Cloud Computing Courses – क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय रे भाऊ? वाचा सविस्तर…

Cloud Computing Courses 

इंटरनेटच्या जाळ्याने जगावर विळखा घातला आहे. त्यामुळे सर्व गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाईल ने हक्काची जागा घेतली आहे. मोबाईल सोबत लॅपटॉप, टॅब, कंप्युटर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. मात्र, या सर्व गोष्टी हाताळणं शक्य झालं ते म्हणजे Internat मुळे. इंटरनेट शिवाय या सर्व गोष्टी निरर्थक ठरू शकतात. घर बसल्या हव्या त्या गोष्टींची माहिती आपल्याला इंटरनेटमुळे अवघ्या काही सेकंदात मिळून जाते. इंटरनेट हा शब्द मी सुरुवाती पासूनच बराच वेळा वापरला कारण इंटरनेटचा आणि Cloud Computing चा अगदी जवळचा संबंध आहे.

Cloud Computing आणि वर्तमान Trend

क्लाउड कॉम्प्युटिंगच्या जागतीक मार्केटचा विचार केला तर, 2021 साली क्लाउड कॉम्प्युटिंगचे मार्गेट 445.3 अब्ज डॉलर होते. ते वाढून 2027 पर्यंत 1,240.9 अब्ज डॉलर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे 2026 पर्यंत अंदाजे 14 दशलक्ष नवीन रोजगारांची निर्मीती क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे होण्याची अपेक्षा असल्याचे International Data Corporation (IDC) ने जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय | What is Cloud Computing

Cloud म्हणजे ढग असा साधा सरळ त्याचा मराठीत अर्थ होते. इंटरनेटच्या मदतीने आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी सहज मिळवू शकतो. विविध प्रकाराच्या संगणकीय सेवा इंटरनेटमुळे प्रदान केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर, स्टोरेज स्पेस किंवा एखादे सर्व्हर सुद्धा उपलब्ध करून दिले जातात. याच इंटरनेटच्या संगणकीय सेवा प्रदान करण्याच्या वृत्तीला आपण Cloud Computing असे म्हणू शकतो. तुम्हाला अजूनही क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय हे समजलं नसेल, तर अजून सोप्या भाषेत त्याला समजून घेऊ. इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारच्या संगणकीय सेवा वापरकर्त्यांना प्रदान करणे म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग होय.

Google, Amazon, Flipkart या सारख्या सर्व्हिसचा वापर करत असताना आपला डेटा म्हणजेच नाव, नंबर, इमेल आयडी आणि पत्ता हा क्लाउडमध्ये साठवला जातो. त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की एकदा आपण आपल्या सर्व डिटेल्स भरल्या की पुन्हा त्या भराव्या लागत नाहीत. कारण त्या क्लाउडमध्ये साठवल्या जातात. क्लाउड कॉम्प्युटिंग या सर्व्हिसमध्ये Infrastructure Platform Application आणि Storage Space यासारख्या सर्व सुविधा वापरकर्त्यांना इंटरनेटच्या मदतीने उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष बाब म्हणजे ही सर्व्हिस घेण्याचे बंधन वापरकर्त्यांना नसते. म्हणजेच ज्या सर्व्हिसचा आपण वापर करत आहोत, त्याच सर्व्हिसचे आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजेच Pay as you go pricing (जेवढ पाहीजे तेवढचं घ्यायचं). क्लाउड कॉम्प्युटिंगच्या उदाहणांचा विचार केला तर, त्यामध्ये प्रामुख्याने Facebook, Instagram, YouTube, Google, Dropbox, Gmail, Flickr, Picasa, Amazon, Twitter इत्यादी घटकांचा समावेश आहे.

क्लाउड कंप्युटींगचा जन्म कसा झाला?

प्रामुख्याने 1990 ते 2000 या कालावधीत तंत्रज्ञानात बदल होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, 2000 सालानंतर तंत्रज्ञानातील बदलाने वेग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंप्युटरबेस काम करण्याला प्राधान्य देण्याल आले. कारण त्यामुळे वेळेत बचत होती. संगणकाचा वापर वाढला त्यामुळे कंपन्यांनी Virtual Private Network (VPN) हे खाजगी नेटवर्क पुरवायला सुरुवात केली. त्यामुळे कंपन्यांचा बऱ्यापैकी भार हा VPN मुळे हलका झाला. कारण त्यांना कंपनीचे संगणक सुरू ठेवण्यासाठी स्वत:चे सर्व्हर ठेवण्याची गरज पडली नाही. हे सर्व शक्य झालं ते क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे. अशा पद्धतीने संगणकावर करत असलेले काम आभासी पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी म्हणून क्लाउड कॉम्प्युटिंगचा जन्म झाला असं म्हणाव लागेल.

क्लाउड कॉम्प्युटिंग शिकणे का गरजेचे आहे?

तंत्रज्ञानाचा वाढत्या वापरामुळे क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये प्राविण्य मिळवलेल्या कौशल्यपूर्ण उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचबरोबर हे एक कौशल्यपूर्ण क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती सर्वाधिक पगार घेणाऱ्या आयटी व्यावयासिकांपैकी एक आहेत. त्यामुळे चांगला पगार या क्षेत्रात मिळू शकतो. वित्त, आरोग्यसेवा यांसारख्या उद्योगांमध्ये क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये प्राविण्य मिळवलेल्या उमेदवारांना मोठी मागणी आहे. त्यामुळे करिअरला चांगली दिशा देऊन सुंदर भविष्य घडवण्याची संधी निर्माण होते.

