आजच्या डिजिटल जगात, तंत्रज्ञानाने प्रचंड वेग पकडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सहज आणि सोपी झाली आहे. लहान मुले सुद्दा या तंत्रज्ञानाच्या युगात आघाडीवर आहेत. दोन ते तीन वर्षांची मुले अगदी सहज मोबाईल हाताळताना दिसतात. गेम खेळणे, विविध व्हिडिओ पाहणे या सारख्या अनेक गोष्टी त्यांच्या सुरू असतात. YouTube वर व्हिडिओ पाहण्याला मुलांची सर्वाधिक पसंती असते. पालक सुद्दा मुलांना युट्यूबवर विविध व्हिडिओ दाखवत असतात. मात्र बऱ्याच वेळा चुकीचे व्हिडीओ दाखवले गेल्यामुळे मुलांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच वेळा पालकांनाही समजत नाही की, मुलांना कोणते व्हिडिओ दाखवायला पाहिजे, कोणते नाही. या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणेज हा ब्लॉग.
जगभरात व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube चा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे YouTube हे शिकण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. ते मनोरंजनाचे मुख्य केंद्र असले तरी, ते मुलांना विज्ञान, गणित, इतिहास, कला आणि असंख्य गोष्टी शिकण्याची संधी YouTube च्या माध्यमातून निर्माण होते. परंतु त्याचा योग्य वापर होणे तितकेच गरजेचे आहे. या मुलांनी युट्यूबवर कोणते व्हिडिओ पाहिले पाहिजे, याची थोडक्यात माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
नॅशनल जिओग्राफिक किड्स
नॅशनल जिओग्राफिक किड्स आश्चर्यकारक दृश्ये, मजेदार तथ्ये आणि आकर्षक सामग्री प्रदान करते जे मुलांना नैसर्गिक जगाच्या चमत्कारांचा शोध घेण्यास मदत करते. प्राण्यांच्या माहितीपटांपासून ते सांस्कृतिक कथांपर्यंत, मुले विविध विषयांबद्दल सविस्तर शिक्षण घेतात. प्रामुख्याने 6 ते 12 वयोगटातील मुले या चॅनलवर व्हिडिओ पाहू शकतात. या चॅनलवर वन्यजीव साहस, पर्यावरण संवर्धन आणि भूगोल सारख्या घटकांची सविस्तर माहिती शिकवली जाते.
क्रॅशकोर्स किड्स
क्रॅशकोर्स किड्स हे विज्ञान सोपे आणि मजेदार बनवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. सबरीना क्रूझ यांनी हे चॅनल होस्ट करत असून पृथ्वीच्या परिसंस्था, खगोलशास्त्र आणि अभियांत्रिकी मूलभूत गोष्टींसारख्या संकल्पना हास्य विनोदाच्या माध्यामातून मुलांना शिकवतात. प्रामुख्याने प्राथमिक आणि माध्यमि शाळांमधील मुलांसाठी हा युट्यूब चॅनल योग्य आहे.
खान अकादमी किड्स
गणिताच्या मूलभूत गोष्टींपासून ते ध्वनीशास्त्रापर्यंत, खान अकादमी किड्स प्रीस्कूलर आणि प्राथमिक शाळेतील मुलांसाठी मोफत, उच्च-गुणवत्तेची शैक्षणिक सामग्री प्रदान करते. त्यांचे व्हिडिओ मुलांनी आवर्जून पाहिले पाहिजेत. साधारणपणे 3 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हा युट्यूब चॅनल आहे. अवघड गणित समजून घेण्यासाठी हा युट्यूब चॅनल मुलांच्या मेंदूला चालना देण्यासाठी उपयोगी आहे.
टेड-एड
टेड-एड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अॅनिमेटेड शैक्षणिक व्हिडिओ दाखवले जातात. मुलांना विचारायला आवडतात अशा प्रश्नांना व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले जाते. जसे की, “आपण स्वप्न का पाहतो?” आणि “विमान कसे उडतात?” हे चॅनेल कुतूहल, सर्जनशीलता आणि टीकात्मक विचारांना प्रोत्साहन देते. साधारणपणे 8 वर्ष आणि त्याहून मोठे असणाऱ्या सर्वांसाठी हे युट्यूब चॅनल आहे.
सायशो किड्स
सायशो किड्स मजेदार प्रयोग आणि प्रात्यक्षिकांसह किचकट विज्ञान विषयांना सोपे करते. जेसी आणि तिचा रोबोट मित्र स्क्वीक्स यांनी आयोजित केलेले, ते शिकण्यास उत्सुक असलेल्या जिज्ञासू तरुण मनांसाठी परिपूर्ण आहे. 5 ते 10 वयोगटाती मुलांसाठी हे युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानवी शरीर, हवामान आणि वनस्पती जीवशास्त्र सारख्या घटकांची माहिती दिली जाते.
