे प्रश्न सुरू होतात ते खर्च परवडेल का आणि त्याचा आपल्या मुलाला फायदा होईल का? इथपर्यंत येऊन पोहोचतात. या सर्व गोष्टींचा विचार करून ‘nurtr’ या संस्थेने ‘नर्चरिंग माइंड्स विथ चेस’ (Nurturing Minds with Chess) हा उपक्रम सुरू केला आहे.

‘nurtr Neo’ चेस प्रोग्राम नेमका काय आहे?

nurtr Neo हा ‘nurtr’ या ऑनलाइन चेस अकॅडमीचा एक विशेष कोर्स आहे. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन ग्रँडमास्टर आर. बी. रमेश (GM R.B. Ramesh) यांच्यासह इतर नामांकित खेळाडू, प्रशिक्षक आणि ऑलिम्पिक दर्जाच्या मेंटल-परफॉर्मन्स ट्रेनर्सद्वारे केले जाते. ‘नर्चरिंग माइंड्स विथ चेस’ या शिष्यवृत्तीमुळे (Bursary) शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत आहे.

nurtr Neo चेस स्कॉलरशिपचे मुख्य फायदे

  • थेट ग्रँडमास्टर्सकडून लाईव्ह कोचिंग: फक्त रेकॉर्ड केलेले व्हिडिओ नाहीत, तर 50 तासांपेक्षा जास्त वेळेचे लाईव्ह कॅम्प्स थेट ग्रँडमास्टर दर्जाच्या प्रशिक्षकांकडून चालवले जातात.

  • कोर्स लायब्ररी: लाईव्ह सेशन्ससोबतच 500 तासांपेक्षा जास्त कालावधीचे एडिट केलेले व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये वेळोवेळी नवीन माहितीची भर घातली जाते.

  • भारतीय बुद्धीबळातील मोठ्या दिग्गजांचे मार्गदर्शन: जीएम आर. बी. रमेश यांच्यासह 40 तासांहून अधिक कालावधीचे सिनेमॅटाइज्ड कोर्सेस, ज्यात दिग्गज खेळाडू, मार्गदर्शक आणि मानसिक कार्यक्षमता वाढवणारे ट्रेनर्स समाविष्ट आहेत.

  • उत्पन्नानुसार फी सवलत: प्रत्येकासाठी एकच डिस्काउंट देण्याऐवजी, कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार 3 टप्पे पाडण्यात आले आहेत, जेणेकरून गरजूंना सर्वाधिक फायदा होईल.

  • पूर्व अनुभवाची गरज नाही: यासाठी कोणतीही रेटिंग किंवा आधीच्या अनुभवाची अट नाही. हा कोर्स नवशिक्यांपासून ते ज्यांना खेळाचे मूलभूत नियम माहीत आहेत, अशा सर्वांसाठी डिझाइन केला आहे.

फी ची रचना: तुम्हाला किती शुल्क भरावे लागेल?

वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तुम्हाला भरावयाचे शुल्क सवलत (Discount)
₹ ८ लाखांपेक्षा कमी ₹ १,००० ९०% फी माफ
₹ ८ ते १५ लाख ₹ ४,९९९ ५०% फी माफ
₹ १५ लाखांपेक्षा जास्त ₹ ९,९९९ पूर्ण शुल्क (कोणतीही सवलत नाही)

 

(टीप: ज्यांना उत्पन्नाचा दाखला किंवा कागदपत्रे जमा करायची नाहीत, ते थेट ‘पूर्ण शुल्क’ भरून प्रवेश घेऊ शकतात.)

पात्रतेचे निकष (कोणी अर्ज करावा?)

  • अर्जदार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

  • उमेदवार सध्या कोणत्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असावा.

  • अर्जदाराचे वय ५ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – बुद्धिबळाचा पट

महत्त्वाची टीप (Disclaimer):

प्रस्तुत लेखातील माहिती ही केवळ माहिती आणि जागरूकतेच्या उद्देशाने देण्यात आली आहे. ‘nurtr Neo’ स्कॉलरशिप, फीची रचना, सवलत आणि पात्रतेचे निकष संबंधित संस्थेच्या (nurtr / Buddy4Study) अधिकृत धोरणांवर आधारित आहेत. या योजनेचे नियम, अटी किंवा शुल्कामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी किंवा कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी वाचकांनी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला (Official Website) भेट देऊन सर्व माहितीची खात्री करून घ्यावी.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!