लेख – रूईच्या पानावर गौराई; वयगांव गावची ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक परंपरा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< महाराष्ट्रात साजरा होणारा प्रत्येक सण धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. सण फक्त साजराच केला जात नाही तर पूर्वापार सुरू असलेल्या परंपरा सुद्धा तितक्याच आवडीने जपल्या जातात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक सणाची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. असाच आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव होय. घरोघरी … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती आणि मातीपासून कागदापर्यंतचे सुंदर देखावे

घरगुती गणपती (Ganeshotsav ) आणि मातीपासून कागदापर्यंतच्या सुंदर देखाव्यांची झलक पाहूया.  “जुना कागद, नवी कल्पनाशक्ती – पर्यावरणपूरक गणेश सजावट.” हा सुंदर देखावा आदित्य जाधव यांनी साकारला आहे.  “मातीतून घडलेला, पर्यावरणाला हानी न पोहोचवणारा बाप्पा – निसर्गाचा खरा सोबती!” ही सुंदर मूर्ती साकारलीये पाटील कुटुंबाने.  “एका मूर्तीमध्ये अष्टविनायकांचे दर्शन – भक्तीचा अद्वितीय संगम.” विलास अजय पवार … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती आणि शिवशक्तीपासून इस्रोपर्यंतची सफर

घरगुती गणेशोत्सव (Ganeshotsav) दणक्यात साजरा करण्यासाठी बच्चे कंपनींसह तरुणांची लगबग सुरू असते. त्यामुळे देखावे सुद्धा चांगले बनवण्यासाठी हल्लीची मुलं सकारात्मक असतात. अशाच काही आकर्षक देखाव्यांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पांची वेगवेगळी रूपे आपण पाहणार आहोत.  “गड-किल्ल्यांच्या साक्षीने, आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने — गणराय कात्रजकर कुटुंबाच्या घरी विराजमान झाले आहेत”. हा सुंदर देखावा साकाराला आहे … Read more

Ganeshotsav – घरगुती गणपती देखाव्यातून महाराष्ट्राच्या परंपरेच दर्शन

‘गणपती बाप्पा मोरया’  बुधवारी (27 ऑगस्ट 2025) वाजत गाजत सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav) आगमन झाले. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी महिन्याभरापासून गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू होती. गणपतीचं आगमन म्हटलं की, विविध देखाव्यांमध्ये विराजमान होणारे बाप्पा आपसूकच सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यासाठी महिनाभर काम, कॉलेज या सर्व गोष्टी सांभाळून मेहनत घेतली जाते. घरोघरी तरुण मंडळी यासाठी जय्यत … Read more

Khuni Ganpati – एकीकडे अजान दुसरीकडे आरती; काय आहे मानाच्या ‘खुनी गणपती’चा इतिहास?

महाराष्ट्र गणरायाच्या आगमनात तल्लीन झाला आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाच आगमन झालं आहे. पुढचे दहा दिवस महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचे लाड पुरवले जातील, त्याची मनोभावे सेवा केली जाईल. पुणे आणि मुंबईमध्ये गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. धुळ्यात सुद्धा गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून धुळ्यातील मानाच्या “खुनी गणपती”चे (Khuni Ganpati) … Read more

BSF Job Alert – बीएसएफमध्ये भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता, वयाची अट आणि शेवटची तारीख

देशसेवच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. गणेशोत्सवाला दोन दिवसांनी सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीच बॉर्डरस सिक्युरिटी फोर्सने (BSF Job Alert ) उमेदवारांना आनंदाची बातमी दिली आहे. BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी काही अटींची पूर्तता उमेदवारांना करावी लागणार आहे. पात्रता 60 टक्के गुणांसह उमेदवाराने … Read more

Ganeshotsav- महत्त्वाची बातमी; ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली

महाराष्ट्रात यंदाचा गणेशोत्सवसाठी (Ganeshotsav 2025) राज्य शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून मोठ्या थाटमाटात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक गणेशोत्सव मंडळे विविध देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी नागरिक सुद्धा मोठी गर्दी करतात. आता राज्य सरकारने सुद्धा याची दखल घेतली असून … Read more

Ganeshotsav – भजनी मंडळांचा गणेशोत्सव दणक्यात होणार! राज्य सरकार देणार 25 हजार रुपये अनुदान, वाचा…

अवघ्या काही दिवसांनी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच (Ganeshotsav) आगमन होणार आहे. 27 तारखेपासून गणरायाचा जयजयकार सुरू होईल, घरोघरी-मंडळांमध्ये आरत्यांचा आवाज घुमेल आणि त्याला साथ मिळेत ती भजनी मंडळांची. गणेशोत्सव काळात मंडळांमध्ये तसेच घरोघरी भजनाच्या कार्यक्रमांच आवर्जून आयोजन केलं जातं. मुंबईमध्ये सुद्धा भजनी मंडळांना आमंत्रित केलं जात. याच भजनी मंडळांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून भजनाचे … Read more

Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video

Tennis Cricket Marathi मिस्टर परफेक्शनिस्ट आणि संगमनेर तालुक्याचा कोहिनूर हिरा शेखर शेळकेच अपघाती निधन झालं. शेखर शेळकेच्या मृत्यूमुळे टेनिस क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. एक दर्जेदार खेळाडू गमावल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीमध्ये अनेक सामने गाजवले. गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे त्याच नाव फक्त संगमनेर तालुक्यापूर्त … Read more

Ukadiche Modak – बाप्पा पावला! BMC चा विशेष उपक्रम, एका क्लिकवर मोदक घरपोच मिळणार, जाणून घ्या कसं

अवघ्या काही दिवसांनी लाडक्या बाप्पाच ढोल-ताशांच्या गजरात आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच आगमन म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच. गणेशाच आवडत खाद्य म्हणजे मोदक (Ukadiche Modak). हे मोदक जसे गणरायाला आवडतात तसे ते त्यांच्या भक्तांना सुद्धा आवडतात. त्यामुळे जवळपास सर्वांच्याच घरी मोदकाचा प्रसाद आवर्जून केला जातो. परंतु कामाचा व्याप, … Read more