आर्ट फॉर किड्स हब
आर्ट फॉर किड्स हब रेखाचित्र, चित्रकला आणि हस्तकला यासाठी स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल देते. कुटुंबाद्वारे चालवले जाणारे हे युट्यूब चॅनल अत्यंत परस्परसंवादी आहे, जे पालकांना त्यांच्या मुलांसह कलात्मक प्रवासामध्ये समावीष्ट होण्याचे अवाहन करते. सर्व वयोगटातील मुलांनी पालकांनी हे युट्यूब चॅनल पाहिले पाहिजे. या युट्यूब चॅनलवर विविध कार्टूनची पात्रे, हस्तकला आणि DIY क्राफ्ट सारख्या गोष्टी शिकवल्या जातात.
कॉस्मिक किड्स योगा
योगासह कथाकथन एकत्र करून, हे चॅनेल मुलांना सक्रिय आणि जागरूक राहण्यास प्रोत्साहित करते. प्रत्येक सत्रामध्ये योगाच्या विविध पद्धती शिकवल्या जाता. साधारणपणे 3 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे युट्यूब चॅनल आहे.
BrainPOP
BrainPOP त्याच्या विचित्र पात्र टिम आणि मोबीसह विज्ञान, इतिहास, गणित आणि कला यावरील अॅनिमेटेड व्हिडिओ जिवंत करते. ते मोठ्या संकल्पनांना सहज समजतील अशा पद्धतीने सादर करतात. साधारण 8 ते 14 वयोगटातील मुलांसाठी हे युट्यूब चॅनल आहे.
अल्फाब्लॉक्स आणि नंबरब्लॉक्स
हे दोन भगिनी चॅनेल अॅनिमेटेड कथा आणि आकर्षक गाण्यांद्वारे साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकवतात. यामुळे मुलांना पाहण्यास मजा येचे. अल्फाब्लॉक्स ध्वनीशास्त्रावर लक्ष केंद्रित करते, तर नंबरब्लॉक्स गणिताच्या संकल्पना खेळकर पद्धतीने स्पष्ट करतात. शब्दांची स्पेलिंग, मोजणी आणि मूलभूत अंकगणित शिकण्यासाठी हे युट्यूब चॅनल उपयोगी आहे.
मिस्ट्री डग
मिस्ट्री डग मुलांच्या दैनंदिन प्रश्नांची उत्तरे त्यांच्या नैसर्गिक उत्सुकतेला पूर्ण करणाऱ्या आकर्षक व्हिडिओंसह देतो. “आकाश निळा का आहे?” असो किंवा “मुंग्या अन्न कसे शोधतात?” प्रत्येक उत्तर एक साहस आहे. साधारण 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी हे युट्यूब चॅनल आहे. नैसर्गिक घटना, अभियांत्रिकी आणि समस्या सोडवण्याची मुलांची समज यामुळे विकसीत होते.
पीकाबू किड्झ
हे अॅनिमेटेड चॅनेलमध्ये शैक्षणिक धडे आणि नैतिक मूल्यांचे मिश्रण पहायला मिळते. विज्ञान संकल्पनांपासून ते चांगल्या शिष्टाचारापर्यंत, पीकाबू किड्झ तरुण विद्यार्थ्यांना शिक्षण आणि मनोरंजनाचे संतुलित मिश्रण प्रदान करते. साधारणपणे 4 ते 10 या वयोगटातील मुलांसाठी या युट्यूब चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. मानवी अवयव, सौर यंत्रणेतील तथ्ये आणि शिष्टाचारा संबंधित रंजक माहिती व्हिडिओंच्या माध्यातून सादर केली जाते.
सुरक्षित YouTube चॅनल पाहण्यासाठी पुढील टिप्स फायद्याच्या ठरू शकतात. जसे की,
- त्यांच्या स्क्रीन वेळेचे निरीक्षण करणे. मुलं किती वेळ मोबाईलवर घालवत आहेत, ते पाहणे गरजेचे आहे.
- वयानुसार सामग्रीसाठी YouTube Kids वापरणे.
- शक्य असेल तेव्हा व्हिडिओंची प्री-स्क्रीनिंग करणे.
शैक्षणिक YouTube चॅनेल हे मुलांना परिपक्व करण्यासाठी उपयोगी आहेत. परंतु त्याच बरोबर पालकांचे मुलांवर लक्ष नसेल, तर चुकीचे व्हिडिओ पाहिले गेल्यामुळे मुलांच्या जडणघडणीवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यताही अधिक वाढते. त्यामुळे वयोगटानुसार मुलांना कोणते व्हिडिओ दाखवायचे कोणते नाही, याचे ज्ञान पालकांना सुद्दा असणे गरजेचे आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.