क्लाउड कॉम्प्युटिंगचे प्रकार आणि सर्व्हिस | Types Of Cloud Computing

क्लाउड कॉम्प्युटिंगचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात. प्रत्येक प्रकाराचं आपले एक वैशिष्ट्य आहे. Private Cloud, Public Cloud, Community Cloud आणि Hybrid Cloud या चार प्रकारांमध्ये क्लाउड कंप्युटिंगची विभागणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सर्व्हिसचा विचार केला, तर त्यांची विभागणी तीन प्रकारामध्ये करण्यात आली आहे. प्रामुख्याने क्लाउड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून Infrastructure as a service (Iaas), Platform as a service (PaaS) आणि Software as a service (Saas) या सर्व्हिसेस दिल्या जातात.

Business Analyst – आपल्या करिअरच्या कक्षा वाढवा, या क्षेत्रात आहे मोठी संधी

क्लाउड कॉम्प्युटिंग कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता | Eligibility For Cloud Computing Course

क्लाउड कॉम्प्युटिंग कोर्सला प्रवेश घेण्याचे दरवाजे इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर खुले होतात. पदवीपूर्व, पदवीपूर्ण झाल्यानंतर आणि ऑनलाईन अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता. क्लाउड कॉम्प्युटिंग या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 12 वी कोणत्याही शाखेतून विद्यार्थ्याने उत्तीर्ण केलेली असावी. प्रामुख्याने तीन ते चार वर्षांचा हा कोर्स महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो. ज्या विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये यायचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी Computer Science मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. पदवी पूर्ण झाल्यानंतर कोर्सचा कालावधी हा दोन वर्षांचा असतो. त्याच बरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑलनाईन 6 ते 25 आठवड्यांचा कोर्स करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.

Cloud Computing Courses Fees And Top Institutions

क्लाउड कॉम्प्युटिंग हे सध्याच्या घडीचा ट्रे़डिंगमध्ये असणारे क्षेत्र आहे. त्यामुळे देशातील विविध संस्थांमध्ये त्याचे शिक्षण दिले जाते. त्यासाठी आकारली जाणारी फी प्रत्येक संस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी आहे. भारतामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंगचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या काही अव्वल संस्था आहेत. या संस्थांमध्ये प्रामुख्याने IIT Kanpur, IIT Kharagpur, IIT Guwahati, IIT Roorkee, IIT Indore आणि Manipal Institute of Technology या संस्थांचा समावेश आहे. या सर्व संस्थांच्या फी चा विचार केला तर प्रामुख्याने 3 ते 10 लाख रुपयांच्या जवळपास शुल्क आकारले जाते.

Cloud Computing Certificate Courses Names

Cloud Computing And Internet of Things (IoT)
FDP on Cloud Computing
Recent Advances in Network And Cloud Security
Cloud Computing Engineering And Management
Cloud Computing with AWS

 

क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये BTech

क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये BTech करण्यासाठी त्याबद्दल बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे. सर्वात महत्तवाच म्हणजे या अभ्यासक्रमाचा कालावधी 3 ते 4 वर्षांचा असतो. तसेच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी JEE Mains आणि JEE Advanced या प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणे क्रम प्राप्त आहे.

क्लाउड कॉम्प्युटिंगला प्रवेश घेण्यासाठी पुण्यातील काही टॉप महाविद्यालये | Cloud Computing Courses in Pune

MIT-WPU कोथरुड
Mangalayatan University – WILP, Pune पुणे
BKV Learnings Systems, Pune (BKVLS)  कोथरुड
MKSSS Academy of Information Technology For Women  कर्वे नगर 
Amity University Online  पुणे 
D.Y Patil International University, Pune आकूर्डी 
MIT College of Management, MIT-ADT University लोणी काळभोर 
ADYPU – Ajeenkya DY Patil University लोहगांव
Ajeenkya DY Patil University Powered by Sunstone लोहगांव
MIT School of Computing, MIT-ADT University लोणी काळभोर
Profcyma Career Solutions बावधन
Oasis College of Science and Management बिबवेवाडी
Aegis School of Business, Data Science, Cyber Security and Telecommunication हडपसर
Venkateshwara Open University, Pune बावधन
Boston Institute of Analytics बाणेर
IANT – Institute of Advance Network Technology छत्रपती शिवाजी नगर

 

Cloud Computing Courses Salary and Job Profile

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जॉबच्या अनेक संधी या क्षेत्रामध्ये निर्माण होतात. अनुभवानुसार वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये 10 अशा जॉब प्रोफाईल्सची आपण नावे पाहणार आहोत. या प्रोफाईल्सवर काम करणाऱ्या उमदेवरांना देशभरातली अव्वल दर्जाच्या कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे.

  • Cloud Engineer
  • Cloud Developer
  • Cloud Security Engineer
  • Cloud Architect
  • Cloud Automation Engineer
  • Cloud Manager
  • Cloud Security Analyst
  • Cloud Consultant
  • Cloud Administrator
  • Virtualization Engineer

या पदांवर काम करणाऱ्या उमेदवारांना अनुभवानुसार वार्षिक 5 ते 25 लाख रुपये इतका पगार दिला जातो. तुमच्याकडे असणाऱ्या कौशल्य आणि  अनुभवानुसार पगाराच्या रकमेमध्ये फरक असू शकतो.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment