चंदन-वंदन या जुळ्या गडांची माहिती तुम्ही वाचली असेलच. साताऱ्यातील जुळी भावंड म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त अनेक जुळे गड महाराष्ट्राच्या मातीत आहेत. याच जुळ्या गडांमधला गड म्हणडे रवळ्या आणि Jawlya fort. नाशिक जिल्ह्यात सातमाळा रांगेत या गडांचे वास्तव्य आहे. जावळ्या गड रवळ्या गडाच्या तुलनेच चढण्यास सोपा आहे. मात्र मुक्काम केल्यास रवळ्या आणि जावळ्या हे दोन्ही गड एकाच खेपेत पाहून होतात.
नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गड आहेत. व्यापाराच्या दृष्टीने शत्रूवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने या जिल्ह्यात गडांची निर्मिती करण्यात आली. याच फळीतली ही जुळी भावंड म्हणजे रवळ्या आणि जावळ्या. यातील जावळ्या गाडाची सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत.
Jawlya fort आणि इतिहास
बादशहा अलवर्दीखानाची नाशीक प्रांतात सत्ता होती. यापूर्वीच या गडाची निर्मिती झाली असावी. कारण 1636 साली अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जावळ्या गड जिंकून घेतला होता. मात्र, ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या गडांचा उल्लेख ‘रोला-जोला’ असा करण्यात आला आहे. बराच काळ गड गनीमांच्या ताब्यात होता. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळ्या जिंकून स्वराज्यात सामील केला. त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे 1671 साली दिलेरखानाने गडाला वेढा घालून गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठ्यांपुढे त्याचा निभाव लागला नाही. दिलेरखानाचा डाव मराठ्यांनी उधळून लावला.
Belapur Fort – माणसांच्या गर्दीत हरवलेला बेलापूरचा किल्ला, एकदा अवश्य भेट द्या
दिलेरखानाचा डाव उधळून लावल्यानंतर मराठ्यांनी या गडावर वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर महाबत खानाने हा गड जिंकून घेतला होता. महाबत खानाने बराच काळ गडावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, पेशव्यांच्या हातात सूत्र आली तेव्हा पेशव्यांनी जावळ्या पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत जावळ्या गड स्वराज्यातच होता. इ.स 1818 साली ब्रिटिशांनी जावळ्या गड जिंकून घेतला. गड जिंकून घेतल्यानंतर गड उद्ध्वस्त करण्याची वाईट परंपरा ब्रिटिशांनी सुरू केली होती. त्यानुसार गडाच्या पायऱ्या आणि तटबंदी ब्रिटिशांनी तोफांनी उडवून लावली.
गडाची सध्याची अवस्था
समुद्र सपाटी पासून 4055 फूट उंचावर असणारा हा सावळ्या गड दुर्गवेड्यांच्या प्रतीक्षेत आहे. बऱ्याच जणांना हा गड अजूनही माहित नाही. रवळ्या गडाच्या तुलनेत चढाईसाठी सोपा असलेला हा गड काहीचा सुस्थितीत आहे. गडाचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे. असे असले तरी गड पाहण्यास उत्तम आहे. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांसोबत गडाला आवर्जून भेट द्यायला पाहिजे.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
पायथ्याच्या गावापासून गडावर जाण्यास सुरुवात केल्यानंतर डोंगरसोंडेवर चढून गेल्यानंतर आपण एका गुहा जवळ पोहोचतो. याच ठिकाणाहून पुढे चालत गेल्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. याच पायऱ्या तुम्हाला थेट गडावर घेऊन जातात. सुरुवातीला गडावर मुख्य दरवाजा आपलं लक्ष वेधून घेतो. मुख्य दरवाजाच्या शेजारी असणार्या भिंतीवर शिलालेख कोरलेले पहायला मिळतात. शिलालेख पाहून झाल्यानंतर याच वाटेने पुढे जावे.
Sindkhed Raja Maharashtra – राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, या ऐतिहासिक ठिकाणाला आवर्जून भेट द्या
गडावर पोहचल्यानंतर काही पाण्याची टाकी आपल्याला पहायला मिळतात. त्याच बरोबर घोड्याच्या पागा सुद्धा पहायला मिळतात. संपूर्ण गड पाहण्यासाठी साधारण अर्धा ते एक तास पुरेसा होतो. गडावरून चौफेर नजर फिरवल्यास कण्हेरगड, कंचना, घोडप आणि इंद्राई हे किल्ले पाहता येतात.
गडावर जायचे कसे
जावळ्या गडावर जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नाशिकमध्ये पोहचावे लागणार आहे. तिथून वणीला जाणारी गाडी पकडून वणीला जावे लागणार आहे. वणीला आल्या नंतर एक रस्ता बाबापूर-मुळाणे मार्गे कळवणला जातो. बाबपूर वरून कळवणाला जाताना 3 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर तुम्हाला एक खिंड लागेल त्या खिंडीतून गडावर जाणारा रस्ता सुरू होतो. त्यानंतर जावळ्या गडाच्या दिशेन आपला प्रवासा सुरू होतो. खिंडीतून गडावर जाण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागू शकतात.
गडावर जेवणाची राहण्याची सोय आहे का
खिंडीतून गडावर जाताना एक पठार लागत त्या पठारावर असणाऱ्या वस्तीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. तसेच टेंट टाकून सुद्धा तुम्हा गडाच्या परिसरामध्ये राहू शकता. मात्र, गडावर जेवणाची कोणताही सोय नाही. त्यामुळे गडावर जेवणासाठी येताना आपली व्यवस्था आपणच करावी. गडावर पाण्याची टाकी आहेत. मात्र, पिण्याचे पाणी चांगले आहे का नाही याबाबात खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शक्यतो गडावर येताना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी घेऊन यावे.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला, मित्रांना शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.